गोंदिया,दि.06ः- नागझिरा- नवेगाव काॅरीडोर मधील जांभळी – शशिकरण पहाडी परिसरातील रामपायली भागात कम्पार्टेमेंट नंबर ५०९ मध्ये एप्रिलमध्ये १ गवा मृतावस्थेत आढळल्यानंतर परत काल रविवारला(दि.५) रामपायली परिसरात १ गवा उष्णघातामुळे मृतावस्थेत आढळून आल्याने गव्यांच्या मृत्यूंची श्रृंखला सुरु होण्याची भिती सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांनी बेरार टाईम्सकडे व्यक्त केली आहे.गेल्या वर्षी २०१८ मधे एप्रिल ते मे महिन्यामध्ये जवळपास ८ -९ गवे मृतावस्थेत मिळाली होती.रानगव्यांच्या लागोपाठ होणार्या मृत्यूचे कारण काय असू शकते हे अद्यापही स्प्ष्ट झालेले नाही.तर उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांची भटकंती होत असल्याने आणि जंगलात गुरेचराईचे प्रमाण वाढल्याने अन्न व चाऱ्यासाठी स्पर्धा वाढू लागल्याचेही बहेकार यांचे म्हणने आहे.त्यातच्या जांभळी – शेंडा – शशिकरण हा जंगलभाग नागझिरा नवेगाव काॅरीडोर मध्ये असला तरी बहुतांश जंगल हे FDCM कडे आहे. एफडीसीएमद्वारे व्यवस्थापनाच्या नावावर होत असलेली जंगल कटाई व त्यामुळे सर्वत्र जंगलभर झालेली मानवी ढळवाढवळ वन्यप्राण्यांना धोकादायक ठरु लागल्याचे समोर येऊ लागले आहे.
ज्या भागात रानगव्याच्या मृत्यू झालेला आहे,त्या भागात वाघ , बिबट, अस्वल, रानगवा,रानकुत्री,भेकळ,चितळ,सांभर,चांदी अस्वल असे अनेक महत्त्वाचे वन्यजिव ह्या परिसरात आहेत, त्यामुळे हे जंगलभाग अत्यंत महत्त्वाचे आहे.रामपायली परिसरात मृतावस्थेत आढळलेल्या रानगव्यांच्या निरिक्षणानंतर अतिउष्माघाताने व वेळेवर पाणी मिळत नसल्याने त्यांचा मृत्यू होत असल्याचे बहेकार यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment