Monday, 13 May 2019

गोंदिया शहरात राबविणार विविध योजना-केंद्रीयमंत्री गडकरीचे नगराध्यक्षांना आश्वासन

गोंदिया,दि.१३ : गोंदिया शहरात विविध विकासकामांकरिता केंद्र आणि राज्य शासनाने यापूर्वी भरघोष निधी दिला. त्या निधीतून शहरात विविध विकासकामे हाती घेण्यात आली. विकासाची गती अधीक वेगवान व्हावी, याकरिता नगर पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांनी शनिवारी केंद्रीय परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर गोंदिया शहराकरिता निधी कमी पडू देणार नाही. त्यातून विविध मुलभूत आणि महत्वाची कामे करण्यात येणार असल्याची कबुली श्री गडकरी यांनी दिली. गोंदिया शहराची लोकसंख्या सुमारे ३ लाख आहे. त्यामानाने शहरातील वाहतूक व्यवस्था योग्य नसल्याने कटंगी ते फुलचूर नाल्यापर्यंत नवीन उड्डानपुलाचे बांधकाम, रस्त्यांचे सिमेंटीकरण, मरारटोली रेल्वे फाटक ते हायवे बायपास पर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम, हड्डीटोली रेल्वे चौकी ते मरार समाजभवनापर्यंत उड्डानपुल तयार करणे, भीमनगर मैदानाजवळील रेल्वे फाटकाजवळ भूमिगत पूल अथवा उड्डाणपुलाचे बांधकाम करणे, दुर्गा चौक ते मालधक्का/राजलक्ष्मी चौकापर्यंत लहान पुलाचे बांधकाम, रानीसती लॉज ते पैदल पुल (फुट ब्रिज)चे बांधकाम, कस्तूर होटल ते रेलवे क्रॉसिंग दरम्यान पैदल रस्ता, कालेखां चौक ते बंगाली शाळा, गुजराती शाळा, पाल चौक पर्यंत रस्त्यांचे रुंदीकरण आणि सौंदर्यीकरण करणे, कुडवा नाका ते बालाघाट मार्गापर्यंत सिमेट रस्ता तसेच सौंदर्यीकरण करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. सरकार सत्तेत आल्यानंतर ही कामे प्राधान्याने हाती घेण्यात येतील, असे आश्वासन श्री गडकरी यांनी अशोक इंगळे यांना दिले. यावेळी भाजपचे जिल्हा सचिव अमृत इंगळे, भाजप माजी जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार बिसेनउपस्थित होते.
वैनगंगा आणि वाघनदी उन्हाळ्यात कोरड्या पडत असल्यामुळे गोंदिया शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. गेल्या दोन वर्षांपासून पुजारीटोला धरणातून पाणी आणावे लागत आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याकरिता नदीवर बंधारा बांधण्याकरिता निधी उपलब्ध करून ते काम देखील तातडीने हाती घेण्याचे आश्वासन श्री गडकरी यांनी दिले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...