भंडारा,दि.18: जिल्ह्यातील रोहा येथील वैनगंगा नदी पात्रात शुक्रवारी रात्री अवैध रेती उत्खनन करणाऱ्या जेसीबी मशीनचा धक्का लागून नवनीत संजय सिंदपुरे (१९) हा मजूर जागीच ठार झाल्याची घटना घडली.
या घटनेमुळे अवैध रेती उत्खननाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नवनीत सिंदपुरे हा आपला मित्र चेतन उके याच्यासोबत शुक्रवारी रात्री नदीपात्रात गेला होता. तेथे सुरु असलेल्या अवैध उत्खननात जेसीबीचा पंजा डोक्याला लागल्याने नवनीत जागीच ठार झाला. नवनीत सिंदपुरे ९ व्या वर्गात शिकत होता. काल आपल्या आजोबा कडे रोहा येथे आला होता.विशेष म्हणजे न्यायालयाने रेती उत्खन्नावर बंदी घातलेली असतानाही रात्रीला रेतीचा अवैध उपसा होणे हा न्यायालयाचा अवमान असून महसूल व पोलीस विभागाचे साटेलोटेच म्हणावे लागणार आहे.
No comments:
Post a Comment