Saturday, 29 February 2020
कोर्ट परिसरात मोबाईलवर गाणे वाजविणे पडले महागात
राष्ट्रवादीच्या युवा जिल्हा उपाध्यक्षपदी युगेश बिसेन

Friday, 28 February 2020
सात हजाराची लाच घेतांना केटीएसचा सहा.अधिक्षक जाळ्यात

राज्यात होणार ओबीसींची स्वतंत्र जनगणना?; विधानसभेत सर्वपक्षांचे एकमत
“देशाचे पंतप्रधान स्वत: ओबीसी आहेत”-फडणवीस
मुल्ला येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Wednesday, 26 February 2020
Monday, 24 February 2020
कर्जमुक्ती योजनेची जिल्हयात अंमलबजावणी सुरु;जिल्हयात 35 हजार 325 पात्र लाभार्थी

कर्जमुक्तीचा आनंद मोठा
माझ्यावर सोसायटीचे 1 लाख 54 हजार 671 रुपये कर्ज होते. महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जमुक्ती दिली. योजनेची प्रक्रिया सुलभ व जलद होती. कार्यालयात चकरा माराव्या लागल्या नाहीत. आज कर्जमुक्तीची आधार प्रमाणिकरण पावती प्राप्त झाली आहे. ही अतिशय समाधानाची बाब असून कर्जमुक्त झाल्याचा आनंद मोठा आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे.
– कमलाबाई रुपचंद हजारे,शहापूर
|
देवरी नपच्या मुख्याधिकारीपदी अजय पाटणकर रुजू
![]() |
मुख्याधिकारी पाटणकर |
![]() |
श्री पाटणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना नप पदाधिकारी |
दंडबैठकांच्या वेदनेने विव्हळल्या विद्यार्थिनी!
Sunday, 23 February 2020
आईच्या निधनाचा निरोप आला तरी किर्तन करत राहिले; तेरवी, मुंडणही न करण्याचा सत्यपाल महाराजांचा निर्णय
Saturday, 22 February 2020
कत्तलीसाठी जाणारी जनावरे पकडली
Friday, 21 February 2020
Thursday, 20 February 2020
शपथपत्रात माहिती लपवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना जामीन मंजूर
हत्या प्रकरणातील ७ आरोपी गोंदिया शहर पोलीसांच्या ताब्यात
मानधनवाढीसाठी स्वयंपाकी महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
![]() |
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देतांना(छाया-सतिश पारधी) |
स्वयंपाकीन महिलांना सेवेतुन काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वयंपाकीन महिलांना शाळा व्यवस्थापन समिती इतर महिलांकडुन पैसे वसुल करून त्यांना कामावर घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मानधनातुन अर्धे मानधन दुसºया महिलांना देण्याची हुकू मशाही शाळा व्यवस्थापन समित्या चालवत आहेत. अर्धे मानधन देत नसाल तर उद्यापासुन येऊ नका अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही यावेळी स्वयंपाकी महिलांनी केला. तचेच शाळा व्यवस्थापन समित्यांनी शासनाच्या नियमांचा भंग केला आहे. त्यामुळे शासन नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे व स्वयंपाकीन महिलांना नियुक्त करण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समित्यांकडुन काढण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शेतमजुर लालबावटा संघटनेच्यावतीने मोर्चा
![]() |
निदर्शने करतांना लालबावटा युनीयन पदाधिकारी |
लखनसिंह कटरे लिखित काव्यसंग्रहाचे विमोचन
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्याम कटरे, अँड. तिलकसिंह परधीउपस्थित होते. लखनसिंह कटरे हे मराठी साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य असून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागात जिल्हा उपनिबंधक पदावर यशस्वीपणे कार्य केले आहे. त्यांनी विविध नियतकालीन व वर्तमानपत्रात लेखन केले असून ते झाडीबोली साहित्य मंडळ साकोलीचे संस्थापक सस्य आहेत. सेवानवृत्तीनंतर ८ मराठी ग्रंथ प्रकाशित केले असून धर्मपत्नी उषादेवी कटरे यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी 'आखीर बचता तो अंधेरा ही है' या काव्यसंग्रहाचे विमोचन स्वगावी बोरकन्हार येथे करण्यात आले.
या काव्यसंग्रहात एकूण २८ कवितांचा समावेश असून काही रेखाचित्रांसाही समावेश आहे. सुरेंद्र तुरकर यांनी लखनसिंह कटरे हे मराठी भाषेच्या सानिध्यात राहूलनही त्यांचे हिंदी भाषेवर प्रभुत्व असल्याचे सांगितले. भैय्यालाल कटरे यांनी मानकर गुरुजींच्या पुण्याईमुळे आम्ही शिक्षण घेऊ शकल्याचे सांगितले. याप्रसंगी सिता रहांगडाले, मिलिंद रंगारी, श्रावणलाल ठाकूर उपस्थित होते. यावेळी मिलिंद रंगारी यांनी लखनलाल कटरे यांचा शाल देऊन सप्तनीक सत्कार केला.
सुदृढ राहण्याकरिता आरोग्याची नेहमी काळजी घ्या - आ.रहांगडाले
तिरोडा,दि.20:- आपल्या आरोग्याच्या बाबतीत काही ठराविक नियमांचे पालन कधीही फायद्याचेच ठरते. आहार आणि व्यायामातील नियामितपणा, तसेच झोपेच्या किंवा कामाच्या नियमित सवयी ह्या सर्वच गोष्टींनी आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. पण ह्यामधील काही सवयींचा जर अतिरेक झाला तर तो मात्र आपल्याला नुकसानकारक ठरू शकतो. उदाहरणार्थ वजन कमी करण्यासाठी जर डायट पाळायचे झाले तर डायट प्रमाणे आपले खानपान सांभाळणे चांगले. पण वजन जलद घटविण्याच्या मोहापायी डायटिंग चा अतिरेक करून शरीराला आवश्यक तेवढे अन्न ही न मिळू देणे हे मात्र हानिकारक ठरू शकते असे आमदार रहांगडाले मेंढा येथील भूमिपूजन कार्यक्रमात संबोधित केले.जिल्हा वार्षिक आठ आरोग्य योजना २०१९-२० अंतर्गत मेंढा येथे आरोग्य उपकेंद्र इमारतीकरिता ८०.०० लक्ष मंजूर असून सदर वास्तूचे भूमिपूजन आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले यावेळी माजीजि.प.उपाध्यक्ष मदन पटले,जी.प.सदस्या सौ.रजनीताई कुंभरे, प.स.सदस्य रमनिक सयाम, कृ.ऊबास संचालक मिलिंद कुंभरे, दिनेश चोबरे,सरपंच गौरीशंकर टेंभरे ,रामकिशोर ठाकूर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शीतल मोहने, कनिष्ठ अभियंता प्रवीण दमाहे व उपसरपंच अनिल नेवारे, सदस्य रंजिता भिसेन,कल्पना कटरे,माधुरी बिसेन, जयश्री सुरसाउत व गावकरी उपस्थित होते.
हर ,हर ,महादेवाचा गजर प्रतापगडावर हिंदू ,मुस्लिम,तिबेटीयांच्या एकतेचे प्रदर्शन
20 फरवरी रोजी महा यज्ञाची समाप्ती होऊन 21 फरवरी पासून या यात्रेला सुरुवात होत आहे .याच परिसरात ख्वाजा उस्मानी गणी हारून यांचा दर्गा आहे .मोठ्या प्रमाणात हिंदू ,बांधव एकत्र भगवान शंकराचे व मुस्लिम बांधव दर्ग्यात जाऊन नमाज पढतात. याच परिसरात धरणाच्या कुशीत वसलेली तिबेट ,बंगाली वसाहत आहे. तिबेटी वसाहतीमध्ये दिवाळीचा धार्मिक सण जल्लोष असतो, या तिहेरी सणाला मोठ्या संख्येने भाविक _भक्त जनसमुदाय उपस्थित राहतो .भाविक भक्त प्रतापगडाच्या भेटी बरोबर इटियडोह धरण ,नवेगाव (बांध )रमणीय स्थळाला भेट देऊन शांत मनाने गावाकडे वाढतात .प्रतापगड यात्रेला येणाऱ्या जाणाऱ्या साठी बस गाड्यांची सोय ,पिण्याच्या पाण्याची सोय ,भोजनाची व्यवस्था उपवासाचा नाश्ता यांची व्यवस्था असते . कार्यक्रमासाठी नानाभाऊ पटोले अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, आमदार मनोहर चंद्रिकापुरे ,माजी आमदार राजकुमार बडोले,मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांचेसह तालुक्यातील शेकडो राजकीय नेते व भक्त जण उपस्थित राहणार आहेत. वनराईने व्यापलेला हा प्रतापगड परिसर पाहण्यासाठी भाविक उत्सुक असतात मुस्लिम बांधवांच्या वतीने दर्ग्याच्या परिसरात कव्वाली चे आयोजन केलेले आहे .प्रतापगड हिंदू-मुस्लीम व तिबेटी वसाहतीचे असे तिहेरी कार्यक्रम होतात .या कार्यक्रमाला कसल्याही प्रकारचा गालबोट लागत नाही. ही एक धन्यता आहे. हर बोला हर हर महादेव च्या गजरात भाविक मोठ्या संख्येने प्रतापगडाकडे रवाना होत आहेत. या परिसराला पर्यटक स्थळ बनविण्याचा नानाभाऊ यांचा प्रयत्न असून यामुळे परिसरातील बेरोजगारांना वर्षभर रोजगार मिळेल ,वन-उपजात मालावर प्रक्रिया उद्योग आणून आदिवासींना रोजगार मिळेल यासाठी नानाभाऊ पटोले प्रयत्नशील आहेत.
नवीन पेन्शन योजना लागू असलेल्या कर्मचा-यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ द्या - पेन्शन हक्क संघटन कर्मचाऱ्यांची आमदारांकडे मागणी
चंद्रपूर येथे भाविकांच्या गाडीला अपघातः सहा ठार

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवले व तपास सुरू केला आहे. ट्रक नादुरुस्त होता. या ट्रकला भरधाव स्कॉर्पिओने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
जातनिहाय जनगणनेसाठी हजारों ओबीसींचा रस्त्यावर एल्गार
Add caption |
ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी राष्ट्रीय महासंघ, ओबीसी सेवा संघाच्या वतीने ओबीसी जनगणनेकरिता जिल्ह्यात ५ फेब्रुवारीपासूनु जनजागृती चेतना यात्रा काढण्यात आली होती. त्या यात्रेचा समारोप आज(दि.१९) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी येथील प्रशासकीय भवनासमोर करण्यात आला. दरम्यान जात निहाय जनगणना व्हावी, यासाठी हजारोच्या संख्येत आलेल्या ओबीसी समाज बांधवांनी भव्य रॅली काढून शासन विरोधात एल्गार पुकारला.त्यावेळी इंजि.ढोबळे मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
Wednesday, 19 February 2020
Sunday, 16 February 2020
जनतेचे ते ऋण फेडण्याची वेळ आली आहे : विधानसभा अध्यक्ष पटोले
आदिवासी विद्याथ्र्यांची डि.बी.टी.योजना रद्द करा आ. कोरोटे
देवरीत संत सेवालाल यांची जयंती उत्साहात

Saturday, 15 February 2020
गोरेगावचे तहसीलदार पुनसे एसीबीच्या जाळ्यात
Friday, 14 February 2020
चारचाकीला आग लागून वाहन जळाले
ओबीसी विभागाचे नाव बहुजन कल्याण विभाग नव्हे, ओबीसी विभागच हवे! -खेमेंद्र कटरे
जन्माच्या तीन तासांत बदलले बाळाचे रक्त;गोंदियातील पहिलाच प्रयोग यशस्वी
गोंदिया,दि. 14 : एकेकाळी गोंदियातील रुग्ण लहान सहान कारणांकरिता नागपूर येथे पाठविण्यात येत होते. त्याचा आर्थिक भूर्दंड रुग्णाच्या नातलगांना सहन करावा लागत होता. शिवाय वेळ देखील वाया जात होता. नागपूरला जाण्याकरिता साडेतीन ते चार तासांचा वेळ लागत असल्यामुळे प्रसंगी रुग्णाचा जीव जाण्याची भिती देखील राहत होती. मात्र आजघडीला शहरात उच्च आरोग्य सेवा मिळण्यास सुरुवात झाली आहे. उच्चशिक्षण घेवून येथे डॉक्टर स्थिरावत आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीत देखील रुग्णांना उपचार मिळू लागला आहे. कठीणात कठीण असा उपचार करण्यात येथील गोंदिया सेंट्रल हॉस्पीटलमध्ये नवजात शिशू विभागाचे विशेषज्ञ डॉ. सुनील बाळकृष्ण देशमुख यांनी करून दाखविला. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील अर्चना दीपक गजभिये यांना प्रसूतीकरिता दाखल करण्यात आले. प्रसूती झाल्यानंतर बाळाच्या आईचा रक्तगट निगेटिव्ह असल्यामुळे बाळाला गर्भाशयातच अॅनिमिया झाला होता. त्यामुळे पिलीयाचा आजार वाढला होता. त्या बाळाच्या जीवाला धोका होता. त्यामुळे त्याचे रक्त बदलणे गरजेचे होते. डॉ. सुनील देशमुख यांनी हे प्रकरण अत्यंत शिताफीने हाताळले. बाळाच्या जन्माच्या दिवशीच अवघ्या ३ तासांच्या आत बाळाचे रक्त बदलण्यात आले. हा प्रयोग जिल्ह्यातील पहिलाच आहे. डॉ. देशमुख एमबीबीएस एमडी फेलोशिपप्राप्त आहेत. त्यांनी आपले शिक्षण केईएम या नामांकीत रुग्णालयात केले. त्या बाळाला सात दिवसांच्या आत सुटी देण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे अवघ्या ३० तासांत बाळाचे रक्त तीन वेळ बदलण्यात आले. रक्त बदलाची प्रक्रीया करण्यात डॉ. सुनील देशमुख यांना नवजात शिशू विभागाचे डॉ. उमेंद्र बोपचे, डॉ. विलास मेंढे आणि एनआयसीयू स्टाफने त्यांना सहकार्य केले.
Wednesday, 12 February 2020
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...