Friday, 28 June 2019
मानव तस्करीचा पर्दाफाश : ३३ मुलांची राजनांदगाव रेल्वेस्थानकावर सुटका
वीज कोसळून आठ विद्यार्थी जखमी
सागवान भरलेला मिनीट्रक पकडलाः देवरी पोलिसांची कारवाई
देवरी,दि,28- शेंडा परिसरात गस्तीवर असताना देवरी पोलिसांनी सागवान लाकडांची तस्करी करणाऱ्या चोरट्यांचा एक मिनीट्रक पुतळीच्या जंगलात पकडला. ही घटना आज मध्यरात्रीच्या सुमारास रात्री अडीचच्या सुमारास घडली.
सविस्तर असे की, देवरी पोलिसांची एक चमू ठाणेदार कमलेश बच्छाव यांच्या नेतृत्वात शेंडा परिसरात गस्तीवर होती. दरम्यान, पुतळीच्या जंगलातून जात असताना रस्त्याच्या एका बाजूला प्रकाशाचा झोत चमकल्याने पोलिस चमू सतर्क झाली. त्या जागेचा कानोसा घेत पोलिस पथक घटना स्थळाकडे येत असल्याचे पाहून वन तस्करांनी तिथून पळ काढला. मात्र, सागवानाचे सुमारे सहा लाकडे भरून असलेला टाटा अश क्र. MH 35 K 5503 हा पोलिसांच्या हाती लागला. सदर मिनीट्रक हा पोलिसांनी सडकअर्जूनी वनविभागाच्या स्वाधीन केला. या प्रकरणी वनविभाग काय कार्यवाही करते,या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. उल्लेखनीय म्हणजे शेंडा आणि लगतच्या जंगलातून होणाऱ्या वनतस्करीवर वनविभागाचे वचक राहिले नसल्याने वनतस्करांचे चांगलेच फावत असल्याची चर्चा सडक अर्जूनी तालुक्यात आहे. वनविभागाच्या सुस्त कारभारामुळे जंगलांचे अस्तित्व धोक्यात आल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्याने देवरी पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. ठाणेदार कमलेश बच्छाव यांचेसह हेड कांस्टेबल राऊत, वसंत देसाई आणि पीएन चौधरी यांनी ही कार्यवाही केली.Wednesday, 26 June 2019
राष्ट्रीय युवा क्रीडा महोत्सवात ब्लॉसम स्कुलच्या दक्ष गवते ला सुवर्ण पदक
Monday, 24 June 2019
सावली येथे घराच्या छतावरून पडून युवतीचा अपघाती मृत्यू
देवरी, दि.24- देवरी तालुक्यातील सावली येथील एका युवतीचा आपल्या घराच्या छतावरून पडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडे दहाच्या सुमारास घडल्याचे वृत्त नुकतेच हाती आले आहे.आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा तडकाफडकी राजीनामा
Saturday, 22 June 2019
नाली बांधकामात होत आहे दिरंगाई
प्रभाग 13 तील नगर पंचायत सदस्य भूमिता बागडे यांचा सुद्धा दुर्लक्ष
देवरी:- स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने प्रभाग क्रमांक १३ मध्ये दोन्ही बाजूच्या नालीचे बांधकाम व सिमेंट रस्त्याचे बांधकाम दलीतवस्ती फंडातुन मंजूर करण्यात आले आहे, कामाला जवळपास 2 महिना झाले असून सुदधा आतापर्यंत 200 मीटर नालीचे बांधकाम पूर्ण झाले नाही, बांधकाम साहित्य रस्त्यावर असल्याने तसेच नालीत रेती पडून असल्याने *2 महिन्यापासून नालीत पाणी साचल्याने जंतू निर्माण झाले आहेत त्यामुळे रोग पसरण्याची शक्यता आहे*
या प्रभागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे नगर पंचायत प्रशासन दुर्लक्ष करत आहे
सदर परिसरात दाट वस्तीचे घरे आहेत. या घरातील लोकांना अर्धवट कामामुळे विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
सदर बांधकाम जलद गतीने व्हावा म्हणून वारंवार पालिकेच्या मुख्यधिकाऱ्यांना सांगून सुद्धा कंत्राटदाराकडून या कामात गती दिसून येत नाही.
पालिका प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी मागणी मोहन डोंगरे, उमेश येरपुडे, आशिष डोंगरे, आस्तिक येरपुडे,गुणीलाल शहारे, सुमित्राबाई गिऱ्हेपुंजे, जनाबाई येरणे, भागणबाई वट्टी यांच्यासह प्रभागवासीयांनी केली आहे. तसेच कामाची गती वाढवून उत्कृष्ट दर्जाचा काम नाही झाल्यास काम बंद करण्याचे चर्चा प्रभात सुरू आहे,
मुख्यकार्यकारी अधिकारी नगर पंचायत देवरी: राजेंद्र चिखलखुनदे :- कंत्राटदार स्वतःची मनमर्जी करत आहे, वारंवार सांगून सुद्धा दुर्लक्ष करत आहे, सदर कंत्राटदार बबलू डोये आहे, असे सांगितले
Friday, 21 June 2019
देवरीचा योजन कावळे शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात पहिला
पोलीस अधिकारी शैलेश काळे निलंबितः मुंडेच्या प्रश्नावर केसरकरांची माहिती
नागपूरच्या युवकाचा शिलापूर नाल्यात बुडून मृत्यू
ऑनलाईन व ऑफलाईन दोन्हीत अर्ज करणाèया शिक्षकामुळेच इतरावंर अन्याय
देवरीत योग दिवस साजरा
देवरी,दि.21- स्थानिक तालुका क्रीडा संकूलाच्या मैदानावर आज शुक्रवारी (दि.21) आयुष विभाग आणि नगर पंचायत प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.
या पाचव्या जागतिक योग दिवसाचे आयोजनाचे वेळी देवरीच्या नगराध्यक्ष कौशल कुंभरे, उपनगराध्यक्ष आफताब शेख आणि मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या योग दिवसाचे औचित्यावर पतंजली योग संस्थानच्या योग प्रशिक्षकांनी उपस्थितांना योग विद्येचे धडे योग्यरीत्या गिरविता येण्यासाठी मार्गदर्शन करीत योग करण्याचे मानवी जीवनावर होणारे फायदे सुद्धा विशद केले. या शिबीराला देवरी येथील लोकप्रतिनिधींसह कर्मचारी अधिकारी यांनी हजेरी लावली. स्थानिक नागरिकांनी सुद्धा या शिबीराचा लाभ घेतला.Wednesday, 19 June 2019
कुंभलीजवळील चुलबंद नदीवरुन काळीपिवळी पलटल्याने 6 ठार
अघोरी पूजा करणार्या भोंदूबाबाला अटक
भंडारा ,दि.18ः-उच्चशिक्षित मुलीला खुद्द तिच्या मैत्रिणीनेच भावनेत अडकवून तिच्या मृत आईशी बोलणी घालून देतो म्हणून भोंदूबाबाकरवी अघोरी पूजा करण्यास सांगितले. मुलीला याबाबत शंका येताच तिने पोलिसांना माहिती दिली. अघोरी पूजा करताना भोंदूबाबा व तिच्या मैत्रिणीला पोलिसांनी अटक केली. ही पूजा करण्यासाठी भोंदूबाबाने ३१ हजारांची मागणी केली होती. दोन्ही आरोपींना २0 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Sunday, 16 June 2019
भाटिया पेट्रोलपंप समोर अज्ञात वाहनाची विजेच्या खांबाला धड़क
मंत्रिमंडळ विस्ताराला सुरुवात; पहिल्या शपथेचा मान आयात नेत्यांना
राजकुमार बडोले, प्रकाश मेहता यांचे राजीनामे
मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्र्यांचे मतदारसंघ
रापम अधिकाऱ्यांच्या बचावासाठी तक्रारी गहाळ केल्या -नरेश जैन
Wednesday, 12 June 2019
अभियंत्याच्या चुकीमुळे पालांदूरची पाणी पुरवठा योजना धोक्यात
सरपंच चंद्रकला कावळेंसह गावकऱ्यांचा आरोप
बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच विहीर कलंडली
सविस्तर असे की, तालुक्यातील पालांदूर ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या पालांदूर, गरारटोला आणि टेकरी या गावातील साडेतीन हजार लोकवस्तीला पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्हा परिषदेने सन 2017-18 या वर्षात 1 कोटी, 4 लाख, 30 हजार 175 रुपयांचा निधी मंजूर केला. यामुळे गावाजवळून वाहणाऱ्या चुंभली नदीच्या तीरावर जागेचे नियोजन ग्रामीण पाणी पुरवठा,उपविभाग देवरीच्या अभियंत्यांनी केले. या सहा मीटर व्यासाची आणि 15 मीटर खोल विहीर तयार करण्याच्या कामाला मे2017 मध्ये प्रत्यक्ष सुरवात करण्यात आली. सुमारे 30-35 फूट खोल विहिरीचे बांधकाम करून पावसाळ्यामुळे काम थांबविण्यात आले. दरम्यान, थांबलेले बांधकामास यावर्षी पुन्हा सुरवात करताच ही विहीर नदीच्या पात्राच्या दिशेने कलंडली. यामुळे सदर विहिरीच्या काँक्रिट भिंतीला तडे केले. सदर प्रकार लपविण्यासाठी अभियंत्यांच्या सूचनेनुसार घाईगडबडीत विहिरीलगतच पात्रातील मातीचा जेसीबीच्या साहाय्याने उपसा करून विहीरीभोवती भरणा भरण्यात आले. परिणामी, विहिरीजवळील पात्राकडील मातीची पकड आणखी सैल झाल्याने पावसाळ्यात संपूर्ण विहीर कोलमडण्याची भीती ग्रामपंचायत कार्यकारिणीसह गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अद्यापही अपूर्ण असलेल्या या विहिरीच्या बांधकामावर आतापर्यंत 19 लाख, 93 हजार 786 रुपये खर्च झाल्याचे कार्यकारिणी सदस्यांचे म्हणणे आहे. उल्लेखनीय म्हणजे कंत्राटदाराने या विहिरीशेजारीच दुसरी छोटी विहीर तयार केली, त्या विहिरीला मूळ विहीरीपेक्षा पाण्याचा साठा अधिक असल्याचे तेथे उपस्थित नागरिकांनी सांगितले. याविषयी ग्रामपंचायतीने ग्रामीण पाणी पुरवठा विभागासह देवरीचे गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांचेकडे लेखी तक्रार सुद्धा दाखल केली आहे. उल्लेखनीय म्हणजे या कामाच्या पाहणीसाठी आलेल्या अभियंत्यांनी कार्यकारिणीच्या सदस्यांना कलंडलेली विहीर ही दोराच्या साहाय्याने ओढून सरळ करून देण्याचे आश्वासन दिल्याचे कार्यकारिणी सदस्य सांगतात, हे विशेष. या विषयी सरपंच कावळे, उपसरपंच मूलचंद नाईक, सदस्य श्रीराम राऊत, प्रल्हाद चौधरी, उत्तरा वळगाये लता राऊत यांनी या सदोष बांधकाम करणाऱ्या अभियंत्यावर कार्यवाही करून खर्च झालेला निधी वसूल करण्याची मागणी केली आहे.
याविषयी देवरीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला भेट दिली असता संबंधित अभियंता आणि उपविभागीय अभियंता कार्यालयात हजर नव्हते. उपअभियंता एस.व्ही.पवार यांचेशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी गावकऱ्यांची तक्रार प्राप्त झाल्याचे मान्य करून गावकऱ्यांना तांत्रिक बाबी खुलासेवार समजावून सांगितल्याचे आणि तक्रारीला लेखी उत्तर दिल्याचे सांगितले. मात्र, असे कोणतेही लेखी उत्तर ग्रामपंचायतीला मिळाले नसल्याचे सरपंच कावळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.जहाल नक्षली नर्मदाक्का पतीसह अटक
गडचिरोली पोलिसांची कारवाई
गडचिरोली-गेल्या कित्येक दिवसापासून पोलिसांना हव्या असलेल्या दंडकारण्य स्पेशल झोन समितीची सदस्य आणि वेस्टर्न सबझोनल प्रमुख उप्पगंटी निर्मलाकुमारी ऊर्फ नर्मदाक्का ऊर्फ नर्मदा दीदी आणि तिचा पती राणी सत्थ्यनारायण ऊर्फ किरण ऊर्फ किरणदादा हे दांपत्य अखेर गडचिरोली पोलिसांच्या सापळ्यात अडकले. या दोघांना पोलिसांनी गडचिरोली पोलिसांनी सिरोंचा बसस्थानकावर अटक केली.
सविस्तर असे की नर्मदाक्का आणि किरण हे दोघे नक्षली दांपत्य अनेक नक्षली घातपातातील गुन्ह्यात सहभागी असल्याने ते तेलंगानासह गडचिरोली पोलिसांना हवे होते.नर्मदाक्का (वय 58), राहणार कोडापावनुरू, गलावरम मंडल जिल्हा कृष्णा (आंध्रप्रदेश) आणि तिचा पती किरण (वय 70) राहणार नरेंद्रपुरम, अमलापुरम जवळ, राजानगरम मंडल,जिल्हा पूर्व गोदावरी (आंध्रप्रदेश) हे दोघेही तेलंगाना राज्यातून सिरोंचा मार्गे गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याची माहिती तेलंगाना आणि गडचिरोली पोलिसांच्या हाती लागली. मिळालेल्या माहितीवरून तेलंगाना पोलिसांच्या सहकार्याने गडचिरोली पोलिसांनी सिरोंचा बसस्थानकात सापळा लावून या दोन्ही जहाल नक्षलवाद्यांना अटक केली.Monday, 10 June 2019
वृक्ष आणि पर्यावरण कर घेणाऱ्या देवरीच्या नगरपंचायती समोरील झाडे मेली!
सागवान तस्करांना रंगेहाथ पकडले;पाच आरोपी अटकेत, चार फरार
Sunday, 9 June 2019
अंध विद्यार्थ्यांमध्ये गोंदियाची ईशा बिसेन राज्यात प्रथम
गोंदिया,दि.09ः-महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी परिक्षेचा निकाल शनिवारला जाहिर झाला असून यात गोंदियाच्या जानकीदेवी हायस्कलची विद्यार्थीनी ईशा किरणकुमार बिसेन हिने अंध विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.सदर शाळेचा निकाल 100 टक्के लागला.ईशा बिसेनचे शाळेच्यावतीने ईशा व तिच्या आईवडिलांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले आहे.ईशा चे वडील हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत.ईशाच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव सुरेश चौरागडे,संचालिका रेखादेवी चौरागडे व मुख्याध्यापक प्रमोद चौरागडे यांनी अभिनंदन केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय संपूर्ण शिक्षकांना आणि शाळेच्या मुख्याध्यापक प्रमोद चौरागडे यांना आणि आई वडिलांना दिले.
५७ विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड

गुरूवारी (दि.६) आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी होते. शिक्षण समिती सभापती रमेश अंबुले, शिक्षणाधिकारी (प्राथ) उल्हास नरड प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. दयानिधी यांनी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधायुक्त दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता यावे याकरिता केंद्र शासनाने जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना १९८६ मध्ये केली. याचा लाभ ग्रामीण क्षेत्रातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे, तसेच आपला सर्वांगिण विकास या विद्यालयाच्या माध्यमातून करुन उच्च पदावरती प्रत्येक विद्यार्थी पोहोचला पाहिजे असे प्रतिपादन केले. अंबुले यांनी, यशस्वी विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे कौतुक केले.
कार्यक्रमात एकूण पात्र ५७ विद्यार्थ्यांपैकी ३८ विद्यार्थी हजर होते. यामध्ये क्रिया कुंवरलाल बघेले आणि धनश्री योगराज बिसेन या दोन दिव्यांग विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश होता. तसेच आमगाव तालुक्यातील दोन, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील एक, देवरी तालुक्यातील तीन, गोंदिया तालुक्यातील चार, गोरेगाव तालुक्यातील १३, सालेकसा तालुक्यातील तीन, सडक-अर्जुनी तालुक्यातील सात व तिरोडा तालुक्यातील दोन अशाप्रकारे विद्यार्थ्यांचा डॉ. राजा दयानिधी, रमेश अंबुले, उल्हास नरड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व गुलाबाचे फुल देवून गौरव करण्यात आला.
संचालन विजय ठोकणे यांनी केले. आभार बाळकृष्ण बिसेन यांनी मानले. कार्यक्रमासाठी कुलदीपीका बोरकर, दिलीप बघेले, मनोजकुमार शेणमारे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला यशस्वी विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व काही गावातील सरपंच उपस्थित होते.
Saturday, 8 June 2019
देवरीची अनुश्री जिल्हयात प्रथम
अनुश्री भेंडारकर देवरी तालुक्यातून प्रथम
देवरी,दि.8- स्थानिक मनोहरभाई पटेल हायस्कूलची अनुश्री हेमंतकुमार भेंडारकर हिने यावर्षी नागपूर बोर्डाने घेतलेल्या 10वीच्या परीक्षेत 95.60 टक्के गुण मिळवून तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
मनोहरभाई पटेल हायस्कूलचा निकाल 68.18 टक्के लागला असून यामध्ये प्राविण्य श्रेणीत 18 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 51, द्वितीय श्रेणीत 55 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये अनुश्री भेंडारकर हिने 95.60 टक्के गुणे घेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. याशिवाय सानिया राजेश देशपांडे 94.40 टक्के, आदित्य नेपालचंद बावणथडे 91.40 टक्के आणि अंकिता रोशण शहारे 90.20 टक्के गुण मिळवून प्राविण्य श्रेणीत स्थान मिळविले आहे.देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
























