राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात करण्यात आली असून त्यांना निम्मे वेतन देण्यात येणार आहे. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के वेतन मिळेल. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.Tuesday, 31 March 2020
मुख्यमंत्र्यासह सर्व लोकप्रतिनिधीचे ६० टक्के तर अधिकारी कर्मचार्याचे ५० टक्के वेतन कपात-उपमुख्यमंत्री पवार
राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात करण्यात आली असून त्यांना निम्मे वेतन देण्यात येणार आहे. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के वेतन मिळेल. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात राज्य नियामक आयोगाची घोषणा

Monday, 30 March 2020
आरोग्य सेविकांचा ‘कोरोना’च्या प्रशिक्षणास जाण्यास नकार
गोंदिया,दि.30 मार्च -नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात देण्यात आज 30 मार्चपासून देण्यात येणाऱ्या ‘कोविड १९’च्या व्हेंटिलेटर प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील महिला आरोग्य सेविकांनी जाण्यास दिला नकार दिल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील ९० आरोग्य सेविकांना नागपूर येथे वैद्यकीय महाविद्यालयात आज सोमवार (३० मार्च)पासून पाच दिवसीय ‘कोविड १९’ व्हेंटिलेटर प्रशिक्षण देण्यात येणार होते. मात्र ९० आरोग्य सेविकांपैकी फक्त १२ आरोग्यसेविका रविवारला जाण्याच्या वेळेपर्यंत जिल्हा रुग्णालयात हजर झाल्या होत्या.त्यातच जिल्हा सामान्य रुग्णालयातील १० आरोग्य सेविकांनाही या प्रशिक्षणाला जायचे होते.मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयातील एकही आरोग्यसेविका नागपूरला जाण्यासाठी न आल्याने जिल्हाप्रशासन या आरोग्य सेविकांच्या मनातील भिती दूर करण्यात अपयशी ठरल्याचे चित्र समोर आले.विशेष म्हणजे जिल्ह्यातच वैद्यकीय महाविद्यालय असताना आरोग्यसेविकांना बाहेरच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षणासाठी का पाठविण्यात येत आहे असा प्रश्न उपस्थित करीत काही आरोग्य सेविकांनी तर साधे व्हेंटिलटर समजत नसतांना त्याचे प्रशिक्षण देणे योग्य आहे का अशा प्रश्नच प्रक्षिणासाठी जायला आलेल्या १२ आरोग्य सेविकांनी करीत प्रशिक्षणास जाण्यास नकार दिला.त्यातच सर्व 900 आरोग्य सेविकांना रविवारला सायंकाळी ४ वाजता रुग्णालयात हजर होण्याचे निर्देश देण्यात आले होते,मात्र सायंकाळचे ६ वाजूनही इतर आरोग्यसेविका उपस्थित न झाल्याने रुग्णालयात हजर झालेल्या १२ आरोग्य सेविकांनीही प्रशिक्षणाकरता जाण्यास नकार दिला.त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील एकही आरोग्य सेविका आजपासून नागपूर येथे सुरु होत असलेल्या प्रशिक्षणाला हजर न होऊ शकल्याने भविष्यात जिल्ह्यात रुग्णसंख्येत वाढ झाल्यास उपचाराच्यावेळी मोठे संकट आरोग्य विभागासमोर निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आत्ता ज्या आरोग्यसेविकांनी प्रशिक्षणाला जाण्यास नकार दिला,त्यांच्याबद्दल काय भूमिका आरोग्य विभाग व जिल्हाप्रशासन घेते याकडे लक्ष लागले आहे.
Sunday, 29 March 2020
टोल बूथ’वर स्थलांतरितांच्या अन्नपाण्याची सोय करा- नितीन गडकरी
Saturday, 28 March 2020
सौंदड येथे अडीच लाखाचा अवैध दारू साठा जप्त
देवरी,दि.28 - राष्ट्रीय महामार्गावरील सौंदड येथे अप्पल पोलिस अधीक्षकांच्या भरारी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे धाड घालून सुमारे अडीच लाख रुपये किमतीची देशी-विदेशी दारू सह मोहफुलाचा सडवा जप्त केला. ही कार्यवाही आज सकाळी (दि.28) रोजी करण्यात आली. याविषयी डुग्गीपार पोलिसांत दोन आरोपींविरुद्ध गन्ह्याची नोंद करण्यात आली.6 पान ठेला संचालकों पर जुर्म दर्ज
घरी राहणे हाच कोरोनापासून बचावाचा उत्तम उपाय- विजय बोरुडे

गौरनगर येथे सॅनिटाइझर औषधी फवारणी
प्रशासन निर्देशाला ठेंगा: सौदंड,आमगाव,इटखेडा व बोंडगावदेवीत भरले आठवडी बाजार
आमगाव/अर्जुनी मोरगाव /सडक अर्जुनी,दि.28:-देशात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी १४ एप्रिल पर्यंत २१दिवस लॉकडाऊन जाहिर करण्यात आले.तसेच संपूर्ण देशात कलम १४४ व संचारबंदी लावण्यात आली आहे. नागरिकांची जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होणार नाही याकरीता स्थानिक जिल्हाप्रशासन वेळोवेळी मार्गदर्शक सुचना देत असतानाही त्या सुचना व निर्देशाकडे दुर्लक्ष करीत आमगाव,अर्जुनी मोरगाव तालुक्याती इटखेडा व बोंडगावदेवी आणि सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे स्थानिक प्रशासनाने गर्दी टाळण्याच्या निर्देशाला ठेंगा दाखवित आठवडी बाजार भरविल्याने नागरिकात चांगलाच रोष उफाळून आला आहे.दरम्यान अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटखेडा व बोडंगाव देवी येथील सरपंच,सचिवासंह काही नागरिवार पोलीस ठाण्यात प्रशासनाच्यावतीने शासन नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.शिरपूर/बांध गावात नो एन्ट्री : कोरोनाला गावाबाहेरच रोखणार, या गावाचा निर्धार
देवरी,दि.28: जमावबंदी, संचारबंदी अशा उपाययोजनांना न जुमानता बाहेर पडणाऱ्या नागरिकांसमोर देवरी तालुक्यातील शिरपुर/बांध या गावाने आपत्कालीन स्थितीआधीच कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी कशी करायची याचा आदर्श घालून दिला आहे.‘लॉकडाऊनचा कालावधी वाढणार’ ; २१ दिवसाहून थेट ३ महिने करण्याचा सरकारचा विचार
(डेस्क न्युज बेरार टाईम्स)ः सध्या पूर्ण राज्यामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. पूर्ण राज्यासहित देशात देखील लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे कोरोना विषाणूला आवरणे सरकारला सोपे पडत आहे. सरकार विषाणूला रोखण्यासाठी योग्य ती कारवाही केली जात आहे. या लॉकडाऊन मध्ये नागरिकांना घराच्या बाहेर पडता येत नाही.घराच्या बाहेर पडला की पोलीस कारवाहीला सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊन पालन करत आहेत. ३१ मार्च पर्यंत कोणीही घराच्या बाहेर पडू नये असे आदेश राज्य सरकारने दिले होते त्यानंतर या प्रकरणाची गांभीर्यता पाहता, केंद्र सरकारने २१ दिवस म्हणजे १४ एप्रिल पर्यंत कालावधी वाढवला.सायकलने नागपूरवरुन निघाले ककोडीचे 16 कामगार
साकोली(राकेश भाष्कर),दि.28ःःकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने २१ दिवसांच्या लॉक डाऊन केला आहे. परिणामी सर्वच बससेवेसह रेल्वे वाहतूक ठप्प पडली आहे. त्यामुळे मजुरीसाठी दुसऱ्या शहर व राज्यात गेलेल्या मजुरांवर मोठे संकट निर्माण झाले आहे.त्यातच गोंदिया जिल्ह्यातील ककोडी भागातील काही मजुर हे कामानिमित्त नागपूरला गेले होते.त्या मजुरांनी साधनाअभावी सायकलने सुमारे 150 किलोमीटरचा प्रवास सुरु केला आहे.लॉकडाउन पुरेसे नाही, गरिबांना बसणार सर्वाधिक फटका - रघुराम राजन
नवी दिल्ली,दि.28 - कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी केवळ लॉकडाउनच पुरेसे नाही, असा इशारा रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे.कोरोनीशी लढण्यासाठी राहुल गांधी, थरूर, अँटोनींनी दिले प्रत्येकी २.६६ कोटी रुपये
थिरुवनंतपुरम,दि.28 - काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, ए. के. अँटोनी आणि शशी थरूर यांनी आपापल्या मतदारसंघांत कोरोना विषाणूविरुद्ध (कोविड-१९) लढण्यासाठी खासदारांना मिळणाऱ्या स्थानिक भाग विकास निधी योजनेतील (एमपीएलएडीएस) पैसा उपलब्ध केला आहे.लॉकडाऊनमध्ये गरिबांच्या व्यथा, वेदना कमी करा; राष्ट्रपती रामनाथ कोविंद
नवी दिल्ली,दि28 - सरकारने लागू केलेल्या पॅकेजची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व राज्यांचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशातील नायब राज्यपाल आणि प्रशासनातील वरिष्ठांनी सक्रिय सहकार्य करावे. लॉकडाऊनच्या काळात गरिबांच्या व्यथा, वेदना कमी करा, असे आवाहन यावेळी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांनी सर्व राज्यांना केले.भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ८७९ , २० जण दगावले
नवी दिल्ली,दि.28 : भारतात शुक्रवारी आणखी चौघांचा मृत्यू झाल्याने कोविड-१९ रोगाने मरण पावलेल्याची संख्या २० झाली असून संसर्गित रुग्णांची संख्या ८७९ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, गेल्या २४ तासांत नवीन ७५ रुग्ण आढळले.एकीकडे भारतात लॉकडाऊनसोबत तपासणीला गती दिली जात असताना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंताजनक बाब आहे. शुक्रवारी केरळमध्ये ३९ आणि मुंबईत कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले ९ रुग्ण आढळले. जम्मू-काश्मिरमध्ये आणखी चौघांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून यापैकी दोघे विदेशातून आले होते.Friday, 27 March 2020
लॉकडाऊनमुळे मजुरांचा गोंदिया ते बैहर दोनशे कि.मी.चा पायी प्रवास
गोंदिया,दि.२७ : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने २१ दिवसांच्या लॉक डाऊन केला आहे. परिणामी सर्वच रेल्वेसह सर्वच वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे मजुरीसाठी दुसऱ्या शहर व राज्यात गेलेल्या मजुरांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. मध्यप्रदेशातील मंडला मजुरांना गावाकडे परतण्यासाठी कुठलेही साधन न मिळाल्याने त्यांनी शुक्रवारी (दि.२७) पहाटेपासून गोंदिया ते मंडला हे दोनशे कि.मी.चा प्रवास रेल्वे मार्गाने पायीच सुरू केला.मध्यप्रदेशातील मंडला बैहर येथील १३ मजूर मुंबई येथे मजुरीच्या कामासाठी गेले होते. मात्र कोरोनामुळे तेथील काम बंद झाल्याने त्यांना संबंधित ठेकेदाराने गावाकडे परत जाण्यास सांगितले. त्यामुळे हे सर्व मजूर २४ मार्च रोजी गोंदिया येथे कसे तरी पोहचले. मात्र यानंतर देशभरात सर्वत्र लॉकडाऊन व राज्य आणि जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या. तर रेल्वेसह इतर वाहतूक ठप्प झाली. खासगी वाहने सुध्दा बंद असल्याने त्यांना मंडला बैहर येथे जाण्याची अडचण निर्माण झाली. त्यांनी गोंदिया येथे दोन दिवस कसे बसे काढले. मात्र आता त्यांच्याकडील पैसे संपल्याने आणि जेवणाची देखील सोय नसल्याने उपाशी राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. दरम्यान शुक्रवारी पहाटे ४ वाजताच या सर्व १३ मजुरांनी पायीच आपल्या गावाला जाण्याचा निर्धार केला. यानंतर गोंदियाहून बालाघाटकडे जाणाºया रेल्वे मार्गाने त्यांनी आपल्या सामानासह गोंदिया ते मंडला बैहर या दोनशे किमीच्या पायी प्रवासाला सुरूवात केली. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय असून यात काही लहान मुलांचा सुध्दा समावेश आहे.लॉकडाऊनमुळे सध्या विविध राज्यात कामासाठी गेलेले मजूर आपल्या गावाकडे परतत असताना अनेक ठिकाणी फसले आहे. मात्र शासनाने अद्यापही अशा लोकांची कुठलीच व्यवस्था केली नाही. त्यामुळे या मजुरांना उपाशी तापाशी आणि पायी आपले गाव गाठण्याची वेळ आली आहे.खासगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवू नयेत परराज्यातील अडकलेल्या नागरिकांची काळजी घेणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई दि 27: खासगी डॉक्टर्सनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये असे आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांतून प्रवासी प्रवास करताना केली जाईल . राज्यांच्या सीमा बंद असून आता इतर राज्यांतील अडकलेल्या नागरिकांची राज्य शासन काळजी घेईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.कोरोना जैसी आपदा से निपटने हेतु सासंद निधीसे भंडारा-गोंदिया जिला प्रशासन को 25-25 लाख
गोंदिया,27 मार्च। संपूर्ण भारत में वैश्विक महामारी से सबसे अधिक जूझ रहे महाराष्ट्र में इस कोरोना वायरस (कोविड-19) की रोकथाम हेतु केंद्र व राज्य सरकार द्वारा भरपूर प्रयास किये जा रहे वही अनेको उपाय योजनाओं के तहत संचारबदी कर लोंगो को एहतियात बरतने की सलाह दी जा रही है।आज राष्ट्रवादी काँग्रेस के नेता एंव पूर्व केंद्रीय मंत्री व राज्यसभा सासंद प्रफुल पटेल ने इस आपदा पर गंभीर चिंता व्यक्त करते हुए इससे निपटने हेतु सभी लोगो को सहयोग करने की अपील कर घरों में ही रहने की हिदायत दी है।सासंद पटेल ने गोंदिया एंव भंडारा जिले के जिलाधिकारी से बातचीत कर संकट के इस दौर से निपटने हेतु अपनी सासंद विकास निधि से 25-25 लाख रुपये देने की घोषणा की है।गोंदियात निघाला कोरोनाचा रुग्ण
Wednesday, 25 March 2020
पोलीस अधिकाऱ्याची हिंगोलीत जमादारासह त्यांच्या मुलीस मारहाण
जिल्ह्यात स्वयंस्फुर्तीने गावबंदी,तहसिलदार गावभेटीवर
गोंदिया,दि.25ः- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या जमावबंदीला साथ देत जिल्ह्यातील गावकऱ्यांनी गावबंदीचा आदेश काढून गावाच्या सीमा बंद केल्या आहेत.जिल्ह्यात गोरेगाव तालूक्यातील चिचगाव व सटवा गावात गावबंदी करण्यात आली आहे.या गाावतील नागरिकांनी गावाच्या सीमेवरील रस्त्यावर झाडे कापून आडवी घातली आहेत. गावात कुणी बाहेरून न विचारता आला तर अडीच हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील कोणत्याही व्यक्तीला बाहेर निघताना गावकºयांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयात आग;सीसीटीव्ही कंट्रोल रुम जळून खाक
वर्धा,दि.25ः- -येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षाला आज 25 मार्च रोजी अचानक आग लागल्याने सीसीटीव्ही कंट्रोल रुम जळुन खाक झाल्याची घटना घडली आहे.शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून या आगीमुळे पोलीस यंत्रणेत अचानक खडबळ माजली आहे. पोलिसांनी धावपड करीत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.गोंदिया विधानसभा व्हाटसपगृपच्या एका सदस्याने चुकीचा संदेश फिरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल
गोंदिया,दि.25ः गोंदिया शहर पोलीस ठाणेतंर्गत शहरातील नामाकिंत असलेल्या गोंदिया विधानसभा या व्हाटसअप सोशल मिडिया गृपमधील एका सदस्याने कुठले दुकान किती वाजता उघडणार अशा आशयाची पोस्ट घालून जनतेपर्यंत चुकीची माहिती पसरविल्यामुळे जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या आदेशाने गोंदिया शहर पोलीस ठाण्यात त्या सदस्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.कोरोनाचा प्राद्रुर्भाव रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असून देशभरात लाॅकडाऊन लागू करण्यात आले आहे.सोबतच धारा 144 पण लागू करण्यात आले असून जनतेला जिवनावश्यक वस्तु वेळेवर उपलब्ध होतील याबद्दल प्रशासन माहिती देत असतानाच गोंदिया विधानसभा व्हाटसअप गृपच्या एका सदस्याने चुकीची पोस्ट घातल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा दुरुपयोग झाल्याने सरकार तर्फे फिर्यादि पोहवा प्रीतम खामले यांच्या तक्रारीवरुन कलम 188, 505 सहकलम 52,54 के अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सपाटे करीत आहेत.
राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता 116
मुंबई,(वृत्तसंस्था),दि.25 – महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 116 झाल्याची माहिती बुधवारी प्रशासनाने जाहीर केली असे पीटीआयने म्हटले आहे. यात मंगळवारी रात्री सापडलेल्या 5 नव्या कोरोना व्हायरस रुग्णांची भर पडली आहे. हे सर्व पाच रुग्ण सांगली जिल्ह्यातील एकाच कुटुंबाचे सदस्य आहेत. तर बुधवारी मुंबईत 4 नवे रुग्ण सापडले आहेत.उल्लेखनीय बाब म्हणजे, महाराष्ट्रात मंगळवारी एकूण 10 नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर सोमवारी राज्यात 8 कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण सापडले होते.
‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक गावात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती
प्रियंका मेश्रामचा पोलिस स्टेशन आमगाव येथे सत्कार
आमगांव,दि.25- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाचा निकाल मंगळवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. त्यात ३८७ विद्याथ्र्यांची निवड करण्यात आली एमपीएससी तर्फे ३८७ पदासाठी १३ मे २०१८ रोजी पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. मुख्य परीक्षा दोन सप्टेंबर तर डिसेंबर मध्ये शारीरिक चाचणी घेण्यात आली. त्या परीक्षचा अंतीम निकाल जाहीर झाला दोन वर्षापासून उमेदवारांचे निकालाकडे लक्ष लागले होते. ३८७ उमेद्वारामध्ये खुल्या प्रवर्गातील ६६, महिला ३८, क्रिडा १०, मागास प्रवर्ग ३३, मागास प्रवर्ग महिला १५, ओबीसी ६६, ओबीसी महिला ६६ असा समावेश आहे. या निकालात आमगाव तालुक्यातील कुंभारटोली येथील प्रियंका खेमराज मेश्राम (डोंगरे) यांनी मागास प्रवर्ग महिला गटातून ५ वा क्रमांक प्राप्त करून आमगाव तालुक्यात महिला पीएसआय होण्याचा मान मिळविला आहे.लग्नसमारंभ आयोजकावर गुन्हा दाखल
गोंदिया,दि.25 :-राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता जमावबंदी आणि संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. तसेच सगळे सामाजिक कार्यक्रम, विवाह समारंभ तसेच स्वागत समारंभ रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गोंदिया जिल्हाधिकाèयांनीही तसेच आदेश जारी केले आहेत. मात्र ग्रामीण भागात याची पायमल्ली होत आहे. अजूनही नागरिकांना या आजाराचे गांभीर्य लक्षात येत नाही. हे दुर्दैव आहे. प्रशासन आणि पोलिसांच्या वतीने तसेच माध्यमांमधून सतत याविषयीची जागृती सुरू आहे, तरीही लोकांनी आपले कार्यक्रम, समारंभ सुरूच ठेवले आहेत.देवरी पं.स.बिडीओचा शासन निर्णयाला ठेंगा
आज रात्री 12 पासून देशभरात 21 दिवस लॉकडाऊन – नरेंद्र मोदी
कोरोनाशी लढाः मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक दिवसाचा पगार देणार
Sunday, 22 March 2020
गोंदिया जिल्ह्यात जनता कर्फ्यू : रस्ते पडलेओसाड
गोंदिया,दि.22 : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी राज्यातील १० महानगरे पूर्णपणे लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभुमीवर शनिवारी (दि.२१) जिल्ह्यातील आठ ही तालुक्यात जिल्हाप्रशासनाच्या आदेशावर स्थानिक नगर परिषद व नगर पंचायत प्रशासनाने संपूर्ण बाजारपेठ पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले. आज(दि.22) सकाळपासूनच संपूर्ण देशात जनता कर्फ्यू पुकारण्यात आले असून गोंदिया जिल्ह्यातील जनतेने त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद दिलेला. व्यापारी प्रतिष्ठाने आणि इतर दुकाने सर्व बंद ठेवण्यात आली. भाजीबाजारासह औषधांचेही दुकाने आज बंद ठेवण्यात आल्याने रस्त्यावर शुकशुकाट बघावयास मिळाला. गोंदियातील मुख्य बाजारपेठी,जयस्तंभ चौक,फुलचूर नाका,अवंतीबाई चौक,कुडवा नाका परिसरातील रस्ते निर्मनुष्य झाले असून मुख्य रस्तावरील वाहतुकही ओसरली आहे.गावखेड्यातही चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. दरम्यान, देवरी शहरात ही कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्यात आला. राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची चाके सुद्धा थांबल्याचे चित्र होते.सायंकाळी देवरीकरांनी थाळी, टाळ्या,शंख वाजवून तर काहींनी फटाके फोडून पोलिस, आरोग्य आणि सफाई कर्मचाऱ्यांचे आभार मानले.देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...










