Monday, 31 December 2018
पदमपूर येथे नाटककार भवभूतींचे स्मारक उभारा
Sunday, 30 December 2018
गडचिरोलीत पोलिसांसाठी आता गोंडी, माडिया भाषेची परीक्षा
Saturday, 29 December 2018
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ‘लॉयन्सचा डबा’ उद्या रविवारी सुरू होणार
Friday, 28 December 2018
... अखेर चेतन उईके या शिक्षकाचे निलंबन मागे
जि.प.च्या सर्वसाधारण सभेत गुंजणार उईकेंच्या निलंबनाचा प्रश्न?
गोंदिया,दि.28ः- गोंदिया जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज 28 डिसेंबरला सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.सुरवातीला या सभेत ईव्हीएम व व्हीव्हीपीटी पॅटबद्दल निवडणुक विभागाच्यावतीने माहिती देण्यात येणार आहे.त्यानंतर सुरु होणार्या या सभेत देवरी पंचायत समितीचे शिक्षक चेतन उईके यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या निलबंनावर सभा गाजण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.उईके यांनी समाजहितासाठी काम करतांना समाजाला जागृत करणारे विचार कार्यक्रमात मांडले तसेच आदिवासी समाजातील मुलीवंर झालेल्या अत्याच्याराच्या विरोधात रजा घेऊन आंदोलनात सहभाग नोंदविल्याच्या वृत्तपत्रीय बातम्यांच्या आधारावर त्यांचे निलबंन करण्यात आले आहे.वास्तविक उईके यांनी कुठलेही चुकीचे काम केलेले नसताना निलबिंत करण्यात आले.तर याच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात असे काही शिक्षक आहेत ज्यांनी शाळेतील अल्पवयीन मुलीवंर अत्याचार करुन विनयभंग केल्याच्या घटना समोर आल्या आणि पकडल्या गेल्या अशा काही शिक्षकाला अद्यापही निलबिंत करण्यात आले नसल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सुत्रांनी दिली.एकीकडे विनयभंग व अत्याचार करणारे शिक्षक मोकळे तर समाजासाठी झटणारा शिक्षक निलबिंत होत असल्याने मु्ख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद अध्यक्ष व शिक्षणाधिकारी यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आजच्या सभेत विरोधी पक्षाचे सदस्य धारेवर धरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Thursday, 27 December 2018
मतदान यंत्राबाबत मतदारांमध्ये विश्वास निर्माण करा-जिल्हाधिकारी लक्षीनारायण मिश्रा
Wednesday, 26 December 2018
देवरी येथे वीज कामगारांची द्वारसभा
खजरी येथे रस्ता सुरक्षा विषयावर जनजागृती शिबीर
![]() |
उपस्थितांना मार्गदर्शन करताना सपोनि पवार आणि उपस्थित मान्यवर |
आयोजित या शिबिराचे अध्यक्षस्थानी सरपंच सत्यशिला गायकवाड ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच नरेंद्र दिहारी, महामार्ग पोलिस केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस पाटील इंद्रराज राऊत,फौजदार कावळे, ग्रामसेवक जी. आर. भेलावे आदी मान्यवर उपस्थित होते.
![]() |
वाहनांवर रिफ्लेक्टर लावताना पोलिस कर्मचारी |
Tuesday, 25 December 2018
माओवाद्यांच्या संपर्कातील वैज्ञानिकास बाघनदी परिसरात अटक
देशाला हिंदू राष्ट्र नव्हे तर प्रबुद्ध भारत बनवण्याची गरज : कन्हैय्या कुमार
भाजपने केंद्रात सत्तेवर येताच भेल बंद पडला- शरद पवार
अभियंता रामटेककरांच्या पुढाकाराने निराधार मानसिक रुग्ण महिलेस मिळाला शासकीय आसरा
Monday, 24 December 2018
ब्लॉसम स्कुलची वनविभागाच्या रोपवाटीकेला शैक्षणिक भेट
तालुक्यातील लोकप्रिय आणि नवनवीन संकल्पना राबविणाऱ्या ब्लॉसम स्कुलच्या विध्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या संकल्पनेतून वनविभागाच्या रोप वाटिकेला भेट दिली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जितेंद्र वंजारी (वनक्षेत्रसाहाय्यक)
चारूलता वंजारी (वनक्षेत्रसाहाय्यक), वन विभागाचे अनिल कोराम आणि रघुनाथ येरने प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर क्षेत्रभेटीच्या सुरुवातीला प्रमुख मार्गदशकांचे शाळेच्या वतीने भेटकार्ड देऊन स्वागत करण्यात आले.
पर्यावरणातील रोपट्यांचे आणि वृक्षांचे महत्त्व याविषयावर अतिथीनी सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रकाशसंसलेशन प्रक्रियेची माहिती यावेळी सविस्तरपणे सांगण्यात आली.
बीज प्रक्रिया (जर्मिनेसन) आणि रोपट्यांचे काळजी या विषयावर सदर भेट आयोजित करण्यात आलेली होती या विषयावर वनविभागाचे अधिकारी यांनी प्रत्येक्षात चालणारी कार्यपद्धती बीज प्रकिया , मातीचे प्रमाण, माती आणि सेंद्रिय घटकाचे प्रमाण याचे प्रात्यक्षिक देऊन विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
रोपवाटिकेत वाढविलेल्या सर्व जातीच्या रोपांचे आणि वृक्षाचे जीवशास्त्रीय नावे सांगण्यात आली.
विद्यार्थ्यांनी प्रत्येक्षात रोपवाटिकेत एक अनोखा अनुभव घेतला.
सदर रोपवाटीकेच्या यशस्वी भेटीसाठी सहायक शिक्षक विश्वप्रीत निकोडे, स्वप्नील पंचभाई, राहुल मोहुर्ले, वैशाली मोहुर्ले यांनी सहकार्य केला.
सामाजिक नैतिकता जपण्यासाठी स्वत:पासून सुरूवात करा- गोमती तितराम

सत्तेवर येताच धानाचे मूल्य अडीच हजार रुपये करू-शरद पवारांची पत्रपरिषदेत माहिती
पंतप्रधान हे पद लोकशाहीत वरच्या स्तराचे आहे. देशाच्या स्वतंत्र्यानंतर एकाही पंतप्रधानाने त्या पदाची अवमानना होईल असे भाष्य केले नव्हते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाची गरीमा न ठेवता महिला आणि इतरांवर वैयक्तिक भाष्य करून त्या पदाची अवमानना केली. हे त्यांना शोभणारे नाही. येत्या ५ ते ६ महिन्यात निवडणुका लागणार आहेत. आता देशातील जनता या खोटे बोलणाºया सरकारला कंटाळले आहेत. त्यामुळे सत्ता बदल होणार आहे. जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवातीला मी शरद पवार यांचा सल्ला घेतो असे म्हणत होते. यावर पत्रकारांनी शरद पवार यांना विचारणा केली असता सुरुवातीच्या एक ते दीड वर्षापर्यंत ते अधुन-मधून फोन करायचे. मात्र, आता माझा सल्ला तर सोडा स्वत:च्या पक्षातील खासदार आणि मंत्र्यांना देखील जुमानत नाही. यावरून त्यांच्या कार्यकुशलतेचा अंदाज येतो, असेही पवार म्हणाले.
Saturday, 22 December 2018
वायफाय सुविधेचा उपयोग ज्ञानवर्धनासाठी करा - ना. सुधीर मुनगंटीवार
आर्ची-परश्याने जिंकली गोंदियावासींची मने
मिलिंगच्या तांदळाचा ट्रक सीडब्लूसीने पाठविला परत
Wednesday, 19 December 2018
Tuesday, 18 December 2018
शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘लोक संवाद’
* प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी 1 जानेवारीला संवाद
गोंदिया, दि. 18 : शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वत:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लोक संवाद’ साधून जाणून घेणार आहे. त्यासाठी या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाआहे. 1 जानेवारी 2019 रोजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधणार आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी व ग्रामीण), उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना,छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना,प्रधानमंत्री पीक विमा योजना,मागेल त्याला शेततळे,गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना,सुक्ष्म सिंचन आणि मृदा परीक्षण सारख्या या योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी राज्यशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांचा आढावा घेतला आहे. आता या विविध योजनेतील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री थेट संवाद साधणार असून 1 जानेवारी रोजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी ‘लोक संवाद’ कार्यक्रमाद्वारे याचा शुभारंभ होणार आहे.
मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची ईच्छा असणाऱ्या आणि प्रधानमंत्री आवास योजना व त्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या इतर पूरक योजना यांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी आपले नाव, संपर्क क्रमांक-पत्ता आणि योजनेचा लाभ घेतल्याची माहिती av.dgipr@maharashtra.gov.in या ईमेलवर आणि 8291528952 या व्हॉट्स ॲप क्रमांकावर दिनांक 28 डिसेंबरपर्यत पाठविण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क संचालनालयाने केले आहे.
ईच्छूक लाभार्थी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती अधिकारी यांचे कडेही दिनांक 28 डिसेंबरपर्यंत माहिती पाठवू शकतात.
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...