Friday, 29 November 2019

प्रा. भांडारकर व प्रा. पालीवाल उत्कृष्ट संशोधन पुरस्काराने सन्मानित

नागपुर:27 मनोहरभाई पटेल महाविद्यालयातील देवरी येथील प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सुधीर भांडारकर व शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालय अर्जनी मो. चे प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. गोपाल पालीवाल यांना नुकत्याच पार पडलेल्या विद्यान, तंत्राद्यान व ग्रामीण विकास या विषयावर आधारित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात उत्कृष्ट संशोधन पुरस्कार स्वरुपात शाल, श्रीफळ, सन्मानचीन्ह, प्रशस्तिपत्र व रोपटे देऊन वाइल्डलाइफ इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे वरिष्ठ वैद्यानिक डॉ बिलाल हबीब व श्री शिवाजी शिक्षण संस्थाचे विश्वस्त श्री दिलीप इंगोले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळेस विद्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महेंद्र ढोरे, चर्चासत्राचे संयोजक डॉ अतुल बोबडे

तसेच संस्थेचे अनेक विश्वस्त व अनेक विद्वान मंडळी उपस्थित होती. प्रा भांडारकर व प्रा पालीवाल या संशोघकद्वयानी गोंदिया जिल्हयातिल जैवविविधतेचा अनेक अभ्यास करुन तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्टित संशोधन पत्रिकेत प्रकाशित केला आहे. त्यांचे आतापर्यंत ५२ संशोधन  प्रकाशित झाले आहेत. या आधी सुद्धा त्यांना अनेक सन्मान लाभले आहेत. त्यांनी या यशाचे श्रेय प्राचार्य डॉ अरुण झिंगरे व प्राचार्य डॉ दिलीप काकड़े तसेच यांना दिले आहे . त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Wednesday, 27 November 2019

माझ्याकडून प्रत्येक काम सर्वोत्तम व्हावे - शिवानी दाणी

लाखनी: 27
धन्य धन्य झाशीची राणी गीताने दुमदुमली राणी शाळा

स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनी द्वारा संचालित राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय येथे तीन दिवशीय राणी लक्ष्मीबाई जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून सुप्रसिद्ध वक्ते आणि सिनेट सदस्य शिवानी दाणी,अध्यक्ष स्थानी आल्हाद भांडारकर, मधुकर लाड, भक्ती आमटे, मुख्याध्यापिका दिशा गद्रे, संमेलन प्रमुख बाबुराव निखाडे, गोवर्धन शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते.
राणी लक्ष्मीबाई जन्मोत्सवानिमित्य वीर गाथा सांगत माझ्याकडून प्रत्येक काम हे सर्वोत्तम व्हावे, या देशाला सुपर पवार बनविण्यासाठी मी योग्य भूमिका घेतली पाहिजे. आपली स्पर्धा ही स्वतः सोबत करावी. आपण एकमेव अद्वितीय आहोत. आपणच आपले शिल्पकार आहेत. यामुळे आपण नेहमी प्रयत्न करत राहावे. प्रामाणिक पण आपले कार्य केले तर यश आपल्याला मिळेल असे आपल्या प्रमुख मार्गदर्शनात शिवानी दाणी बोलत होते. यावेळी कला, विज्ञान व गाईड प्रदर्शनीचे उद्घाटन आणि अवलोकन केले. तसेच विद्यार्थिनी प्रतिनिधी लक्ष्मी अतकरी हिने विद्यालयाचा अहवाल सादर केला.
मातापालक संघातील कार्यक्रमात अध्यक्षस्थानी डॉ सोनाली भांडारकर यांनी किशोरावस्थेतील आव्हाहने पेलतांना या विषयावर किशोरावस्थेत घ्यावयची काळजी आणि आहारावर मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते बाल विकास प्रकल्प अधिकारी शीतल फाळके यांनी स्वतः चा आदर करून आपले भाव विश्व जोपासवे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच तिसऱ्या दिवशी कार्यक्रमाचा समापन सोहळा बक्षीस वितरणाने करण्यात आला. यावेळी समापन सोहळ्याला शिवलाल रहांगडाले, गट शिक्षणाधिकारी सुभाष बावनकुळे, सरपंच सुनीता भालेराव, नगराध्यक्ष ज्योती निखाडे, सावरी ग्राम पंचायत सरपंच संजीवनी नान्हे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक भाऊराव चेटूले, संचालन विद्या सारवे आणि आभार सहसंयोजक रेखा घावडे यांनी व्यक्त केले.

नेहरू युवा केंद्र भंडारा द्वारे जीवन कौशल्य सात दिवशी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

लाखनी: 27

स्थानिक  येथील गांधी विद्यालय लाखनी येथे  नेहरू युवा केंद्र भंडारा द्वारे जीवन कौशल्य सात दिवशी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन आशा कवाडे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भंडारा, अनिल महले, हितेश वैद्य, जिल्हा समन्वयक भंडारा, रमेशराव अहिरकर, डी टी देव्हारे, प्राचार्य गांधी विद्यालय लाखणी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन समारंभात अशा कवाडे बोलताना विद्यार्थ्यांनी जीवन जगत असताना कौशल्य भिमुख शिक्षण घेणे देणे आवश्यक आहे यामुळेच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्किल्ल एज्युकेशन म्हणजेच कौशल्य शिक्षणाचा आपल्या शिक्षणामध्ये अंतर्भूत केले आहे. कला जीवनात उपयोगी अशी जमेची बाजू आहे. अनिल महले यांनी विद्यार्थ्यांना मुलाखतीला जाण्याचे तंत्र अवगत केले.यासोबतच त्यांनी स्पर्धा परीक्षा बाबद विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सीमा बावनकर समुपदेशन ग्रामीण रुग्णालय लाखणी हे पुढील पाच दिवस या प्रशिक्षण वर्गाला मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत गांधी विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांनी भाग घेतला असून नेहरू युवा केंद्राद्वारे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समनव्यक हितेश वैद्य यांनी तसंचालन युवा कोर प्रतिनिधी अश्विनी मुरकुटे तसेच आभार शितल खंडाईत यांनी मानले.

27 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरचा बेरार टाईम्स अंक तसेच बातम्यासांठी क्लिक करा-berartimes.com





Tuesday, 26 November 2019

जयंत पाटील हेच राष्ट्रवादीचे गटनेते- विधिमंडळ सचिवालय

Image result for जयंत पाटीलमुंबई,दि.26 - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळ गटनेते म्हणून विधिमंडळ सचिवालयात जयंत पाटील यांचीच अधिकृत गटनेते म्हणून नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.
विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांचे अनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने विधिमंडळ गटनेतेपदाच्या निवडीचे पत्र सोमवारीे दिले आहे. त्यानुसार जयंत पाटीलच गटनेते असतील. त्यामुळे ते वा त्यांनी ज्यांची प्रतोद म्हणून निवड केली असेल त्यांचाच ‘व्हीप’ अधिकृत असतो.भागवत म्हणाले, विधिमंडळ गटनेत्याची निवड पक्षाचा अध्यक्ष वा सरचिटणीस करतो. निवडीची माहिती ३० दिवसांत विधानसभा अध्यक्ष वा विधान भवनाच्या सचिवांकडे द्यावी लागते. शिवसेनेने गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केल्याचे पत्र दिले आहे.राज्यपाल व विधिमंडळ या दोन स्वतंत्र घटनात्मक संस्था आहेत. दोन्ही ठिकाणी गटनेता निवडल्याची माहिती द्यावी लागते. राष्ट्रवादीने राज्यपालांकडे कोणती माहिती दिली हे विधानसभाध्यक्षांना ठाऊक नसते. राष्ट्रवादीने अजित पवार यांची निवड केल्याची माहिती अध्यक्षांना कळवली नव्हती. त्यामुळे त्यांना विधिमंडळ गटनेता समजता येणार नाही. आता जयंत पाटील यांच्या निवडीची माहिती दिल्यामुळे तेच पक्षाचे विधिमंडळ गटनेते असतील.तो अधिकार पक्षाचाचराष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते म्हणून अजित पवार यांच्या नावाची नोंद पक्षाने विधान मंडळाकडे केलेली नाही.

Saturday, 23 November 2019

सत्ता स्थापनेवर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

गोंदिया,दि.23 : राज्यात पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा करत एकच जल्लोष केला.  भाजप जिल्हा कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येवून मिठाई वाटून तोंड गोड केला व शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यालयासमोर व जयस्तंभ चौकात आतिशबाजी करून ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो ’ व ‘भारत माता की जय’चे नारे लावण्यात आले. तिरोडा येथे आमदार विजय रहागंडाले यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
यावेळी प्रामुख्याने माजी आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आ. रमेश कुथे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नेतराम कटरे, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार बिसेन, दिपक कदम, दिनेश दादरीवाल, मनोहर आसवानी, शहर अध्यक्ष सुनिल केलनका, जिल्हा संपर्क प्रमुख संजय कुलकर्णी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जयंत शुक्ला, मिनू बडगुजर, अशोक हरिणखेडे, गणेश हेमणे, प्रदिपसिंह ठाकूर, शंभुशरणसिंह ठाकूर, रमेश दलदले, राजेश चतुर ,जीवन  जगणित, नगरसेवक दिलीप गोपलानी, हेमलता पतेह, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री ऋषीकांत साहू, कुणाल बिसेन, नरेंद्र तुरकर, मुजीब पठान, चैतन्य सोनछात्रा,  सतीश मेश्राम, अमित झा, संजय मुरकुटे, शहर महामंत्री बाबा बिसेन, मुकेश चन्ने, अशोक जयसिंघानी, राजा कदम, धर्मेंद्र डोहरे, चंद्रभान तरोणे, योगराज हरिणखेडे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष नेत्रदीप गावंडे, नितीश शाह, राजू शुक्ला,  यासीन शेख,  बाळकृष्ण मुनेश्वर,  हरिराम आसवानी, विनोद चांदवानी, प्रशांत कोरे, बबली ठाकूर, मोंटू पुरोहित, देवचंद नागपुरे, कुलदिप रिनाईत, भावेश चौरसिया, ऋतुराज मिश्रा, संदीप श्रीवास, पलास लालवानी, राकेश लांजेवार, पारस पुरोहित, दिपक मालगुजार, दिपल अग्रवाल, विन्नी गुलाटी,अजिंक्य इंगळे, बंटी शर्मा, कमलजित सिंग, गणेश जाधव, श्रीकांत चांदुरकर, रितेश जायस्वाल, मंगलेश गिरी, प्रवीण पटले, देवेंद्र अग्रवाल, संकेश तिवारी, रामेश्वर लिल्हारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अर्जुनी-मोर तालुका भाजपा पक्ष कार्यालयात चार वाजता फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी तालुका भाजपा अध्यक्ष उमाकांत तोडेंगे कार्यकारी अध्यक्ष तथा पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर, जि प सदस्य रचना गहाणे, केवलराम पुस्तोडे, शिवनारायण पालीवाल, रघुनाथ लांजेवार, प्रकाश गव्हाणे, तुषार पवाडे, गिरीश बागडे, जि प सदस्य सौ मंदाताई कुमरे व इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी छोटेखानी सभेत मान्यवरांनी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला व पक्ष कार्यालयासमोर फटाके फोडून विजयोत्सव साजरा केला.

Thursday, 21 November 2019

माजी आ.नागपुरे,रहागंडालेसह मदन पटले भाजप अध्यक्षपदाच्या स्पर्धेत

गोंदिया,दि.21 : भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणुकासंदर्भात आज २१ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन गोरेगाव येथील  गुरूकृपा लॉन मध्ये दुपारी १२ वाजता करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बुथ अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष व जिल्हाध्यक्षांची निवडणुक व कार्यकारिणीचे गठन १५ डिसेंबरपर्यंत करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
त्यानंतर 1 डिसेंबरपर्यंत जिल्हाध्यक्षाची निवड करावयाची आहे.भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांचा कार्यकाळ संपत असल्याने नव्या अध्यक्षपदासाठी आत्तापासूनच चुरस निर्माण झाली आहे.माजी मंत्री राजकुमार बडोले यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष बनविण्यासंदर्भात हालचाली सुरु झालेल्या असतानाच त्यांनी आपण अध्यक्षपदापासून दूर राहणार असे संकते दिल्यानंतर आता या पदासाठी माजी आमदार भैरसिंह नागपुरे,माजी आमदार खोमेश रहागंडाले व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मदन पटले यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याचे बोलले जात आहे.पक्षातील युवकामध्ये नवा व युवा चेहरा अध्यक्ष असावा असा एक मत सुरु झाला असून मदन पटले यांच्या नावावर जिल्ह्यातील अनेक भागातून पसंती मिळत असल्याची चर्चा भाजपच्या गटात आहे.त्यामुळे दोन्ही माजी आमदारावर मदन पटले वरचढ ठरतात की हे दोन्ही आमदार पटलेवरं वरचढ ठरतात याकडे लक्ष लागले असले तरी जोपर्यंत संघटनमंत्री व पुर्व विदर्भ संघटनप्रमुख आपली मर्जी सर्वप्रकराची दाखविणार नाही,तोपर्यंत या तिघापैकी कुणालाही अध्यक्ष होता येणार नाही असेही बोलले जात आहे.
त्या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यशाळेत निवडणुक पर्यवेक्षक म्हणून विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष चैनसुख संचेती व प्रदेश प्रवक्ता आ. गिरीश व्यास उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रामुख्याने  खा. अशोक नेते, आ. विजय रहांगडाले, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आ. केशव मानकर, माजी आ. भजनदास वैद्य, माजी आ. भेरसिंह नागपुरे, माजी आ. संजय पुराम, माजी आ. रमेश कुथे, माजी आ. गोपालदास अग्रवाल व सर्व माजी खासदार, आमदार व प्रदेश कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहे.
दरम्यान संघटनात्मक निवडणुकीत भाग घेण्यासाठी सर्व अपेक्षितांना भारतीय जनता पार्टीचे सक्रीय सदस्य असणे बंधनकारक असल्याने कार्यशाळा सुरू होण्याआधीच सक्रिय सदस्यत्व फार्म शुल्कासह भरावे लागणार आहे. यावेळी छाननी प्रमुख म्हणून खा. अशोक नेते व सहप्रमुख म्हणून माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आ. भेरसिंह नागपुरे राहणार आहेत.
कार्यशाळेत प्रामुख्याने जिल्ह्यातील सर्व जिल्हा पदाधिकारी, निमंत्रित सदस्य, जिल्हा आघाडी व सेलचे अध्यक्ष, महामंत्री, सर्व मंडळ अध्यक्ष व महामंत्री, सर्व शक्ति केंद्रप्रमुख, सर्व जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती पदाधिकारी, सदस्य व लोकप्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, महामंत्री संघटन विरेंद्र अंजनकर, जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर यांनी केले आहे.

केंद्रस्तरीय चौथी शिक्षण परिषद हलबीटोला येथे संपन्न


गोंदिया,दि.21-गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या खमारी केंद्रातील हलबीटोला येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय चौथ्या शिक्षण परिषदेचे आयोजन काल मंगळवारी (दि.20) करण्यात आले होते. 
या शिक्षण परिषदेचे उद्घाटन एन डी करंजेकर यांच्या अध्यक्षतेत अंजली ब्राम्हणकर यांचे हस्ते करण्यात आले.  यावेळी मुख्याध्यापिक यशोधरा सोनवाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक  अंजली ब्राम्हणकर यांनी केले आर सी टेंभरे आणि मीनल बैस यांनी इंग्रजीसह गणित पेटीचा वापर व साहित्यासह प्रत्यक्ष अध्यापन याविषयी मार्गदर्शन केले. मूल्यवर्धन तासिकेत श्री चौधरी यांनी नवीन ऊर्जा देण्याचे कार्य केले.  श्रीमती राहुलकर यांनी अपंग विद्यार्थी व त्यांची गुणदान पद्धत वर मार्गदर्शन केले.  विपश्यना तासिकेत उके व खांडेकर या शिक्षकांनी वैयक्तिक व शालेय जीवनात कशाप्रकारे संधीचे सोने करता येईल व यावर सखोल मार्गदर्शन केले.  
                     

शेडेपारच्या शाळेत पालकसभा उत्साहात

देवरी,दि.21- तालुक्यातील शेडेपार येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत नुकतीच आयोजत केलेली पालकसभा आयमोठ्या उत्साहात पार पडली.
 या पालक सभेच्या अध्यक्षस्थानी छायाताई हटवार ह्या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सभेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता याविषयी सखोल चर्चा करण्यात आली. शालेय समस्यांवर सुद्धा यावेळी चर्चा करण्यात आली. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अरविंद नंदागवळी यांनी केले.
सभेचे संचलन एम.के.चव्हाण आणि ए व्ही मेश्राम यांनी केले. उपस्थितांचे आभार डी डी उईके यांनी मानले. सभेला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा;१० डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारणार

  • इयत्ता नववी प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा
वाशिम, दि. २१ : येथील जवाहर नवोदय विद्यालयात सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात इयत्ता ९ वी वर्गामध्ये रिक्त जागांकरिता प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन स्वरुपात स्वीकारण्यास सुरुवात झाली असून १० डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. सन २०१९-२० या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील मान्यता प्राप्त सरकारी, निमसरकारी अथवा खाजगी शाळेत इयत्ता ८ वी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या निवड चाचणी परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.
ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णतः निशुल्क आहे. प्रवेश अर्ज नवोदय विद्यालय निवड समितीच्या www.navodaya.gov.in आणि https://www.nvsadmissionclassnine.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. निवड चाचणी प्रवेश परीक्षा ८ फेब्रुवारी २०२० रोजी वाशिम येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी वाशिम जवाहर नवोदय विद्यालय येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावाअसे प्राचार्य आर. एस. चंदनशिव यांनी कळविले आहे.

सहा ताब्यात वनविभागाची कारवाई,मंत्रोपच्चाराने पाडणार होते पैशाचा पाऊस

भंडारा,दि.21ः-मंत्रोच्चाराने पैशाचा पाऊस पाडण्यासाठी पूजा मांडण्यात आली. या पुजेसाठी पैशासह वन्यजीवांच्या अवशेषाचा वापर होत असल्याच्या संशयावरुन वन विभागाने धाड घालून सहा जणांना ताब्यात घेतले. परंतु, त्याठिकाणी ७४ हजारांच्या रोकड व पुजेच्या साहित्यांशिवाय वन्यजीवाचे कोणतेही अवशेष न सापडल्याने संशयितांकडून बंधपत्र लिहून सोडण्यात आले. हा प्रकार १८ नोव्हेंबर रोजी भंडारा तालुक्यातील नांदोरा येथे घडला.
१८ नोव्हेंबर रोजी नांदोरा येथील एका घरात काही व्यक्ती पैशाचा पाऊस पाडण्यासाठी मंत्रोच्चार करुन त्यासाठी वन्यजीवांच्या अवशेषांचा उपयोग करणार असल्याची माहिती भंडारा वनपरिक्षेत्र कार्यालयाला प्राप्त झाली होती. या माहितीवरुन वन विभागाच्या पथकाने साध्या वेशात नांदोरा येथील घरावर धाड मारली. सदर घराच्या गेटला कुलूप लावून आत पूजा सुरू करण्यात आली होती. तथापि वन विभागाचे कर्मचार्‍यांनी घरात प्रवेश करुन त्यांचा पुजेचा प्रयत्न हाणून पाडला. त्याठिकाणी पुजेचे साहित्य, एका जनावराचे काळे केस व ७४ हजारांची रोकड आढळून आली. वन कर्मचार्‍यांनी वन्यजीवाचे अवशेष शोधण्यासाठी संपूर्ण घराची झडती घेतली. परंतु, एकही अवशेष त्यांना आढळून आला नाही. जे काळे केस त्यांना मिळाले ते वन्यप्राण्याचे नाहीत. ते दुसर्‍या एका प्राण्याचे असावेत, असा वन विभागाचा अंदाज आहे. दरम्यान या प्रकरणात वन विभागाने सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. अधिक तपासासाठी वन विभागाने आणखी दोन दिवस चौकशी केली. परंतु, अवशेषाबाबत त्यांना एकही धागा सापडला नाही. त्यामुळे ताब्यात घेण्यात आलेल्यांना बंधपत्रावर लिहून सोडण्यात आले.

व्होडाफोन, एअरटेलनंतर जिओचा ग्राहकांना दणका, डिसेंबरपासून होणार दरवाढ

 मुंबई(वृत्तसंस्था),दि. २० :  देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्या व्होडाफोन आणि एअरटेलनंतर आता रिलायंस जिओने देखील टॅरिफ वाढवत असल्याची घोषणा केली. येत्या काही दिवसांत रिलायंस जिओ टॅरिफमध्ये वाढ करणार आहे. भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरणाने (ट्राय) केलेल्या शिफारसीनुसार, चिरंतन गुंतवणूक आणि दूरसंचार क्षेत्राच्या विकासासाठी हा निर्णय घेतला जात आहे. सोबतच, ही टॅरिफ वाढ सरकारी नियमांच्या आधीन राहून केली जात आहे. त्याचा डेटा वापरावर आणि डिजिटल विकासावर काही परिणाम होणार नाही असा दावा जिओने केला आहे.

व्होडाफोन एअरटेलने आधीच जाहीर केली दरवाढ
व्होडाफोन आणि भारती एअरटेलने डिसेंबरपासून नवीन वाढीव टॅरिफ लागू करणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु, ही दरवाढ कशी राहील हे अद्याप कुणाकडूनही सांगण्यात आले नाही. जिओकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतीय अर्थव्यवस्था तसेच समाजात डिजिटल सेवांच्या बदलत्या भूमिकेची जिओला जाणीव आहे. जिओने भारताला जगातील आघाडीचे डेटा मार्केट होण्यात मदत केली. 2016 मध्ये भारतात दरमहा 20 कोटी जीबी डेटा वापरला जायचा. (जिओ आल्यानंतर) हा आकडा 600 कोटींवर पोहोचला आहे.
देशात नफा कमवणारी एकमेव कंपनी जिओ
सद्यस्थितीला जिओचे 35 कोटी, व्होडाफोन आयडिआचे 31 कोटी आणि एअरटेलचे 28 कोटी ग्राहक आहेत. व्होडाफोन आणि एअरटेलने टॅरिफ वाढताना सध्याचे कमी दर हे नेटवर्कमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पुरेसे नाही. तसेच वाढत्या डेटाची मागणी पुरवण्यासाठी दरवाढ आवश्यक असल्याचे म्हटले आहे. यासोबतच सुप्रीम कोर्टाने या दोन्ही कंपन्यांना लायसंस आणि स्पेक्ट्रम फी अंतर्गत अतिरिक्त 80 हजार कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम या कंपन्यांना अवघ्या 3 महिन्यांत भरावी लागणार आहे. तर दुसरीकडे, देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओ देशात नफा कमवणारी एकमेव कंपनी आहे.
रिलायन्स जिओचे शुल्क अन्य दूरसंचार कंपन्यांपेक्षा ३०% कमी
१०% शुल्कवाढीमुळे महसुलात ३.५८ हजार कोटींची वाढ शक्य
तज्ञांनुसार, व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलद्वारे शुल्कवाढीची घोषणा एक चांगले पाऊल आहे. मात्र, याचा परिणाम चौथ्या तिमाहीतच पाहायला मिळेल. त्यांच्या म्हणण्यानुसार, शुल्कातील १० टक्के वाढीमुळे कंपन्यांच्या महसुलात २.८६ हजार कोटी रु. ते ३.५८ हजार कोटी रुपयांची वाढ होऊ शकते. मात्र, एजीआरच्या देयकाच्या तुलनेत हे कमी आह या कंपन्यांना सरकारच्या दिलाशाची आशा करावी लागेल.

Wednesday, 13 November 2019

ओबीसी आरक्षण के समर्थन में आज 13 नवंबर को छत्‍तीसगढ प्रदेश महाबंद




ओबीसी आरक्षण के खिलाप है भाजपा एंव उनके समर्थक

रायपुर,13 नवंबर । छत्‍तीसगढ़ में मुख्‍यमंत्री भूपेश बघेल द्वारा ओबीसी आरक्षण को 14 प्रतिशत से बढ़ाकर 27 प्रतिशत करने के फैसले के खिलाफ बिलासपुर हाईकोर्ट में 40 याचिका लगाकर रोक लगा दी। सामाजिक न्‍याय के खिलाफ जारी आरक्षण व संविधान विरोधी मानसिकता और आरएसएस के षड़यंत्र के विरोध में ओबीसी वर्ग ने 13 नवंबर 2019 को छत्‍तीसगढ प्रदेश महाबंद का अहवान किया है। 
भारतीय संविधान के अनुच्‍छेद 340 में ओबीसी को उनके जनसंख्‍या के अनुपात में प्रतिनिधित्‍व देने का प्रावधान है। मंडल कमीशन को लागू करने से लेकर पिछडों के संवैधानिक अधिकाकारों का विरोध कथित तौर पर सवर्ण मानसिकता के लोगों द्वारा किया जा रहा है। जबकि छत्‍तीसगढ में मात्र 3 प्रतिशत जनसंख्‍या होने के बाद भी राज्‍य सरकार ने 10 प्रतिशत आरक्षण देने का फैसला लिया है जिसका पिछड़े वर्ग ने कहीं विरोध नहीं किया। सभी को अवसर देने की समानता पर आधारित आरक्षण के भागीदारी वाले थीम को हमेशा संविधान विरोधी लोगों ने भाईचारे के बदले नफरत व घृणा का माहौल तैयार किया है। छत्‍तीसगढ़ ओबीसी महासभा के अध्‍यक्ष सगुनलाल वर्मा ने बताया कि छत्तीसगढ़ पिछड़ा वर्ग, अनुसूचित जाति, जनजाति व अल्पसंख्यक महासंघ के द्वारा 13 नवंबर दिन बुधवार को पिछड़ा वर्ग के 27% आरक्षण के समर्थन में छत्तीसगढ़ महाबंद के आह्वान पर छत्तीसगढ़ साहू समाज के प्रदेश के अध्यक्ष अर्जुन हिरवानी, अनुसूचित जाति प्रकोष्ठ व प्रगतिशील सतनामी  समाज के अध्‍यक्ष एलएल कोशले, आदिवासी समाज के संरक्षक पूर्व आईएएस नवलसिंह मंडावी,  ओबीसी महासंघ के प्रदेश संयोजक कांति साहू, अल्पसंख्यक प्रकोष्ठ के अध्यक्ष डॉ हमित उल्ला खान, बंटी (शातनु) साहू  संयोजक पिछड़ा वर्ग ने संयुक्‍त रुप से प्रेसरिलीज जारी कर आंदोलन को समर्थन दिया है। श्री वर्मा ने कहा कि ओबीसी महाबंद में प्रदेश के 19 संगठनों समर्थन दिया है। भाजपा के समर्थित एक मात्र संगठन ने अपना समर्थन आपस में लेकर समाज विरोधी होने की मानसिकता को उजागर किया है। उन्‍होंने बताया कि प्रदेश के 27 जिलों में बंद को सफल बनाने के लिए जिला संयोजकों तैयारियां पूरी कर ली गई है। आंदोलन को सभी सामाजिक, धार्मिक, राजनैतिक, युवा व छात्र संगठनों का भरपूर समर्थन मिल रहा है। बंद को सफल बनाने के लिए राजधानी के कलेक्‍टर चौक स्थित बाबा साहब डॉं. अंबेडकर के प्रतिमा स्‍थल पर सुबह 9 बजे से ही विरोध्‍ प्रदर्शन शुरु कर दिया जाएगा। छात्रों एवं युवाओं की टीम बंद के समर्थन में सुबह से ही व्‍यापारियों से बंद को सफल बनाने के लिए दुकाने बंद करने का सहयोग लेने सड़कों पर घुमेंगे। छत्‍तीसगढ़ ओबीसी महासभा के अध्‍यक्ष सगुनलाल वर्मा ने कहा कि महाबंद को शांतिपूर्ण ढंग से सफल बनाने के लिए शासन व प्रशासन स्‍तर से भी सहयोग मांगा गया है। ताकि छत्‍तीसगढ से पूरे देश में यह संदेश जाए कि सामाजिक न्‍याय के आंदोलन में ओबीसी के साथ कंधे से कंधा मिलाकर  एससी , एसटी और अल्‍पसंख्‍य समाज भी एकजुट होकर भाईचारे का संदेश दे रहा है।
राष्‍ट्रीय मतदाता जागृति मंच के अध्‍यक्ष नंदकुमार बघेल ने कहा कि 13 नवंबर के बंद से आरएसएस के भाजपा और उसके समर्थक लोग बंद को विफल करने में लगे हुए हैं। उन्‍होंने कहा कि देश में यदि सोम का गठन हो जाये तो जिसके द्वारा एसटी, एससी, ओबीसी और अल्‍पसंख्‍यक मिलकर के सरकार बनायेंगे । तब भारत में  बाबा साहब डॉ. अंबेडकर में सिद्धांत को पुर्नजिवीत किया जा सकता है जिसका भय भाजपा को सताने लगी है। भाजपा चाहता है कि देश में मेहनतकश पिछड़े वर्ग का समाज जिनकी आबादी 52 प्रतिशत है जातियों में बंटे रहें। और पिछड़ा वर्ग मंदिर और हिंदुत्‍व के नाम पर भाजपा का वोट बैंक बनाकर भाजपा देश में शासन व सत्‍ता में काबिज रहे।

13 ते 19 बेरार टाईम्सचा अंक





Tuesday, 12 November 2019

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू; आदेशावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.12 : विधानसभा निवडणुकीनंतर कुठलाही पक्ष सरकार स्थापन करू शकत नसल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या शिफारशीवर शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. भाजपा, शिवसेनेला राज्यपालांनी सत्ता स्थापनेचा दावा करण्याची संधी दिली होती. मात्र बहुमताचा आकडा नसल्याने दोन्ही पक्षांना सरकार स्थापनेचा दावा करता आला नाही. शिवसेनेनं बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र राज्यपालांनी त्यांची मागणी फेटाळून लावली. यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीला संधी दिली. मात्र त्यांनाही बहुमतासाठी आवश्यक असणारा आकडा गाठता आला नाही. त्यांनीदेखील शिवसेनेप्रमाणेच मुदत वाढवून देण्याची विनंती केली. मात्र राज्यपालांनी त्यास नकार दिला. यानंतर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. आतापर्यंत राज्यात कधीही निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही.
राज्यात आतापर्यंत दोनवेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. पहिल्यांदा १७ फेब्रुवारी १९८० मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यावेळी पवार समाजवादी काँग्रेस स्थापन करून पुलोद सरकारचे नेतृत्त्व करत होते. इंदिरा गांधींनी पवारांचे सरकार बरखास्त करून मध्यावधी निवडणुका घेतल्या होत्या. त्यावेळी जवळपास ११२ दिवस (१७ फेब्रुवारी १९८० ते ८ जून १९८०) राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती. पाच वर्षांपूर्वीदेखील राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यावेळी राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार होते. दोन्ही पक्षांमधील मतभेद टोकाला गेले होते. राष्ट्रवादीने सरकारचा पाठिंबा काढला. त्यामुळे सरकार अल्पमतात आले होते. यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा दिला. सरकारचा कालावधी संपत आल्याने विधानसभा बरखास्त करण्यात आली. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. २८ सप्टेंबर २०१४ ते ३० ऑक्टोबर २०१४ (३२ दिवस) राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती.

तिरोड्यात युवकाची हत्या,विहिरीत आढळला मृतदेह

तिरोडा,दि.12 : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या संत रविदास वार्डातील एका 19 वर्षीय युवकाची हत्या करुन त्याचा मृतदेह विहीरीत फेकून दिल्याची घटना आज मंगळवारला उघडकीस आली.या घटनेतील मृत युवकाचे नावे रिषभ करोशिया (वय १९)असे आहे.याप्रकरणात तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अज्ञात आरोपींचा शोध सुरु केला आहे. रिषभची हत्या कुठल्या कारणावरुन करण्यात आली हे अद्यापही कोडेच आहे.

Monday, 11 November 2019

संजय राउत लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल

मुंबई,दि.11(वृत्तसंस्था) – शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राउत यांना लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना सोमवारी चेक-अपसाठी बोलावले होते. तत्पूर्वी त्यांना छातीत दुखण्याचा त्रास होता. परंतु, रुग्णालयात नेताना उद्भवलेल्या परिस्थितीमुळे राउत यांना दाखल करावे लागले आहे. 

याच ठिकाणी राहून त्यांच्यावर विविध प्रकारच्या चाचण्या घेऊन उपचार केले जात आहेत. त्यामुळे, राउत यांनी किमान दोन दिवस विश्राम करावा अशा सूचना डॉक्टरांकडून देण्यात आल्या आहेत. संजय राउत यांच्या अनुपस्थितीत सुभाष नार्वेकर, अनिल परब आणि अनिल देसाई यांच्यावर पक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, संजय राउत यांची स्ट्रेस टेस्ट घेण्यात आली होती. त्यानंतरच डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. यात त्यांची एन्जिओग्राफी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागले. तेव्हापासूनच रोज तीन-चार वेळा संजय राउत माध्यमांशी संवाद साधत होते. त्यानंतरही भाजपवर मुख्यमंत्री पदासाठी दबाव टाकणे असो वा आपल्या पक्षाची भूमिका मांडणे, सर्वच घटनाक्रमात शिवसेनेकडून संजय राउत सर्वात पुढे होते. त्यातही राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणावर भाजपने सत्ता स्थापनेत असमर्थ असल्याचे सांगितले, शिवसेनेवर टीका केली. यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी 24 तासांची वेळ गेली, त्यावेळी सुद्धा संजय राउत यांनी प्रखरपणे आपली भूमिका मांडली. संजय राउत यांनी डॉक्टरांची आधीच अपॉइंटमेंट घेतली होती. अर्थात त्यांना आधीपासूनच छातीत दुखण्याचा त्रास होता असे कळते. परंतु, अगदी अपॉइंटमेंटच्या दिवशी (सोमवारी) सुद्धा त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. त्यातच राउत यांना आता रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली

शिवसेनेले कॉंग्रेसच्या हाताचा आधार?




View image on Twitter
दिल्ली,दि.11 - राज्यातील सत्तास्थापनेसंबंधी दिल्ली येथे काँग्रेसच्या कार्यकारणीची बैठक पडली. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली आहे.

याबाबत मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, कॉँग्रेस कार्यकारणीची बैठक पार पडली. महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. पुढील चर्चा राज्यातील नेत्यांसोबत होणार आहे. ४ वाजता बैठक होणार आहे. राज्यातील नेत्यांची भूमिका जाणून घेणार आहे. त्यानंतर राज्यात कोणती भूमिका घेणार याबाबत निर्णय होईल असं सांगण्यात आलं आहे. मात्र काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे राज्यात शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस हात देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. जर राज्यात महाशिवआघाडी असं नवीन समीकरण जुळून आलं तर राज्यात या तिन्ही पक्षाचे सरकार येईल तर भाजपा विरोधी बाकांवर बसेल असं वातावरण तयार झालं आहे. आज संध्याकाळी ७.३० पर्यंत शिवसेनेला राज्यपालांनी वेळ दिली आहे. मात्र, राज्यपालांनी शिवसेनेला २४ तासांची मुदत दिली तर भाजपाला ७२ तासांची मुदत दिली हे समजून घेतले पाहिजे. सरकार बनविणे आमचे कर्तव्य, जास्त मुदत मिळणे गरजेचे आहे. मात्र राज्याला राष्ट्रपती राजवटीपर्यंत ढकलायचे हे सुनियोजितपणे षडयंत्र रचले जात आहे.

चिचगड येथे धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

चिचगड, दि.08-  देवरी तालुक्यातील चिचगड येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या धान खरेदी केंद्राचे शनिवारी(दि.9) खरीप हंगाम 2019-20 साठी उद्घाटन करण्यात आले.
या खरेदी केंद्राचे उद्घाटने गोंदिया जिपचे उपाध्यक्ष अल्ताफ हमीद यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार रामरतन राउत हे होते. यावेळी भरत दुधनांग, माजी जिप अध्यक्ष प्रल्हाज भोयर,पोलिस पाटील जगदीश नरवरे, सरपंच कल्पना गोसावी, प्रा. जनार्धन कोल्हारे, श्री. रहांगडाले गुरुजी, अन्ना जैन, अल्ताफभाई, संस्थाध्यक्ष संतराम भोयर, उपाध्यक्ष भुवन नरवरे, राजेश बिंझलेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
संचालन सचिव मारोती खंडारे यांनी केले. उपस्थितांचे आभार लिपिक सदाराम मडावी यांनी मानले. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

चिचगड येथे ईद मीलादुन्नबी उत्साहात साजरी

चिचगड,दि.11 - मुस्लीम बांधवांचा सण ईद मीलादुन्नबी काल रविवारी ( दि.10) रोजी चिचगड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
 इद निमित्त शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीचे संपूर्ण नगर भ्रमण करून स्थानिक  जामा मशिदीमध्ये समापण करण्यात आले. यावेळी मुस्लिम बांधवांनी शिरणी (प्रसाद) वाटून सर्वांना इदच्या शुभेच्छा दिल्या. या रॅलीमध्ये जामा मशिदीचे इमाम कयुम खान, समाजाचे अध्यक्ष शेख अब्दुल्ला, शेख इब्राहिम, शेख इरशाद, साबिर कुरेशी, नियाज अहमद, गुलामभाई, शेख हबीब टेलर आदी मान्यवरांचा सहभाग होता.

ढासगडाच्या राखीव वनक्षेत्रावरिल अनधिकृत अतिक्रमण व बांधकाम त्वरित हटवा- भुपेंद्र मस्के


देवरीदि.11; गोंदिया वन विभाग अंर्तगत वनपरिक्षेत्र चिचगड येथिल वनक्षेत्र पिपरखारी-४ येथे ढासगड व जवळील संपुर्ण परिसर हा काही असामाजिक तत्वांनी अतिक्रमण करुन पक्के बांधकामही अंदाजे दहा वर्षापासुन केले आहे. त्यामुळे परिसरातील जैवविविधता नष्ट होत आहे. वन्यजिव तसेच वनस्पतीनांही मोठा धोका निर्मान झाला आहे.त्यामुळे अतिक्रमण व बांधकाम तात्काळ हटविण्याची मागणी वन परिक्षेत्र अधिकारी चिचगड यांचेकडे माहिती अधिकार कार्यकर्ते भुपेन्द्र मस्के यांनी केली आहे.
राज्याच्या वनजमिनीच्या संरक्षणासाठी शासन कटिबध्द असुन वनजमिनीवर अतिक्रमण करणारे गुन्हे एमपीडीए ( महाराष्ट्र प्रिव्हेंन्सन आँफ डेंजरस अँक्टिव्हीटी) या कायद्यार्तंगत आणण्याच्या प्रयत्नात आहे.राखीव वन क्षेत्रात अनधिकृत पणे प्रवेश करुन राहील्याने वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची जीवीत अथवा वित्त हानी झाल्यास अशा प्रकरणात कोणत्याही प्रकारची भरपाई शासनाकडून देण्याची तरतुद नाही. वनक्षेत्रात अशा प्रकारे हानी झाल्यास संबंधित व्यक्ती विरुध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 च्या तरतुदींनुसार कारवाई करण्यात येते.वनजमिनीवरिल अतिक्रमन रोखण्यासाठी सँटेलाईट सर्व्हिलन्सचा उपयोग होत असतांनी या अतिक्रमनाकडे वनविभागाने कानाडोळा केला. अशा संबधित अधिकारी व कर्मचा-यांची विभागीय चौकशी करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी भुपेन्द्र मस्के यांनी केली आहे.
नैसर्गिक साधनसंपत्तीचे योग्य व्यवस्थापन ही काळाची गरज असुन राजकारण बाजुला ठेऊन वन्यजीव व वनस्पती वाचविता येईल. नैसर्गिक सौदर्यं टिकविण्यासाठी वन विकास महामंडळाकडे प्रस्ताव पाठवुन पर्यटन विकसित करता येईल. मात्र तेथे वेगवेगळ्या माध्यमातुन ध्वनीप्रदुषन व जलप्रदुषण केल्या जातो.
जर हे अतिक्रमन वैध असेल तर ढासगडाच्या परिसरात भक्तनिवासासाठी एक हेक्टर वनजमिनीची मागणी वनविभागाला केली आहे.व स्थानिक आमदाराला भक्तनिवासाकरिता पंधरा लक्ष रुपये निधीची मागणी इमेलद्वारे करुन वनविभागाला मस्के यांनी  पेचात टाकल्याचे दिसुन येते.

माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचे निधन


Former India's Chief Election Commissioner T N. Sheshan died | भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचं निधन

नवी दिल्ली,दि.11 - कठोरपणे आदर्श निवडणूक आचार संहिता राबवून निवडणूक सुधारणांसह भारतीय निवडणूक आयोगाला नवीन चेहरा देणारे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी रात्री निधन झाले.
भारताचे 10वे मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांनी वयाच्या 86व्या वर्षी चेन्नईतल्या निवासस्थानी रात्री साडेनऊ वाजेदरम्यान अखेरचा श्वास घेतला. भारताच्या निवडणूक व्यवस्थेमध्ये महत्वपूर्ण सुधार करण्याचे श्रेय टी .एन. शेषन यांना आहे. शेषन हे वर्ष 1990 ते 1996पर्यंत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. मुख्य निवडणूक आयुक्त होण्यापूर्वी त्यांनी 1989मध्ये भारताच्या 18व्या कॅबिनेट सचिवपदाचा पदभार सांभाळला होता. 1996मध्ये त्यांनी सरकारी सेवेत दिलेल्या विशेष योगदानामुळे त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मतदार ओळखपत्राची सुरुवातही त्यांनी केली होती. गेल्या काही वर्षांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती.त्यांचे पूर्ण नांव तिरुनेल्लई नारायण अय्यर शेषन (टी. एन. शेषन) होते. तामिळनाडूच्या 1955च्या तुकडीतील ते आयएएस अधिकारी होते. ते भारताचे दहावे मुख्य निवडणूक आयुक्त होते. वाढत्या वयामुळे ते काही वर्षांपासून घरातच राहत होते. त्यांनी 1997मध्ये के. आर. नारायण यांच्याविरुद्ध राष्ट्रपतीपदाची आणि त्यानंतर दोन वर्षांनी काँग्रेसच्या तिकिटावर लालकृष्ण अडवाणी यांच्याविरुद्ध निवडणूक लढविली होती. परंतु, त्यांना यश आले नव्हते. केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील तिरुनेलईमध्ये 15 डिसेंबर 1932 रोजी त्यांचा जन्म झाला होता. अमेरिकेतल्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून त्यांनी सार्वजनिक प्रशासना(Public Administration)ची पदवी मिळवली होती.

टी. एन. शेषन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले. त्यांनी निवडणूक सुधारणांसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे भारतीय लोकशाही बळकट झाली. ते उत्कृष्ट अधिकारी होते. त्यांनी मेहनतीने आणि सचोटी देशसेवा केली, असे त्यांनी टि्वटवर म्हटले आहे.  तामिळनाडूत जन्मलेल्या या अधिका-याने भारतातील निवडणुकीच्या प्रक्रियेत अनेक सुधारणा केल्या. अर्थात शेषन यांना ते करताना प्रचंड विरोधही झाला. सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या निवडणुकीतील आमूलाग्र बदलांना विरोध केला. पण या गृहस्थाने कुठल्याही दबावाला बळी न पडता निवडणुकीत सुधारणा घडवून दाखवल्या. त्यामुळे आज ज्या काही निकोप निवडणुका होत आहेत. त्याचे श्रेय फक्त आणि फक्त टी. एन. शेषन यांच्याकडे जाते. निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी त्यांच्या कार्यकाळापासून सुरू झाली. कधीही, कुठेही, कसाही प्रचार करणे, ध्वनिक्षेपणाचा अमर्यादित वापर अशांमुळे होणारा त्रास, याचा कुठेही विचार केला जात नव्हता. त्यालासुद्धा टी. एन. शेषन यांनीच चाप बसविला.रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत प्रचार करण्यास प्रतिबंध, सार्वजनिक ठिकाणी होणा-या जाहीर सभा, त्यामुळे वाहतुकीस होणारी अडचण, नागरिकांचा खोळंबा यावर कडक बंदी आणली गेली. रस्त्यावर कुठेही सभा न घेता सभांसाठी निवडणूक आयोग ठरवेल त्याच जागी सभा घेणे. प्रचारासाठी धार्मिक स्थळांचा होणारा गैरवापर पूर्णत: बंद करणे. धर्माच्या नावावर, देवांच्या नावावर, राष्ट्रीय पुरुषांच्या नावावर मते मागण्यास बंदी त्यांनीच आणली. ध्वनिक्षेपक वापर रात्री 10नंतर बंद म्हणजे बंद. मग तो कुणीही असो. परवानगी नाही, असे अनेक बदल टी. एन. शेषन यांनी केले.

देशाच्या निवडणूक यंत्रणेत सुधारणा आणि तिचे बळकटीकरण करण्याचे मोठे काम टी.एन. शेषन यांनी केले. लोकशाहीची ओळख करून देणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख कायम राहील. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री.

मी यासाठी मनापासून शोक व्यक्त करतो की, निवडणूक सुधारणांमध्ये टी.एन. शेषन यांनी दिलेले योगदान आमच्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहे.- नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री.

Saturday, 9 November 2019

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना विशेष अधिकार प्रदान

वाशिम, दि. ०९ : जिल्ह्यात १० नोव्हेंबर २०१९ रोजी ईद-ए-मिलाद उत्सव मुस्लीम धर्मियांकडून साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने शहरी व ग्रामीण भागात मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३६ नुसार १० नोव्हेंबर २०१९ रोजी विशेष अधिकार प्रदान करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी कळविले आहे.
रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील अथवा जमावातील लोकांना कशा रीतीने चालावे याचे निर्देश देणेमिरवणुकीचा मार्ग व वेळ विहित करणेमिरवणूक अथवा उपासनेच्यावेळी अडथळा होवू न देणेसार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यांवर गाणीवाद्ये वाजविणे किंवा ध्वनीक्षेपकाचा उपयोग करण्याचे विनियमन करणेत्यावर नियंत्रण ठेवणे तसेच सक्षम प्राधिकारी यांनी कलम ३३३५३७ ते ४०४२४३ व ४५ या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देण्याचे अधिकार जिल्ह्यातील सर्व फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना १० नोव्हेंबर २०१९ रोजी प्रदान करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३४ प्रमाणे शिक्षेस पात्र राहीलअसे पत्रकात म्हटले आहे.

वडेगाव ग्राम पंचायतीचा अनागोंदी कारभार;पाण्याच्या टाकीत आढळले कुजलेले उंदीर

डक अर्जुनी,दि.09ः- सडक अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वडेगांव येथील ग्राम पंचायतीच्या बेजबाबदारपणामुळे गावातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. वडेगाव ग्राम पंचायत अंतर्गत जनतेला जुन्या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून एका वॉर्डातील अंदाजे २०० नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा केला जातो त्या टाकीत आज (ता.९) ला सकाळी ७ वाजता  ८ ते १० उंदीर व पाली मेलेल्या व अळी झालेल्या अवस्थेत काही नागरिकांना आढळून आले. त्याची माहिती गावचे सरपंच, ग्रामसेवक, व पंचायत समितीचे उपसभापती, आरोग्य कर्मचारी यांना बोलावून लोकांनी माहिती दिली. दरम्यान, पाण्याची टाकी महिन्यातून एक वेळा साफ केल्याची माहिती पाणी वाटप कर्मचारी वीरेंद्र मेंढे यानी दिली.
गेल्या २० वर्षापासून ह्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून संपूर्ण वॉर्डत पिण्याच्या पाण्याची सोय केली जात आहे. आता मागील वर्षी पासून मोठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू केल्याने ,ह्या जुन्या पाणी पुरवठा योजना कडे दुर्लक्ष करून पाणी पुरवठा केला जात आहे. दुर्लक्ष केल्याने ,त्या टाकीत उंदीर, पाली मरून त्यांना अळी लागल्या आहेत. त्या टाकीत पाणी आजही वॉर्डातील लोक पाणी पितात हे विशेष. सदर माहिती मिळताच बहुतेक महिलांनी घरचा स्वयंपाक केला होता , त्यामुळे कुणी भाजी फेकून दिल्याची माहिती आहे . काल ता.८ ला गावात मंडई असल्याने बहुतेक गुपचूप विक्रेत्यांनी ह्याच टाकीच्या पाण्याचा वापर करून गुपचूप विक्रीचां व्यवसाय केला. त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. साद्या शेतीचा हंगाम असल्याने बहुतेक मजुरांनी शेतात जातांना , पिण्याचे पाणी ह्या टाकीतून घेऊन गेले आहेत. ही भयंकर पाणी समस्या लक्षात आली नसती ,तर त्या मलेल्या विषारी कीटकांचे पाणी प्यावे लागते असते. गोर गरीब जनतेला विविध आजाराशी सामना करावा लागला आहे. पंचायत समिती चे विस्तार अधिकारी हे कधीच गावाला भेटी देत नाहीत, ते फक्त विजीट बुक पंचायत समिती ला बोलावून विजिट लिहिल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याही अधिकाऱ्यांवर कारवाही ची मागणी नागरिकांनी केली आहे.
या प्रकरणात आरोग्य कर्मचारी कुठेही लक्ष न देता फक्ट विझिट बुक लिहून मोकळ्या होतात. त्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी  केली आहे.

वडेगाव ग्राम पंचायत येथे एक मोठी प्रादेशिक पुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. त्या योजनेचा पाणी गावात पुर वाठा केला जात आहे.पण जुन्या पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीत उंदीर, पाली मेलेल्या मिळाल्या ,ती टाकी कायमची बंद करण्यासंबंधी सूचना संबंधित पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्याला देण्यात आली होती . मात्र पाणी पुरवठा बंद न करता त्याने, लोकांना पिण्यासाठी पाणी देणे सुरूच ठेवल्याचे ग्रामसेविका सरिता कटरे यांचे म्हणने आहे.

समाजात सलोखा आणि शांततेसाठी सदैव प्रयत्नरत राहा - अतुल कुलकर्णी

देवरी,दि.9 - देवरीची ओळख शांत शहर म्हणून आहे. येथील सर्व नागरिक गुण्यागोविंदाने राहतात, ही एक गौरवास्पद बाब आहे. आपले नेहमी पोलिस दलाला सकारात्मक सहयोग मिळते, ही पोलिस दलासाठी सुद्धा जमेची बाजू आहे. आज सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल आला. समोर ईद सारखा सण आहे. यासाठी आपण सर्वांनी पुन्हा आपल्या एकतेचा परिचय देत धार्मिक सलोखा आणि शांतता राखण्यात सहकार्य कराल, असा मला पूर्ण विश्वास आहे, असे प्रतिपादन गोंदियाचे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी देवरी येथे  आज (दि.9) केले.
ते देवरी येथे पोलिस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकित मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले आणि ठाणेदार कमलेश बच्छाव प्रामुख्याने हजर होते. या बैठकीला नगराध्यक्ष कौशल्या कुंभरे, उपाध्यक्ष आफताब शेख, माजी नगराध्यक्ष सुमन बिसेन, पं.स. सदस्य अर्चना ताराम,महेंद्र मेश्राम, पारबता चांदेवार, राजेंद्र अग्रवाल, सुरेश भदाडे, गोपाल तिवारी, वाय के बोंबार्डे, रचना उजवणे, डिलेश्वरी बिंझाडे, सुनील चोपकर, महेंद्र वैद्य, सुरेश चन्ने आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीचे संचलन ठाणेदार कमलेश बच्छाव यांनी केले.

अयोध्येत वादग्रत जमिनीवर राम मंदिर होणार, मुस्लिम पक्षाला पर्यायी जागा मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था),दि.09ः – सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी अयोध्येतील वादग्रस्त जमिनीचा निकाल सुनावला आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने सकाळी 10.30 वाजता एकमताने आपला निर्णय ऐकवला. सरन्यायाधीश रंजन गोगाई म्हणाले की, वादग्रस्त 2.77 एकर जमीन रामलल्लाला देण्यात यावी, मंदिराच्या निर्मितीसाठी 3 महिन्यांत ट्रस्ट स्थापन करावे असे कोर्टाने आदेश दिले आहेत. तर मुस्लिम पक्षाला मशीद उभारण्यासाठी 5 एकर पर्यायी जमीन देण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. पाडण्यात आलेल्या भाग रामाचे जन्मस्थान आहे आणि हिंदुचा हा विश्वास निर्विवादित असल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगाई म्हणाले.

खंडपीठाद्वारे 45 मिनीटे वाचण्यात आलेल्या 1045 पानांच्या निर्णयाने देशाच्या इतिहासातील सर्वांत महत्त्वाच्या आणि शंभर वर्ष जुना वाद मिटवला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगाई, न्यायमूर्ती एस.ए. बोबडे, न्या. डीवाय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण, न्या. एस अब्दुल नजीर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी मशीद बांधवी. तर रामलल्ला विराजमान यांना देण्यात आलेली वादग्रस्त जमीन केंद्र सरकारच्या मालकीची असेल.6 ऑगस्टपासून 16 ऑक्टोबरपर्यंत 40 दिवस हिंदू आणि मुस्लिम पक्षकाराची बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने हा निर्णय सुरक्षित राखून ठेवला होता.
5 न्यायाधीश खंडपीठचा निर्णय, निकालावर पाचही न्यायमुर्तींचे एकमत…
  • सरन्यायाधीश रंजन गोगाई म्हणाले – मीर बकीने बाबरी मशीद उभारली होती. धर्मशास्त्रात प्रवेश करणे कोर्टासाठी योग्य ठरणार नाही. कोर्टाने धर्मशास्त्र क्षेत्रात हस्तक्षेप करणे अव्यवहार्य ठरेल. आम्ही एकमताने निर्णय देत आहोत. या कोर्टाने धर्म आणि भक्तांची आस्था स्वीकारली पाहिजे. कोर्टाने संतुलन राखले पाहिजे.
  • भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) जमीनदोस्त केलेल्या संरचनेखाली मंदिर असल्याचे सांगितले होते.
  • हिंदू या जागेला भगवान रामाची जन्मभूमी मानतात, इतकेच नाही तर मुस्लीम देखील या वादग्रस्त जागेबाबत हेच म्हणतात. प्राचीन यात्रेकरूद्वारे लिहिली गेलेली पुस्तके आणि प्राचीन ग्रंथ देखील अयोध्या रामाची जन्मभूमी असल्याचे दर्शवतात. यासह ऐतिहासिक उदाहरणे देखील असे दर्शवतात की अयोध्या ही हिंदूंच्या श्रद्धेने भगवान राम यांचे जन्मस्थान आहे.
  • उद्ध्वस्त केलेली रचना ही भगवान रामांची जन्मभूमी आहे, हिंदूंचा हा विश्वास निःसंशय आहे. तथापि, धर्म, विश्वास यांच्या आधारे मालकी स्थापित केली जाऊ शकत नाही. हे विवादाचा निर्णय घेण्याची चिन्हे असू शकतात.
  • ब्रिटिश काळाआधी हिंदू राम चबूतरा आणि सीता की रसोई येथे उपासना करीत असत असे आढळले आहे. रेकॉर्डमध्ये नोंदवल्या गेलेल्या पुराव्यांवरून असे दिसते की वादग्रस्त जागेचे बाह्य भाग हिंदूंच्या ताब्यात होते.
  • सन 1946 च्या फैजाबाद कोर्टाच्या निकालाला आव्हान देणारी शिया वक्फ बोर्डाची याचिका फेटाळली. शिया वक्फ बोर्डाचा दावा हा वादग्रस्त रचनेवर होता. हाच दावा नाकारण्यात आला आहे.
  • निर्मोही आखाड्याने जन्मस्थान व्यवस्थापित करण्याचा अधिकार मागितला होता. सुप्रीम कोर्टाने निर्मोही आखाड्याचा दावा देखील फेटाळून लावला.
सीता रासोई, राम पूतारे यांची उपस्थिती इथल्या धार्मिक वास्तव्याचा पुरावा आहे
सुप्रीम कोर्टाने सांगितले की, वादग्रस्त जमिनीखाली जे बांधकाम आहे, ते इस्लामिक बांधकाम नाही. मात्र ऑर्कोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (एएसआय) च्या अहवालातही मशीद बांधण्यासाठी मंदिर पाडले गेले आहे की नाही याबाबत सांगितले गेले नाही. परंतु, केवळ त्याचा अभिप्राय म्हणणे चुकीचे ठरेल. हिंदूंनी विवादास्पद भूमीला भगवान राम यांचे जन्मस्थान म्हटले आहे आणि मुस्लिमही या जागेबद्दल असेच सांगतात. उद्धवस्त करण्यात आलेल्या बांधकामाच्या ठिकाणी रामाचे जन्मस्थान असण्याचा हिंदूंचा विश्वास बिनविरोध आहे. याठिकाणी सीता रसोई, रामाचा चौथरा आणि भंडार गृह यांची उपस्थिती या ठिकाणच्या धार्मिक वास्तव्याचा पुरावा आहे. आस्था आणि विश्वासाच्या आधारे मालकी हक्क निश्चित केला जाऊ शकत नाही. हा केवळ वाद मिटवण्याचा पुरावा आहे.

रुग्णवाहिका व आटोच्या धडकेत 5 जखमी

गोंदिया,दि.09ः-आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठाणा ते दहेगाव गावाच्या जवळ आज शनिवारला सकाळी 11 वाजेच्या सुमारास रुग्णवाहिका(एमएच 35,के5214) व आॅटोच्या झालेल्या अपघातात खमारी येथील 5 जण जखमी झाल्याची घटना घडली.
या जखमीमध्ये  देवराम चुटे, राधिका मेंढे,  बंसत बांगड, देवाजी बागडे व गंगा भांडारकर सर्व राहणार खमारी यांचा समावेश आहे.आटो क्रमांक एमएच 35,3008 ने हे प्रवासी खमारीकडे ठाणाकडून येत होते तर रुग्णवाहिका ही आमगावकडे जात असल्याचे प्रत्यक्षदर्क्षीचे म्हणने आहे.

Friday, 8 November 2019

लोहारा येथील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

देवरी, दि.08-  देवरी तालुक्यातील लोहारा येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या धान खरेदी केंद्राचे आज शुक्रवारी(दि.8) खरीप हंगाम 2019-20 साठी उद्घाटन करण्यात आले.
या खरेदी केंद्राचे उद्घाटने लोहाराचे सरपंच राकेश चांदेवार यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजेश राउत हे होते. यावेळी उपाध्यक्ष कृपासागर गौपाले, सावलीचे पोलिस पाटील रवींद्र क्षिरसागर, पुरण मटाले, धनराज चुटे, केशव कांबळे, तुकाराम धुर्वे, भोजराज उईके, बुधराम डुंभरे,माणिक राऊत, दिलीप कांबळे, व्यंकट भोयर,कुवरलाल नाईक,सेवंता चनाप,कुंता राऊत,भोजराज हेमणे, सचिव रवींद्र नाईक, केंद्रप्रमुख सुरेेंद्र लाडे,दीपक भदाडे, विलास चाकाटे आदी मान्यवर उपस्थित होते. 
संचालन दिनेश बघेल यांनी केले. उपस्थितांचे आभार विलास चाकाटे यांनी मानले. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

गोडं बोलून सेनेला संपवण्याचा प्रयत्न केला -उद्धव ठाकरेंचा भाजपवर आरोप

मुंबई,दि.08(विशेष प्रतिनिधी)- देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. माझ्यासमोर कधीच 50-50 सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केल. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही पत्रकार परिषद बोलावली. यात त्यांनी भाजपची पोलखोल केली. अमित शहांच्या उपस्थितीत 50-50 चार फॉर्म्युल ठरला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहिली आणि काळजी वाटली. शिवसेना आमच्यासोबत होते पण वाटले नाही. याचे उत्तर त्यांनीच शोधले तर बरे होईल, असा सल्ला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. तसेच महाराष्ट्राच्या विकासाच्या आड आम्ही कधीही राजकारण केले नाही. शब्द दिला म्हणजे दिला. आम्ही नसतो तर त्यांनी अचाट कामे केली असती का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पहिल्यांदाच शिवसेना प्रमुख्यांच्या कुटुंबावर खोटारडेपणाचा आरोप. जनता पुरेपूर ओळखून आहे खरे कोण बोलतो आणि खोटे कोण? आमच्यात काय ठरले होते. मी दिल्लीला गेलो नव्हतो. अमित शहा आले होते. फोनवर चर्चेवेळी त्यांनी सांगितले की, तुम्हाला लोकसभेला युतीच्या बदल्यात उपमुख्यमंत्रीपद मिळेल. मी त्यांना सांगितले की त्यासाठी मी लाचार नाही. मी माझ्या वडिलांना वचन दिले आहे. यावर त्यांनी म्हटले की ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री. तेव्हाही मी नाही म्हणालो. कारण मारामाऱ्या होतात, वाद होतात. यानंतर शहा मातोश्रीवर आले, माझ्या काळात हे नाते बिघडले माझ्याच काळात दुरुस्त करायचे आहे असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री वाटप मान्य केले. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही मान डोलवली. यावर फडणवीस यांनी आता जर मी मुख्यमंत्री पदाचे वाटप झाल्याचे निवडणुकीआधी बोललो तर पक्षात अडचणीत येईन. माझा शब्द आहे, असे सांगितले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी काय बोलले ते तुमच्यासमोर आहे. 2014 मध्ये शिवसेनेने त्यांचा अश्वमेधाचा घोडा अडविला होता. आणि आताही त्यांनी गोड बोलून शिवसेना संपविण्याचे काम सुरू केले होते. तरीही शिवसेनेने त्यांचा घोडा अडविला आहे. मी चर्चा थांबविली. अनौपचारिक दृष्ट्या त्यांनी ठरलेच नव्हते, असे बोलले, तुमचा अधिकार आहे.
पण मी शिवसैनिकांसमोर खोटा म्हमून जाऊ शकत नव्हतो. यामुळे त्यांचे वक्तव्य त्रासदायक होते. त्यामुळे त्यादिवशीची भाजपसोबतची चर्चा थांबविली. 50-50 टक्के मी मानलो असतो. पहिली अडीच की नंतरची यावरही मी मानले असते. लोकसभेनंतर अवजड उद्योग खाते दिले. शहा यांनी त्यावेळी सांगितले की चार दिवसांत मी काहीतरी करतो, पण त्यांनी केले नाही, यामुळे खोटे कोण बोलतो हे पहा असेही ठाकरे यांनी सांगितले. गेल्या 5 वर्षांत अच्छे दिनसाठी खोटे कोण कोण बोलले, नोटाबंदीवेळी खोटे कोण कोण बोलले हे जनतेला माहिती आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे मी अडचण समजून घेतली हा माझा गुन्हा झाला का? आम्ही मोदींवर कुठे टीका केली आहे. साताऱ्यात उदयनराजेंना घेतले ते किती काय काय बोललेत? दुष्यंत चौटाला यांनी काय टीका केली ते पहा. मोदींवरच नाही ते गुजराती लोकांवरही बोललेत, असे सांगत त्यांनी भाजपाच्या दुटप्पीपणावरही टीका केली.

अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांचा राजीनामा मंजूर


मुंबई,८ -राज्यातील सत्तेचा तिढा काही केल्या सुटण्याचे नाव नाही. या सत्ता संघर्ष अगदी टोकावर पोचताच राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सुपूर्द केला. यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी राज्यपाल यांनी राजीनामा मंजूर केल्याची माहिती दिली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप , राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. याशिवाय आघाडीतील सर्व घटकपक्षांच्या नेत्यांचे सु्ध्दा फडणवीस आभार मानायला विसरले नाही. राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची शंका व्यक्त केली जात आहे.  आघाडी चे शासन राज्यात येण्याची शक्यता मावळत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, जनतेनी मला सेवा करण्याची संधी दिली. या पाच वर्षाच्या कालखंडात त्यामी अनेक संकटांवर मात करून राज्याला प्रगतिपथावर नेण्याचे कार्य केले. दुर्दैवाने या पाच वर्षाच्या काळात सुमारे 4 वर्षे राज्यात दुष्काळी परिस्थिती होती. त्यांच्या सरकारने राज्यात अनेक महत्वाचे धोरण आखण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...