Wednesday, 2 May 2018

बलात्कारांच्या घटनांना पालक जबाबदार! -भाजप आमदार

भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य


बलिया (वृत्तसंस्था) दि.2:  बैरियाचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी आता बलात्काराच्या वाढत्या घटनांना युवक-युवतींच्या पालकांना जबाबदार ठरवले आहे. पालक आपल्या मुला-मुलींचे संरक्षण करत नसल्याने अशा घटना घडतात, असे ते म्हणाले. आमदार नेहमीच वादग्रस्त विधाने करण्यासाठी ओळखले जातात. 
पालकांना मुलांच्या स्वच्छंदी जीवनावर लगाम घालण्याची गरज आहे. 15 वर्षांखालील मुला-मुलींवर विशेष देखरेख ठेवली गेली पाहिजे. आपल्या पाल्यांचे संरक्षण करणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य असते; मात्र अनेक पालक तसे करण्यात अपयशी ठरत आहेत. ते आपल्या मुला-मुलींना स्वच्छंदी जीवन जगू देतात. हा स्वेच्छाधारी स्वभाव योग्य नसून ते सामाजिक विकृतीचे प्रमुख कारण आहे. पालकांनी आपल्या मुलांना स्वच्छंदी जीवन जगू देण्याचे स्वातंत्र्य देऊ नये. तरुण मुला-मुलींच्या मोबाईल वापरण्याने अशा प्रकारांना चालना मिळत असल्याचेही सिंह म्हणाले. 
उल्लेखनीय म्हणजे सिंह यांनी यापूर्वी उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेले आमदार कुलदीपसिंह सेंगर यांचे समर्थन केले होते. विशेष म्हणजे त्यांनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना शूर्पणखा म्हटले होते. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...