Thursday, 29 August 2019
मुद्रा योजना : महाराष्ट्रात 84 हजार कोटींचे कर्ज वितरण
राज्यातील 50 आश्रमशाळांचे इंग्रजी, सेमी इंग्रजीत रूपांतरण
दडपशाहीविरोधात आंदोलनकर्त्यांची निदर्शने;चंद्रपूर बंदला संमिश्र प्रतिसाद
जि.प.बांधकाम विभागातील वरिष्ठ सहाय्यक(लेखा)एसीबीच्या जाळ्यात
Wednesday, 28 August 2019
Monday, 26 August 2019
ओबीसी चळवळीचे प्रखर वक्ते बळीराज धोटेंना अटक,सरकार करतेय सत्तेच दुरुपयोग
आरएसएस व भाजप मिडिया सेल संयोजक राहुल लांजेवारच्या माध्यमातून केली तक्रार
चंद्रपूर(विशेष प्रतिनिधी)दि.25 :-चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसी समाजाला त्यांचे सामाजिक सविंधानिक हक्क अधिकार मिळावे यासाठी गेल्या दोन दशकाहूनही अधिक काळापासून काम करणारे ‘सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट’ संघटनेचे अध्यक्ष व ओबीसीचे प्रखर वक्ते बळीराज धोटे यांच्याविरुध्द आरएसएस व भाजप मिडिया सेलचा सयोंजक राहुल लांजेवारने सोशल मिडियावर भगतसिंह यांच्यावर चालविण्यात आलेल्या न्यायालयीन खटल्याबाबत आक्षेपार्य टिप्पणी केल्याप्रकरणातील तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दंडुकेशाहीचा वापर करीत धोटे यांना त्यांच्या राहत्या घरातून पहाटे 4 वाजता अटक केली.विशेष म्हणजे सध्याचे सरकार हे ओबीसी चळवळीतील कार्यकर्त्यांना पोलिसी खाक्या दाखविण्यासाठी काम करीत असून हे काम सरकार ओबीसी असलेल्या त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते व मंत्र्याच्या माध्यमातूनच करीत आहे.धोटे यांना पहाटे अटक करण्यासाठी पोलिसांनी जाण्याएवढा काही गुन्हा झालेला नसतांना पहाटे अटक करायला जाणे म्हणजे विचारधारेवर काम करणार्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी असल्याचा सुर संपुर्ण महाराष्ट्रातून उमटला आहे.चंद्रपूर पोलिसांनी आरएसएस व भाजपच्या दबावात गोंदिया,गडचिरोलीतील कार्यकर्त्यांनंतर आता चंद्रपूरात धोटे यांना केलेल्या अटकेचा निषेध सर्वच स्तरातून नोंदविण्यात येत आहे.
बळीराज धोटे यांनी 20 -25 वर्षापुर्वी RSS आणि भाजपमधे काम केल्यानंतर या दोन्ही संघटनेत ओबीसींचा वापर करुन फक्त सत्ता हस्तगत करुन ओबीसी व इतर समाजात भांडण लावण्याचे काम होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी हे दोन्ही संघटन सोडून दिले.तेव्हापासून चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसी आंदोलनाची सुरवातच धोटे यांनी केली आणि आजही ते करीत आहेत.धोटे यांच्यावर समाजजागृतीदरम्यान चंद्रपूर, सावली, मुल आणि ढाबा पोलीस स्टेशन येथे RSS आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात टिका केल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांनी तक्रारी दिल्या.चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता 1860 कलम 505/2 अन्वये राहुल लांजेवार या RSS आणि भाजप मिडीया सेल चे संयोजक असलेल्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.त्या तक्रारीच्या अनुषंगाने आधी चौकशी करायला हवी होती मात्र सत्तेच्या दबावात पोलिसांनी पहाटे चार वाजता बळिराज धोटे यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले.कुठल्याही सामान्य व्यक्तीलाही पोलिसांना अशापध्दतीने अटक करण्याचे अधिकार नाहीत.कुठल्याही सभ्य व्यक्तीला अशाप्रकारे पोलीस कशी काय अटक करू शकते? असा प्रश्न बळीराज धोटे यांना पडल्यामुळे त्यांनी खाकी वर्दीत नसलेल्या पोलिसांना विचारले की माझी काय चूक आहे ? त्यावर पोलिसांनी फेसबुक वरील आक्षेपार्ह पोस्टबद्द्दल तुमच्या विरोधात तक्रार असल्याचे सांगितले आणि त्यांना अटक केली.या सोबतच सावली आणि इतर ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी तक्रारी दिल्याची माहिती समोर आली आहे.चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन मधे रात्रीच्या 1 वाजून 45 मिनिटानी गुन्हा नोंद झाल्याची माहिती असतांना अनेक वृत्तपत्रात गुन्हा नोंद होऊन अटक झाल्याचे वृत्त अगोदरच कशा प्रकाशित झाल्या ? बळीराज धोटे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होणार असा साक्षात्कार पत्रकारांना झाला कसा ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून हा सर्व विषय कुठे तरी सत्तेचा गैरफायदा घेण्याचा दिसून येत आहे.
बळीराज धोटे यांना अटक झाल्याचे वृत्त कळताच ओबीसी चळवळीतील त्यांचे समर्थक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी पोलीस ठाण्यात केली. त्यावेळी तिथे असलेल्या काही पत्रकारांनी धोटे यांना झालेल्या अटकेबाबत विचारले असता पोलिसांनी धोटे यांना बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत मानवाधिकाराचे हनन करण्याचा प्रयत्न केला.त्यातच कार्यकर्त्यांचा रोष बघून शेवटी पोलिसांनी धोटे यांना बोलू दिले असतान आपल्याला पहाटे चार वाजता पोलिसांनी कसे घरी येऊन कशापध्दतीने अटक केली,याबद्दल आपबीती सांगितली.एक उपपोलीस निरीक्षक यांनी त्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून परिस्थिती सांगितली आणि लगेच फोनवरील आदेशान्वये आपणास पोलिसांनी अक्षरशः ओढाताण करून प्रतिक्रिया देण्यास मनाई केली आणि त्यांना अमानुषपणे ओढत नेले.पोलीस हे कायद्याचे सरंक्षक राहिले नसून आत्या कायदाच वेशीवर टांगू लागल्याने लोकशाहीची हत्या करीत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त करीत सरकारच्या कृत्याचा निषेध नोंदविला.
Wednesday, 21 August 2019
दोन हजारांच्या उधारीवरून तरुणाची हत्या,तपास पथकाला आयुक्तांनी दिला ८० हजारांचा रिवॉर्ड !
Tuesday, 20 August 2019
जि.प.अध्यक्ष व पालकमंत्र्यांच्या हस्ते शालेय दप्तरांचे वितरण
राज्य नाविन्यता सोसायटीच्या वतीने देवरी, सालेकसा व अर्जुनी/मोरगाव या आदिवासी बहूल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील इयत्ता पहिलीमध्ये शिक्षण घेणाऱ्या २३४३ विद्याथ्र्यांना शालेय दप्तर पुरविण्यात येणार आहे. यावेळी देवरी तालुक्यातील जि.प.च्या १२ प्राथमिक शाळेतील ९७ विद्याथ्र्यांना शालेय दप्तर वितरीत करण्यात आले. या दप्तराचे वजन ४०० ग्राम असून त्याचे रुपांतर विद्याथ्र्यांना बसण्यासाठी चटई, लिहीण्या व वाचण्याकरीता डेस्क या दप्तरासोबत देण्यात आले आहे. पर्यावरण पुरक असे हे दप्तर आहे. विद्याथ्र्यांना साबणाने हात धुण्यासाठी साबण ठेवण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. मुलांनी केलेला कचरा इतरत्र न टाकावा यासाठी दप्तरामध्ये छोटी पिशवी सुध्दा आहे. या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे, सर्व शिक्षा अभियानाचे श्री बिसेन, श्री ठोकने यांचेसह विविध शाळांचा केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी त्यांचे पालक तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
देवरी ग्रामीण रुग्णालय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
देवरी दि. 19 : देवरी हा तालुका राज्याच्या टोकावर आहे तसेच येथून राष्ट्रीय महामार्ग जातो. महामार्गावर अपघात झाल्यास जखमीला तातडीने उपचार मिळाले पाहिजे. हा तालुका आदिवासी बहुल, दुर्गम व नक्षलग्रस्त असल्यामुळे या तालुक्यातील जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.
19 ऑगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालय देवरीच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमीपूजन डॉ. फुके यांनी केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार केशवराव मानकर, नगराध्यक्ष कौशल्या कुंभरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अल्ताफ अकबर अली, जि.प.समाजकल्याण समिती सभापती विश्वजीत डोगंरे, पंचायत समिती सभापती सुनंदा बहेकार, उपसभापती गणेश सोनबोईर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके,प्रमोद संगीडवार, महेश जैन, यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. फुके म्हणाले, देवरीसारख्या मागास, दुर्गम व नक्षलग्रस्त भागात चांगली आरोग्याची सुविधा देवरी येथे नव्याने निर्माण होणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत मिळणार आहे. इमारतीचे बांधकाम उत्तम दर्जाचे झाले पाहिजे. देवरी हे शहर राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे अपघाताच्या घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावे यासाठी चांगले ट्रामा केअर सेंटर सुरु करावे. चांगला बगीचा या नवीन इमारतीच्या परिसरात तयार करावा. जुने झाडे तोडू नये. पाच वर्षात देवरी तालुक्यात विकास कामे झाली आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार पुराम म्हणाले, तालुक्यातील रुग्ण व नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. यासाठी सुसज्ज अशी ग्रामीण रुग्णालयाची इमारत दिडवर्षाच्या आतच तयार होणार आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या देखील पाहिजे त्या प्रमाणात असली पाहिजे. हे शहर राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे अपघातातील जखमींना वेळीच उपचार मिळाले पाहिजे. जिल्हयात अधिकारी कर्मचाऱ्यांची भरती करतांना या नक्षलग्रस्त तालुक्यातील रिक्त पदे प्राधान्याने भरावे. देवरी शहराच्या विकासासाठी सतरा कोटीची विकास कामे मंजूर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नव्याने बांधण्यात येणाऱ्या देवरी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीवर 12 कोटी 32 लाख 65 हजार रुपये खर्च येणार असून ही इमारत एक वर्षाच्या आत पूर्ण होणार आहे. याइमारतीमध्ये वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांचे निवासस्थाने, विविध कक्ष राहणार आहे.
Monday, 19 August 2019
नक्सलग्रस्त अतिसवेंदनशील मिसपीरी/धमदीटोला ग्राम पहुँचे पालकमंत्री, 2011 में नक्सलियों ने ग्राम पंचायत सहित सभी दस्तावेजो को जला डाला था।
आदिवासी दुर्गम भागों में स्वास्थ्य सुविधा हेतु बाइक एम्बुलेंस प्रारंभ करेंगे- पालकमंत्री डॉ. फुके
देवरी,19 ऑगस्ट :- नक्सल प्रभावित देवरी तहसील के अतिदुर्गम क्षेत्र ग्राम ककोडी में 2 करोड़ 29 लाख रुपयों की लागत से निर्मित सुसज्ज भव्य प्राथमिक आरोग्य केंद्र का लोकार्पण पालकमंत्री डॉ. परिणय फुके के हस्ते आज किया गया। पालकमंत्री ने कहा, इतने दुर्गम क्षेत्र में अत्याधुनिक सुविधाओं से सुसज्ज अस्पताल का निर्माण सम्भव होना, ये विधायक संजय पुराम का अथक प्रयास है। मैं उनका हृदय से आभार मानता हूँ। इस आरोग्य केंद्र में ओपीडी, शस्त्रक्रिया, प्रसूति, कुटुबं कल्याण, ओषधी, लैब, 24 घंटे प्रसूती सुविधा सहित कैंसर जैसी जटिल बीमारी की जांच भी इस दुर्गम भाग के ग्रामीणों को प्राप्त हुई है, जो इस क्षेत्र के लिए एक वरदान साबित होगी। ग्रामीणों को स्वास्थ्य सुविधा का लाभ प्राप्त होगा। अब अनेक गावो के लोगो को देवरी और गोंदिया नही जाना पड़ेगा।पालकमंत्री ने कहा, दुर्गम, अतिसवेंदन शील आदिवासी क्षेत्रों के नागरिकों को स्वास्थ्य लाभ देने हेतु जल्द ही प्राथमिक उपचार के लिए बाइक एम्बुलेन्स सेवा प्रदान की जाएगी। पालकमंत्री ने कहा मैं सवास्थ्य के साथ साथ रोजगार, विकास पर अनेक कार्य कर विकसित क्षेत्र बनाने हेतु कृतसंकल्पित हूँ।
इस दौरान क्षेत्र के विधायक संजय पुराम, जिप अध्यक्ष सीमा मड़ावी, जिप उपाध्यक्ष अल्ताफ हामिद,सीईओ राजा दयानिधि,ककोडी सरपंच रियाज खान, जिला स्वास्थ्य अधिकारी श्याम निमगड़े, जीप सभापति लता दोनोड़े, जिप सदस्य माधुरिताई कुंभरे, देवरी पंस सभापति सुनंदाताई बहेकार, उपसभापति गणेशभाऊ, जिप सदस्य उषा ताई सहारे, तालुका वैधकीय अधिकारी ललित कुकडे, आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी सुनील यरने, महेंद्र मोहबंसी आदि समेत अनेको नागरिक उपस्थित थे।
Sunday, 18 August 2019
महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली
साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य
मृत गौतम फुलकुवरच्या वडिलांचा पत्रकार परिषदेत आरोप
![]() |
मृत गौतम फुवकुवर |
![]() |
फत्रकार परिषदेत बोलताना रामभरोस फुवकुवर आणि नातेवाईक |
Saturday, 17 August 2019
सर्पदंशाने दोन वर्षीय बालकाचा मृत्यू
राजकारणाची दिशा बदलत चालल्याने विकासाचे व्हिजन संपले-खा.पटेल
विनाअनुदानित दोन शिक्षकांचे झाडावर चढून आंदोलन
लायन्स क्लब देवरीच्या वतीने रक्षाबंधन साजरी
महाराष्ट्रातील वृक्ष लागवड ही सरकारी नौटंकी - अभिनेता सयाजी शिंदेंनीचा आरोप
स्वातंत्र्यदिनी देवरी येथे वृक्षारोपण

Friday, 16 August 2019
स्कुलव्हॅनच्या चाकात येऊन मुलाचा मृत्यू
Wednesday, 14 August 2019
नगरपंचायतच्या अपूर्ण नालीत पडुन मुलगा जखमी
नांदेडमध्ये शनिवारपासून पत्रकारांचे राष्ट्रीय अधिवेशन
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...