लाखनी,दि.6 : संगणक प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या गावाहून एका शिक्षकाने लाखनी येथे मित्राच्या घरी आणले. त्यानंतर तिथे या दोघानीही तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. परंतु भयभीत झाल्यामुळे या मुलीने कुठलिही वाच्यता केली नाही. दरम्यान, आज शनिवारला हा प्रकार आईवडिलांना सांगितल्यानंतर याप्रकरणी लाखनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.
याप्रकरणात लाखनी पोलिसांनी एका शिक्षकाला अटक केली असून दुसरा शिक्षक फरार आहे. लाखनी येथील आदर्श नगरातील दोन शिक्षकांनी दि.२ मे रोजी दुपारी १ वाजता शिक्षक थानसिंग बिसेन (४०) याने केसलवाडा (पवार) येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लाखनी येथे एमएससीआयटी या संगणक प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवून देतो, असे सांगून स्वत:च्या दुचाकीने आणले.
तिला आदर्श नगर येथील हिवराज कमाने (४२) या शिक्षकाच्या घरी घेऊन गेले. त्या ठिकाणी दोन्ही आरोपी शिक्षकांनी तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी हिवराज कमानेला अटक केली असून या मुलीला दुचाकीवर आणणारा थानसिंग बिसेन हा शिक्षक फरार असून पोलीस त्याच्यावर मागावर आहेत.
याप्रकरणी तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी भादंवि ३७६ (२) (फ) ३७६ (ड) सहकलम ४, १० लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण अधिनियम सहकलम अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ३ नुसार दोन्ही आरोपीविरूद्ध गुन्हे दाखल केले आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले हे करीत आहेत.
Sunday, 6 May 2018
दोन शिक्षकांनी केला विद्यार्थिनीवर अत्याचार
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment