Saturday, 5 May 2018

माओवाद्यांनी केली आदिवासी इमसाची हत्या

गडचिरोली,दि.5(अशोक दुर्गम)- जिल्ह्यात माओवाद्यांनी गोळया घालुन एका आदीवासी इसमाची हत्या केल्याची घटना धानोरा तालुक्यातील होरेकसा येथे उघडकीस आली आहे.पोलीस विभागाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार 4 मे च्या रात्री 12 ते 12.15 च्या सुमारास माओवादी हातात बंदुकाघेऊन त्यांच्या घरी गेले होते.त्यांनी बळजबरीने पांडुरंग पदा यांना सोबत चालण्याची धमकी दिली.पत्नी व मुलीने विचारणा केल्यावर गप्प बसण्यास सांगितल्यानंतर पत्नी व मुलीने आरडाओरड केल्याने गावकरी एकत्र आले.गावकऱ्यांनीही माओवाद्यांना पांडुरंग पदाला सोडण्याची विंनती केली मात्र ते न एैकता जंगलात नेले आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या.माओवाद्यानी पोलीस खबर्या असल्याचा उल्लेख सोडलेल्या पत्रकात केला आहे. तसेच अलीकडेच झालेल्या चकमकीचा बदला घेण्यासह गावागावात सभा घेण्याचे आवाहन करीत माओवाद्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवरही टिका केली आहे.
नक्षलवाद्यांनी काहीही एक कारण नसताना एका गरीब आदिवासी कुटुंबाला लक्ष्य करत त्यांचे कुटुंब उद्धवस्त केले. नक्षल्यांनी खून केल्यामुळे पदा यांच्या पत्नी व मुलगी यांचा आधार हिरावला गेला असून कुटुंबाचा रोजी रोटीचा प्रश्न आ वासून समोर उभा ठाकला आहे.
काल नक्षलवाद्यांविरोधात उघडपणे जाहीर नाराजी व्यक्त करणारी सगुणा असेल किंवा आज नक्षल्यांनी खून केलेल्या पदाची पत्नी असेल या गरीब आदिवासींचं कुटुंब उद्धवस्त करून नक्षलवादी कोणता विकास साधणार आहेत?त्यांना लोकशाही आणि संविधानाने घालून दिलेला मार्ग मान्य नसून ते बंदुकीच्या जोरावर दहशत पसरवून स्वतःचे राज्य निर्माण करू पाहत आहेत.आदिवासी समाजाचा विकास आपण हाती घेतला आहे असे भासवून आदिवासींचाच खून करणे,त्यांना धमकावून,दहशत पसरवून त्यांच्याकडून कामे करून घेणे असले उद्योग नक्षलवादी करत आहेत.आदिवासी त्यांच्या या दुटप्पीपणाला कंटाळलेले असून त्यांना नक्षल्यांचे खरे रूप कळले असल्यामुळेच काल रात्री घडलेल्या घटनेत संपूर्ण गावाने पांडुरंग पदा यांना सोबत घेऊन जाण्यास नक्षलीना नकार दिला होता.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...