मुंबई,दि.8ः महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार छगन भुजबळ यांची सोमवारला मुबंईतील केईएम रुग्णालयात ओबीसी सविंधानिक न्याय यात्रेचे संयोजक माजी आमदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने भेट घेऊन 11 मे रोजी आझाद मैदान येथे आयोजित ओबीसी संविधानिक न्याय यात्रेच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली.या कार्यक्रमात ओबीसी योध्दा या पुरस्काराने भुजबळ यांना सन्मानित करण्यात येणार आहे.यावेळी प्रा.श्रावण देवरे लिखित ओबीसी जनगणना ही पुस्तक भेटस्वरुपात देण्यात आली.भुजबळ यांची प्रकृती अद्यापही खालावलेली असून त्यांचे वजन सातत्याने कमी होत चालले आहे.अशा परिस्थीतीत त्यांनी चळवऴीच्या लोकांशी मनमोकळ्या चर्चा केल्या. यावेळी माजी आमदार हरिभाऊ राठोड, प्रा.श्रावण देवरे, किरणशेठ झगडे, ओमप्रकाश मौर्या व इतर मान्यवर उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया,दि.२१ : स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे, तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करुन स्त्रियांचे मोठ्या ...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
No comments:
Post a Comment