Tuesday, 8 May 2018

ओबीसी सेवा संघाचे मुख्यमंत्र्याना निवेदन,लिंगेवरील हल्ल्याचा निषेध

भंडारा,दि.८ः ओबीसी व सत्यशोधक समाजाचे सक्रिय कार्यकर्ते माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष शंकरराव लिंगे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा भंडारा जिल्हा ओबीसी सेवा संघाने निषेध नोंदवून निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
राज्य मागासवर्गीय आयोगातर्फे सोलापूर येथे शुक्रवारी मराठा आरक्षणाबाबत सुनावनी घेण्यात आली होती. त्यावेळी ओबीसी नेते व अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष शंकरराव लिंगे हे आयोगासमोर निवेदन देण्यासाठी निघाले होते. मात्र, त्यांना निवेदन देण्यास मज्जाव करुन त्यांच्यावर शाई फेकून कपडे फाडण्यात आले. या घटनेचा ओबीसी महासंघातर्फे निषेध नोंदविण्यात आला आहे. तसेच या कृत्याचा निषेध करीत ज्यांनी हा भ्याड हल्ला केला त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, यापुढे राज्य मागासवर्गीय आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या सुनावनी दरम्यान सर्व ओबीसी निवेदनधारकांना व ओबीसी नेत्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवासी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात भंडारा जिल्हा ओबीसी सेवा संघ अध्यक्ष गोपाल सेलोकर, तुळशीराम बेंद्रे, भैय्याजी लांबट, मनोज बोरकर, अनतराम झंझाड आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...