Tuesday, 8 May 2018

भाजप नगरसेविका अनिता अरोरांचा राजीनामा

तिरोडा,दि.7ःः तिरोडा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 2(ब)च्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका अनिता अशोक अरोरा यांनी 3 मे रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपविल्याने खळबळ माजली आहे.श्रीमती अरोरा यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविलेल्या राजीनामा पत्रात नगरपरिषदेचे पदाधिकारी व अधिकारी आपल्या प्रभागातील समस्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या,परिसरात पसरलेली घाण,अस्वच्छता,पथदिवे आदींचा अभाव असून नागरिकांचा वाढता अाक्रोश बघून आपण आपल्या नगरसेविका पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...