Tuesday, 27 February 2018

भुवराजजी सोनवाने यांचे निधन

गोंदिया,दि.२७ः गोंदिया जिल्हा शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद महाविद्यालय आमगावचे शिक्षक महेंद्र सोनवाने यांचे वडील भुवराजजी सोनवाने यांचे मंगळवारला दिर्घ आजाराने निधन झाले.त्यांच्यावर २८ फेबुवारीला ४ वाजता गोंदिया येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

नागपूर विद्यापीठाच्या डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांची पदविका रद्द



नागपूर,दि.27 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासनावर एकेकाळी वर्चस्व असलेल्या डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांच्यावर सोमवारी नामुष्कीची वेळ आली. वाङ्मय चौर्यकर्म प्रकरणात त्यांची गांधी विचारधारेची स्नातकोत्तर पदविका रद्द करण्यात आली. यासंदर्भात नेमलेल्या चौकशी समितीच्या शिफारशींवर तब्बल २७ वर्षांनी अंमलबजावणी झाली. परीक्षा मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणारी कुठलीही व्यक्ती आढळली तरी कारवाई करू व कुणाचीही गय करण्यात येणार नाही, असा इशारा कुलगुरूंनी दिला आहे. डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांच्यासाठी ही कारवाई म्हणजे मोठा धक्का मानण्यात येत आहे.
गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमात वाङ्मय चौर्यकर्म केल्याच्या तब्बल ३० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नोटीस बजावली होती. तत्कालीन व्यवस्थापन परिषद सदस्य रामभाऊ तुपकरी यांनी यासंदर्भात विद्यापीठाकडे तक्रार केली होती.
डॉ.मिश्रा यांनी आपल्या ‘फिल्ड रिपोर्ट’मध्ये आर.व्ही.राव यांनी १९६९ साली लिहिलेल्या पुस्तकातील १० प्रकरणे शब्दश: ‘कॉपी’ केली होती हे सांगणाऱ्या न्या.रत्नपारखी यांच्या चौकशी अहवालाला १९९२ साली तत्कालीन व्यवस्थापन परिषदेने मान्यदेखील केले. हे प्रकरण परत एकदा समोर आल्यानंतर विद्यापीठाने डॉ.मिश्रा यांना नोटीस बजावली होती. दुसरीकडे डॉ.मिश्रा यांनी दिवाणी न्यायालयात जुनी याचिका पुनर्जीवित करण्यासाठी अर्ज दाखल केला. मागच्या आठवड्यात त्यांनी स्नातकोत्तर पदविका परत करत असल्याचे पत्र विद्यापीठाला पाठविले होते. परंतु त्यांना तसा अधिकारच नसल्याचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले होते. याप्रकरणात कायदेशीर सल्ल्यानंतर डॉ.मिश्रा यांची स्पष्टीकरण देण्यासंदर्भातील मुदत सोमवारपर्यंत वाढविण्यात आली होती तसेच परीक्षा मंडळाच्या बैठकीत त्यांना स्वत: उपस्थित राहायचे होते. परंतु डॉ.मिश्रा यांनी स्पष्टीकरणदेखील सादर केले नाही व ते उपस्थितदेखील झाले नाही. अखेर सोमवारी परीक्षा मंडळाच्या बैठकीत डॉ.मिश्रा यांची पदव्युत्तर पदविका काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कुलगुरू डॉ.काणे व प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून ही माहिती दिली.

Monday, 26 February 2018

चिचगड येथील श्रीराम विद्यालयात कॉपीचा महापूर

पोलिस आणि होमगार्डच्या देखत होतो पुरवठा

गोंदिया,दि.२६- सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्त परीक्षेचा ढोल बडवला जात असताना देवरी तालुक्यातील चिचगडच्या श्रीराम विद्यालयामध्ये कॉपीचा महापूर आल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे. दरम्यान, पोलिस आणि होमगाड्र्स यांच्या देखरेखीत होत असलेल्या पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा रंगल्या असून शिक्षण विभाग या विरुद्ध काही कार्यवाही करणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार आज बारावीच्या भौतिकशास्त्र या विषयाचा पेपर होता. देवरी तालुक्यातील चिचगड येथील श्रीराम विद्यालयातील परीक्षा केंद्रावर पोलिस आणि होमगाड्र्स असताना सुद्धा परीक्षाथ्र्यांना बाहेरून कॉपीचा पुरवठा सर्रासपणे सुरू होता. परिणामी, पोलिस बंदोबस्त असताना बाहेर असा देखावा असेल, तर आतमध्ये कोणता प्रकार चालला असावा याची कल्पना न केलेलीच बरी. शासनाने कॉपीमुक्त परीक्षेचे धोरण जाहीर केले असताना असे प्रकार सर्रास सुरू असतील, तर अशा केंद्रावर सरकार आणि शिक्षणविभाग काही कार्यवाही करणार का? असा प्रश्न नागरिकांनी सरकारला केला आहे.

गोंदिया जिल्ह्यात मंडप डेकोरेशनसाठी ई-निविदेला फाटा

आमदार मोरेनी लावला ताराकिंत प्रश्न

उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे म्हणतात आॅडिट झालेय, मात्र जिल्हाधिकारी देणार माहिती

बेरार टाईम्सने केेले होते वृत्त प्रकाशित

गोंदिया,दि.२६- गोंदिया जिल्ह्यात २०१५ साली झालेल्या जि.प. व पं.स. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदारांनी मंडप डेकोरेशन, वाहन व इतरकामात नियमबाह्य निधी खर्च करून शासकीय निधीचा गैरव्यवहार केल्याचे एका चौकशीतून समोर आले आहे. दिवाळीपूर्वी कारवाईसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल सादर झालेला होता. त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यातच याप्रकरणात प्रशासनानेच ऑडिट केले असून याप्रकरणात काय कारवाई करायची आणि त्यासंबधीची माहिती स्वतः जिल्हाधिकारी देणार, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी व जि.प.प.स.निवडणुक अधिकारी शुभांगी आंधळे यांनी दिली. उल्लेखनीय म्हणजे साप्ताहिक बेरार टाईम्सने 6 नोव्हेंबर २०१७ ला मंडप डेकोरेशनसाठी ई निविदेलाही फाटा या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. 
या वृत्ताची दखल घेत भिवंडीचे आमदार शांताराम मोरे यांनी यासंबधी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ताराकिंत प्रश्न(क्र.११२३८१) लावला आहे. त्या प्रश्नांच्या संबधाने विधानमंडळाचे प्रधान सचिव यांनी ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांना १७ फेबुवारी रोजी पत्र पाठवत सदर प्रश्नाबाबतची वस्तुस्थिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. सोबतच सदर प्रश्न स्वीकृत झाल्यास १६ मार्चला विधानसभेत चर्चेला येणार असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणात प्रशासनाने काय कारवाई केली आहे. कारवाईमध्ये काय आढळून आले. गैरव्यवहार झाले असेल तर चौकशी करुन कारवाईस उशीर का करण्यात आले, अशाप्रकारची माहिती ताराकिंत प्रश्नांच्या माध्यमातून आमदार मोरे यांनी विचारणा केली आहे.
२०१५ मध्ये गोंदिया जिल्ह्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत निवडणुक निर्णय अधिकारी असलेल्या आठ तहसिलदारांनी नियमबाह्य खर्च करुन शासकीय निधीचा गैरव्यवहार केल्याचे निवडणूक विभागाने केलेल्या चौकशीतून उघड झाले आहे. तो अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर होऊन ४ महिन्याचा काळ लोटला असला तरी एकाही त्यावेळच्या तहसीलदारांवर कारवाई अद्यापही झालेली नाही. त्यातच याप्रकरणात अधिक चौकशीची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुकेश मिश्रा यांनीही तक्रारद्वारे केली आहे. 
या  अहवालात आठही तहसीलदारांनी वाहनभाड्यासह इंधनाचे देयके,डेकोरेशन व इतर साहित्य खरेदीमध्ये अनियमितता केली असून देयके अदा करताना टीडीएस व आयकराची कपात केली नसल्याचा धक्कादायक प्रकार या अहवालात आहे. याशिवाय संबंधित तहसीलदारांकडून या निधीची वसुली करण्यात यावी, असेही अहवालात म्हटले आहे

Sunday, 25 February 2018

प्रा. बबनराव तायवाडे सेवानिवृत्त

नागपूर,दि.25- धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य आणि यंग टीचर्स संयोजक प्रा. बबनराव तायवाडे हे आज प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाले. याप्रसंगी त्यांच्या सेवानिवृत्तीसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
धनवटे नॅशनल कॉलेजच्या पटांगणात आयोजित या सोहळ्याला शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी अध्यक्ष वसंतराव धोत्रे, अनंतराव घरड, गिरीश गांधी, बाळ कुलकर्णी, रणजित मेश्राम, डाॅ़ धनराज माने, आमदार शशीकांत खेडकर, शैलेष पांडे, महापौर नंदाताई जिचकार, प्राचार्य बलविंदर, गजानन जानभोर, प्राचार्य बबनराव तायवाडे, प्राचार्य शरयू तायवाडे, अतुल लोंढे, संस्था उपाध्यक्ष नरेश ठाकरे, दिलीप इंगोले फुंडकर, प्रमोद मानमोडे , प्रा.एन.एच खत्री संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य बबनराव तायवाडे यांचा सपत्निक सत्कार संस्थेचे अध्यक्ष वंसतराव धोत्रे, हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
आपल्या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्त बोलताना प्राचार्य डाॅ.बबनराव तायवाडे म्हणाले की, १९७६ साली याच महाविद्यालयात विद्यार्थी म्हणून आलो. पण जिथे विद्यार्थी म्हणून घडलो,त्याच महाविद्यालयाचा प्राचार्य होणार याची कल्पना सुद्धा केली नव्हती. या महाविद्यालयातील शिक्षक हेच आमचे मार्गदर्शक होते. बायोफोकलचा इन्स्ट्रक्टर म्हणून नोकरीला सुरवात केली. काम करायची संधी मिळाली. जोपर्यंत शिक्षक होतो, तेव्हापर्यंत कधीच पुस्तक हातात घेऊन वर्गात गेलो नाही. १० वर्षे ८ महिन्यांच्या नोकरीनंतर प्राचार्य म्हणून रूजू झालो.  त्यावेळी जो विश्वास संस्थेचे अध्यक्ष धोत्रे साहेबांनी दाखविला, तो टिकविण्यात मी यशस्वी राहिलो याचे पूर्ण समाधान आहे. संबंधामुळेच महाविद्यालयाच्या विकासाला प्रेरणा मिळाली. संस्थेने माझे सर्वच प्रस्ताव स्वीकारले. ते ऋण मी कधीही विसरणार नाही. आपल्या १९ वर्षाच्या  कार्यकाळात महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोचविल्याचा अभिमान आहे. आमची मैत्री आजही कायम टिकून आहे. यंग टिचर्स मुळे १० हजार लोकांच्या घरात आज चुली पेटल्या आहेत. महाविद्यालयाला सारून दुसऱ्या कामांना कधीच प्राधान्य दिले नाही. ओबीसींसाठी काहीतरी काम करुन समाजाला सरकारकडून काही मिळवून देता येईल, हेच प्रयत्न करीत आहोत. चांगल्या मनाने काम करा, लोक नक्कीच सहकार्य करतात, हे ओबीसी कार्यक्रमातून समोर आले आहे. मला ५१ लाख रुपयाचा धनादेश समाजकार्यासाठी दिला त्या राशीचा उपयोग समाजकार्यासाठीच होणार याची ग्वाही देत कृतज्ञता व्यक्त करतो.
कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख म्हणाले की, समाजकार्यासाठी ३ वर्षाची मुदतवाढ मिळत असताना सुद्धा त्यांनी ती टाळून समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेण्याचा निर्णय घेतला. संस्थेच्या कार्यकारिणीचा सदस्य असताना मला कधीच वाटले नाही. वैयक्तिक कार्यातही नेहमीच राहिली. पण मला अध्यक्ष म्हणून काम करून घेण्याची  संधी मिळालीच नाही, असे विचार व्यक्त केले. माजी सहकारमंत्री वसंतराव धोत्रे यांनीही तायवाडे यांच्या कार्याची स्तुती केली. विनोदी शैलीत सर्वांना खूश केले. तायवाडे या संस्थेचे संचालक म्हणून येथे काम करतील. त्यांचा स्वतंत्र कक्षही राहील, अशी घोषणा संस्थेच्या संचालकांच्या वतीने केली. त्यांनी आपले कर्तृत्व सिध्द केले आहे
 अनंतराव घरड म्हणाले की, येथून राजकारण, समाजकारणाला बबनरावांनी सुरवात केली. हा निरोप समारंभ नव्हे तर सत्कार सोहळा त्यांचा आहे. कांग्रेसचे राजकारण कधीच होऊ दिले नाही.
जेष्ट पत्रकार रणजित मेश्राम म्हणाले, मित्रत्वाचे सौख्य जपणारे व्यक्तिमत्व त्यांनी कधीच स्वतःपुरता विचार केला नाही.  त्यांनी नेहमीच गृपच्या माध्यमातून समाजासाठीच नव्हे विद्यापिठाच्या शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यामुळे बहुजन समाजाच्या विद्यार्थांना घडविण्याचे काम केले. तुम्ही ओबीसीचे काम हाती घेतले आहे आता निवृत्तीनंतर तुम्हाला ओबीसीची मशाल कानाकोपऱ्यात पोचवून जनजागृतीचे कार्य करण्याची जबाबदारी वाढली आहे. प्राध्यापकांच्या समस्येसाठी यंग टिचर्स असो.ची स्थापना केली. आजही चालवित आहेत. पण आज त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा होत आहे. परंतु, त्यांच्या संघटनेचे नाव मात्र यंग टिचर्सच हे कसं?                                                
बाळ कुलकर्णी म्हणाले, शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक,सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच सामाजिक कार्यासाठी आपल्या कार्यकाळात उपलब्ध करुन एका शिक्षण संस्थेचा परीसर जनतेत सामाजिक चळवळीचे केंद्र म्हणून उपलब्ध करून देण्याचे धाडस अभिनंदनीय आहे. पेट्रोलपंपावर काम करीत असताना शिक्षण घेत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीत मित्रांच्या प्रत्येक सुख दुखात नेहमी सोबत राहणारे व्यक्तिमत्व बबनराव आहे.
गिरीश गांधी म्हणाले की, बबनराव म्हणजे सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व. खस्ता घालून आपले जिवन घडवले. स्वतःसाठी कधी जगले नाही. विद्यार्थी जिवनापासून जी धडपड होती, तोच संघर्ष समाजासाठी त्यांनी केला. त्यांच्या हातून ३५ विद्यार्थी हे आचार्य घडले, हे त्यांचे कार्यकौशल्य आहे. देशपातळीवर ते ओबीसी संघटनेच्या माध्यमातून पोचले आहेत. आपले कर्तृत्व राजकारणात वैरत्व बदलण्याची शक्यता असल्याने सांभाळून राहण्याची गरज आहे. सामाजिक क्षेत्रात काम करताना प्रतिस्पर्धी तसे कमीच असतात.आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत. महाविद्यालयाला जे नाव मिळाले ते वेगळे आहे. गौरीशंकर पाराशार यांनी सांगितले की,विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्यात नेहमी सहकार्य केले. गुटखा खाने के बाद वो एडवांटेज है क्यु की बोलना ही नही पडता. बबनराव गृपला घेऊन काम करणारे असल्याने त्यांना काही अडचन नाही. तायवांडेचा पर्याय शिक्षण संस्थेला सध्या नाही. त्यामुळे त्यांचे या प्रांगणात अस्तित्व कायम राहणे गरजेचे आहे. त्यांच्या कार्याचा वापर संस्थेने करावा, अशी संस्थेला विनंती आहे. आपल्या सेवानिवृत्तीला दोन्ही अध्यक्ष उपस्थित आहेत, हीच कार्याची पावती होय.
प्राचार्य व सेवानिृत्ती सत्कार समितीच्या वतीने जाहिर सत्कार करण्यात आले. यावेळी ५१ लाखाचा धनादेश प्राचार्य बबनराव तायवाडे यांना देण्यात आला. संचालन प्रा.कोमल ठाकरे यांनी केले.

तहसीलदार विजय बोरूडे यांचा मरणोत्तर देहदानाचा निर्णय

देवरी:२४ (बेरार टाइम्स प्रतिनिधी)
देवरी तहसीलचे तहसीलदार तथा उपविभागीय अधिकारी विजय जबाजी बोरूडे यांनी १४ फेब्रू. रोजी आपल्या मरणोत्तर देह दानाचे प्रतिज्ञापत्र के टी एस शासकिय वैधेकीय महाविध्यालय गोंदिया येथे सादर केले. या सबंधित माहिति स्वतः विजय बोरूडे यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून जाहीर केली. विजय बोरूडे यांचे वय ३९ वर्षें असुन यांचे गाँव अहमदनगर ज़िल्हातिल श्रिगोंदा येथील आहे. विजय बोरूडे यांच्या निर्णयचा सर्व तालुक्यात कौतुक केला जात आहे.

अभिनेत्री श्रीदेवी काळाच्या पडद्याआड



पुणे,दि.24 : आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अदाकारीने कोट्यवधी भारतीयांच्या मनावर छाप सोडणारी अभिनेत्री श्रीदेवी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने दुबईत रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास निधन झाले.
चंदेरी दुनियेत गेली अनेक दशके लुकलुकणारी "चाँदनी" 54 व्या वर्षी अचानक लुप्त पावल्याने तिच्या लाखो चाहत्याना मोठा धक्का बसला आहे. 
तामिळनाडुतील सिवाकासी येथे 13 ऑगस्ट 1963 रोजी श्रीदेवी हिचा जन्म झाला होता. वयाच्या चौथ्या वर्षीच तिने "थुनाईवन" या चित्रपटाद्वारे अभिनयाचा "श्रीगणेशा" केला. त्यानंतर अनेक वर्ष तेलगु, तामिळ, मल्याळम व कन्नड चित्रपटात तिने बाल कलाकार म्हणुन काम केले. तर बॉलीवुडमध्येही 1975 मध्ये आलेल्या "ज्युली" चित्रपटात तिला बाल कलाकार म्हणुन काम करण्याची संधी मिळाली.1976 मध्ये आलेल्या "मोंदुरु मूडुचु" या तामिळ चित्रपटात वयाच्या 13 व्या वर्षी मुख्य नायिकेचे पात्र साकारता आले. 
"श्रीदेवी" या नावाने ती तामिळ व तेलगु चित्रपटात मुख्य भूमिकेत  झळकू लागली. तर  बॉलीवुडमध्ये 1978 ला "सोलवा सावन" या चित्रपटात मुख्य नायिकेच्या भूमिकेत श्रीदेवी झळकली. हिम्मतवाला, मवाली, तोफा, नया कदम, मक्सद, मास्टरजी, नजराना असे कित्येक "हिट" चित्रपट तिने उमेदीच्या कालात दिले. "मिस्टर इंडिया", "चाँदनी", "सदमा" या चित्रपटातील तिच्या अनोख्या अभिनय शैलीवर त्यावेळची तरुणाई अक्षरश: फिदा झाली.
"खुदा गवाह", "लाडला", "जुदाई" असे उत्कृष्ट चित्रपटही तिने दिले. लग्नानंतर काही काळ ती संसारात रमली. त्यानंतर "इंग्लिश विंग्लिश"द्वारे श्रीदेवीने सुरु केलेली "सेकेंड इनिंग" मध्यमवर्गीयांच्या मनात घर करुन गेली. तब्बल पाच वेळ "फिल्म फेअर अवॉर्ड" तिने पटकाविला. तर केन्द्र सरकारने श्रीदेवीला "पद्मश्री" देऊन तिचा यथोचित सन्मान केला.

Saturday, 24 February 2018

पतीवरील बलात्काराचा आरोप खोटा,पोलीस पत्नीचा दावा


सांगली,दि.24 : बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या निलंबित पोलीस कर्मचारी व इतर तरुणांच्या कुटुंबियांनी शहर पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करत सांगली शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत ३ महिलांनी रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
शहर पोलीस ठाण्यात तीन दिवसांपूर्वी शहर पोलीस ठाण्यातील एक निलंबित पोलीस कर्मचा?यासह ८ जणांवर एका मुलीने बलात्कार केल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार नोंदविली. मात्र हा गुन्हा खोटा असल्याचा आरोप करत गुन्हे दाखल झालेल्यांच्या कुटुंबियांनी आज शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. ज्या मुलीने बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली ती मानसिक रोगी आहे. तिची आधी तपासणी करावी व मगच गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्यानंतर मोर्चात सहभागी झालेले पोलीस कर्मचारी व अन्य कुटुंबातील तिघा महिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेत स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. आत्मदहनाचा प्रयत्न करणाºया महिलांना ताब्यात घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न रोखण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेमुळे शहर पोलीस ठाण्यासमोर मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

राज्यसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले! 58 जागांसाठी 23 मार्चला होणार मतदान




नवी दिल्ली,दि.23 – यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात कार्यकाळ संपत असलेल्या राज्यसभा सदस्यांच्या जागा भरण्यासाठी  राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीचे बिगुल आज वाजले. कार्यकाळ संपत असलेल्या एकूण 58 सदस्यांच्या रिक्त होत असलेल्या जागांसाठी 23 मार्च रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांमध्ये महाराष्ट्रामधील सहा जागांचा समावेश आहे.  त्याबरोबरच केरळमधील एका जागेसाठी पोटनिवडणुकही होणार आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी यासंदर्भातील घोषणा केली आहे.
येत्या एप्रिल आणि मे महिन्यात 16 राज्यांमधील राज्यसभेच्या एकूण 58 सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 58 जागांसाठी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख 12 मार्च आहे. तर या जागांसाठी 23 मार्च रोजी मतदान होणार आहे.

मायबाप म्हणते अभ्यास कर, मोदी सरकार म्हणते पकोडे तळ

बेरोजगारांचे आक्रोश आंदोलन
स्टेशन व्यवस्थापकांना दिले निवेदन

गोंदिया,दि.23 : मोदी सरकार के राज मे बेरोजगार रास्ते पे, जाचक अटी रद्द करा, बेरोजगारांना रोजगार द्या, नोकरी आमची हक्काची नाही कुणाच्या बापाची, आम्ही सर्वांची एकच भूल कमळाचे फुल, मायबाप म्हणते अभ्यास कर अन् मोदी सरकार म्हणते पकोडे तळ, अशा घोषणा देत बेरोजगार युवकांनी शुक्रवारी (ता.२३) सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक तहसील कार्यालय येथून गोरेलाल चौकातील रेल्वे कार्यालयावर मोर्चा काढला. यात शेकडो सुशिक्षित बेरोजगार युवक सहभागी झाले होते. यावेळी युवकांनी सरकारविरूद्ध तीव्र रोष व्यक्त केला.
रेल्वे स्पर्धा परीक्षार्थ्यांवर होणाºया अन्यायाविरोधात बेरोजगार युवा मोर्चाच्यावतीने शुक्रवारी आक्रोश आंदोलन व रेल्वे कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हा भरातील युवक यात सहभागी झाले होते. शहरातील मुख्य मार्गावरून हा मोर्चा रेल्वे कार्यालयाजवळ पोहचला. मोर्च्यात सहभागी युवकांनी सरकार आणि रेल्वे बोर्डाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन रेल्वे व्यवस्थापक रवी नारायणकार यांना देण्यात आले. यावेळी दिलेल्या निवेदनातून रेल्वे भरती बोर्डाच्या ‘ग्रुप डी’पदाच्या होणाºया भरतीतून आयटीआय अनिवार्यची अट रद्द करावी, कमीत कमी योग्यता दहावी ठेवण्यात यावी, परीक्षा शुल्क ५०० रुपये चालान स्वरुपातील शुल्क वाढ मागे घेऊन नि:शुल्क अर्ज स्विकारण्यात यावे, रेल्वे भरती बोर्डाद्वारे दरवर्षी रोजगार भरती प्रक्रिया अनिवार्य करावी, एमपीएसस, यूपीएससी, शिक्षक भरती व इतर स्पर्धा परीक्षांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, परीक्षेनंतर सहा महिन्यात भरती पूर्ण करावी, महिलांसाठी लागू केलेली शारीरिक चाचणी अट रद्द करून पूर्वीप्रमाणेच भरती प्रक्रिया घेण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.

मिलिंद एकबोटे अखेर शिक्रापूर पोलिस ठाण्यात शरण




पुणे,दि.23-– 1 जानेवारी रोजी पुण्यातील कोरेगाव भीमा येथे घडलेल्या हिंसाचाराचे आरोपी मिलिंद एकबोटे शुक्रवारी पोलिसांना शरण आले आहेत. एकबोटे स्वतःहून शिक्रापूर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी मिलिंद एकबोटेने हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली होती. मात्र, या प्रकरणातील घटनेच्या चौकशीसाठी पोलिसांना त्याला अटक करण्याचे आदेश कायम होते. अखेर सर्व मार्ग बंद झाल्याने 53 दिवसानंतर एकबोटे स्वत:हून पोलिस ठाण्यात शरण आले.
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी आणि समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे याला सुप्रीम कोर्टाने चार दिवसापूर्वी 14 मार्चपर्यंत अटक न करण्याचा दिलासा दिला होता. कोर्टाने 14 मार्चपर्यंत एकबोटे यांना अंतरिम जामीन मंजूर करताना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घ्यावे किंवा अटक करावी असे निर्देश दिले होते. मुंबई हायकोर्टाने एकबोटे यांना जामीन देण्यास नकार दिला होता. नंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
एकबोटे यांनी दिलेल्या चिथावणीनंतर कोरेगाव-भीमा येथे दंगल उसळली, असा त्यांच्यावर आरोप आहे. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (अ‍ॅट्रॉसिटी) त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून चिथावणी देणे, दगडफेकीस प्रवृत्त करणे, लोकांना चिथावणी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे अटक होण्याच्या भीतीने एकबोटे यांनी पुणे सेशन कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र एकबोटे यांच्यावर दाखल असलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून त्यांना अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असेही कोर्टाने नमूद केले होते. अखेर 53 दिवसानंतर एकबोटे शिक्रापूर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी स्वत:हूनच शरण आलेला आहे.

Thursday, 22 February 2018

नक्षलवाद्यांनी दरोडा घालून दिली धमकी

दलदलकुही नाल्याजवळील घटना़

गोंदिया,दि.२२ : सात सशस्त्र नक्षलवाद्यांनी रस्त्यात ट्रक अडवून २८ वर्षीय इसमास शिवीगाळ करून त्याचेकडील ५ हजार रुपयांचा माल दरोडा घालून कोणालाही न सांगण्याची धमकी दिल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी सालेकसा तालुक्यातील दलदलकुही नाल्याजवळ घडली.
फिर्यादी जितेंद्र भिवलाल पटले (२८) रा. बोदा ता. तिरोडा हा गिट्टीने भरलेला ट्रकचा माल सोडून दलदलकुही घाटाजवळ परत येत असताना भारत सरकारने प्रतिबंध केलेले सीपीआय माओवादी संघटनेचे दरेकसा दलमचे नक्षलवादी विकास उर्फ नवज्योत नागपूरे व इतर सात सशस्त्र नक्षलवाद्यांनी रस्त्यात ट्रक अडवून स्वत:जवळ बेकायदेशीररित्या अग्नीशस्त्र बाळगून फिर्यादीस शिवीगाळ करून मोबाइल किंमत ५ हजार रुपयांचा माल दरोडा घावून व काहीही न सांगण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी भादंवि कलम ३९५, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नवले करीत आहेत.

गळा दाबून अल्पवयीन मुलाचा खून येथील घटना

चिचगड येथील घटना


गोंदिया ,दि.२२: खेळण्याच्या वादातून झालेल्या भांडणातून एका अल्पवयीन मुलाचा अल्पवयीन मुलाने गळा दाबल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना देवरी तालुक्यातील चिचगड येथे काल २१ फेब्रुवारी रोजी  सायंकाळी ८.३० वाजतादरम्यान घडली. पुष्कर निर्मल परिहार (१२) असे नाव मृतकाचे नाव आहे.
सविस्तर असे की, चिचगड येथील गुलाबाबा मंदिरात प्रवचनाचा कार्यक्रम होता. प्रवचनाचा कार्यक्रम ऐकण्यासाठी चिचेवाडा (वांढरा) येथील पुष्कर परिहार हा आपल्या आजीसह आला होता. तेव्हा मंदिराबाहेर  रस्त्यावर मुलांचा घोळका खेळत होता. दरम्यान, पुष्कर त्या मुलांसोबत खेळायला गेला.  दरम्यान  १५ वर्षिय मुलगा  त्यात मिसळला आणि पुष्करशी भांडण होवून  पुष्करचा गळा आवळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृतकाचे मुलाचे वडील निर्मल परिहार यांच्या तक्रारीवरून  त्या १५ वर्षिय मुलाला ताब्यात घेवून भादंवि कलम ३०२ गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार नागेश भास्कर यांच्या मार्गदर्शनात  पोउ सव्वालाखे, पोहवा भाटीया, अतकर, बिसेन, रुखमोडे, राजाभोज  करीत आहेत.

मुख्यमंत्र्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा




देवरी पोलिस ठाण्यात माजी खासदार नाना पटोलेंची तक्रार

गोंदिया,दि.२२- देवरी तालुक्यातील पिंडकेपार येथील शेतकऱ्याने कर्जापायी केलेल्या आत्महत्येला राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हेच जबाबदार असल्याने त्यांच्यविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या आशयाची तक्रार माजी खासदार नाना पटोले यांनी आज आज २२ फेब्रुवारी रोजी देवरी पोलिस ठाण्यात लिखीत स्वरूपात दिली.
सविस्तर असे की, पिंडकेपार येथील माधोराव आत्माराम गजभिये वय ५४ वर्ष यांनी कर्जाची परतफेड न करू शकल्याने नैराश्येच्या भावनेतून किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. एकीकडे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस गोंदिया जिल्हयाच्या दौऱ्याप्रसंगी गोंदिया जिल्हयात शेतकरी आत्महत्या करीत नाही. असे आपल्या संबोधनात म्हणतात आणि दुसऱ्याच दिवशी गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात कर्जापायी शेतकरी आत्महत्या करीत असल्याने या प्रकाराला मुख्यमंत्रीच दोषी असल्याने त्यांच्यविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी खा. पटोले यांनी देवरी पोलिस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीतून केली आहे. दरम्यान, देवरी पोलिसांनी ही तक्रार चौकशीसाठी वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले.

नायब तहसीलदार संजय राठोड एसीबीच्या जाळ्यात


ब्रम्हपुरी,दि.२२ः- अर्‍हेरनवरगांव घाट जवळ ट्रक्टरव्दारे रेतीची वाहतूक करीत असतांना नायब तहसीलदार संजय राठोड (३३) यांनी रेती वाहतुकीची ही वेळ योग्य नसल्याचे सांगून तक्रारकर्त्याला ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या मोबदल्यात १७ हजार रूपयाची मागणी केली. तक्रार कर्त्यांनी ही बाब लाच लुचपत विभागाला सांगितली. त्यांनी त्वरीत कार्यवाही करत नायब तहसीलदार राठोड याला आज बुधवार २१ फेब्रुवारी रोजी १५ हजार रूपयाची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले.
तालुक्यातील अर्‍हेरनवरगाव येथील तक्रार कर्ता हा शेतकरी असून एका ट्रॅक्टरचा मालकही आहे. तो अर्‍हेरनवरगाव रेती घाटावर ट्रॅक्टरव्दारे रेतीची वाहतुक करतो. नायब तहसीलदार राठोड यांनी ट्रॅक्टरव्दारे रेती वाहतूक करीत असतांना सदर वेळ ही रेती वाहतूकीची नसल्याचे कारण सांगुन तक्रार कर्त्यावर दबाव आणला. परंतु तक्रार कर्त्यांने वाहतुक परवानांची ही वेळ बरोबर असल्याचे नमुद असल्याचे सांगितले. त्यानंतर नायब तहसीलदार संजय राठोड यांनी ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तुला महिनाभर रेती वाहतुक करायची असेल व ट्रॅक्टरवर कोणत्याही प्रकारची कारवाईहोवू नये असे वाटत असेल तर १७ हजार रूपये देण्याची मागणी केली. तक्रार कर्त्याला सदर रक्कम द्यावयाची नसल्यामुळे त्यांने ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथे २0 फेब्रुवारी रोजी तक्रारी व्दारे सांगितली. आरोपी नायब तहसीलदार संजय राठोड विरोधात तक्रार दाखल झाल्याने अधिकारी व कर्मचार्‍यांनी ब्रम्हपुरी शहरातील तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला. आरोप राठोड यांने तक्रारदाराकडून महिनाभर रेती वाहतुक चालु रहावी याकरीता व कोणतीही कारवाई होवू नये यासाठी १७ हजार रूपयाची मागणी केली होती. याबदल्यात आज २१ फेब्रुवारी रोजी तक्रार दाराने नायब तहसीलदार राठोड याला १५ हजार रूपयाची रक्कम दिली. ही रक्कम देत असतांना लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी आरोप संजय राठोड याला पैसे स्विकारतांना रंगे हाथ पकडले. व आरोपीवर कलम ७,१३(१)(ड) सह १३(२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन १९८८ अन्वये गुन्हा नोंदविला.
सदर कारवाई पोलिस उपायुक्त पी.आर.पाटील,(नागपूर )अप्पर पोलिस अधिक्षक विजय माहुलकर,पोलिस उपअधिक्षक रोशन यादव,डी.एम. घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एम.एस. टेकाम,पोलिस हवालदार विठोबा साखरे,सत्यम लोहबरे,रविंद्र कात्रोजवार, महेश कुकडकार, गणेश वासेकर, घनश्याम वडेट्टीवार यांनी बजावली.

17 लाख विद्यार्थी चप्पल घालून बोर्डाच्या परिक्षेला

Patna:बिहार शालेय परिक्षा बोर्डाने (बीएसईबी) जाहीर केलेल्या नवीन नियमानुसार तेथील विद्यार्थ्यांना परिक्षा हॉलमध्ये सॉक्स आणि बूट घालून जाण्यास बंदी घातली आहे. या नवीन नियमांनुसार परिक्षा हॉलमध्ये कालपासून 17 लाखाहूंन अधिक विद्यार्थी चप्पल घालून परीक्षेला आले आहेत. बिहारमध्ये दरवर्षी दहावी आणि बारावीच्या परिक्षेमध्ये मोठ्याप्रमाणात कॉपी करण्याची प्रकरणे समोर येतात. त्यामुळेच यंदा बिहार बोर्डाने हा नवीन नियम अंमलात आणला आहे.

देवरीच्या उपविभागीय कार्यालयावर ट्र्रॅक्टरचालक-मालकांचा विराट मोर्चा

देवरी, दि,22- सरकारने आपले जुलमी परिपत्रक मागे घेऊन ट्रॅक्टर-चालक व मालक यांचेवरील अन्याय दूर करण्याच्या मागणी संदर्भात आज (दि.22) देवरीच्या उपविभागीय कार्यालयावर विराट ट्रॅक्टर मोर्च्याचे आयोजन केले आहे.
या मोर्च्याची सुरवात देवरी येथील पटाच्या दाणीवरून दुपारी दोनच्या सुमाराम करण्यात आली. या मोर्च्याचे नेतृत्व माजी  खासदार नाना पटोले,आ. नामदेव उसेंडी हे करणार आहेत. मोर्च्याच शेकडो ट्रॅक्टर सहभागी झाले आहेत. 

Wednesday, 21 February 2018

सरकारच्या मनमर्जी नियमाच्या विरोधात उद्या देवरी येथे विराट मोर्चा

देवरी 21: बेरार टाइम्स
सरकारच्या मनमर्जी नियमाच्या विरोधात दि. 22 फेब्रु. गुरुवार ला ट्रॅक्टर टिप्पर मालक चालक संघटना देवरी, सालेकसा आणि आमगाव तालुक्याच्या संयुक्त विद्यमाने उप विभागीय कार्यालय देवरी वर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोरचयचे नेतृत्व नाना भाऊ पटोले माजी खासदार, नामदेव उसेंडी माजी आमदार, रामरतनबापू राऊत माजी आमदार, अमर वर्हाडे आणि रमेश ताराम हे करणार आहेत.
मोर्चा निघण्याचा स्थळ देवरी येथील पटाची दान पासून उप विभागीय कार्यालय देवरी पर्यंत असणार आहे. विराट मोरच्याचे प्रमुख मागण्या- महाराष्ट्र शासनाचा 12 जाने. 2018 चा जि आर रद्द करणे, शहरी आणि ग्रामीण भागातील दंडाची वर्गवारी करणे,2017-2018  दुष्काळ घोषित करणे इत्यादी मागण्या मोरच्याचे वैशिष्ट्ये.

बारावीचा पेपर फुटला, प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर

Solapur: 21 बारावीची परीक्षा सुरु झाल्यानंतर जेमतेम तासाभरातच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तांबेवाडीच्या आश्रमशाळेत ही प्रश्नपत्रिका आढळून आली. मात्र प्रश्नपत्रिका कुठून लीक झाली याची अद्याप माहिती नाही.

कंगना करणार 'राजकारण’

Mumbai:21 बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली कंगना राणावतने राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत. कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनेकदा भेटही घेतली आहे. कंगनाच्या समजूतदारपणावर आणि अभिनयाने पंतप्रधान प्रभावित असल्याचेही बोलले जात आहे.  

कोणत्या पक्षाकडून लढणार?

सध्या सुरू असलेल्या चर्चांनुसार कंगना राणावत हिमाचल प्रदेशातून राजकारणात उतरू शकते. कंगना हिमाचल प्रदेशातील मंडी येथील राहणारी आहे. ती याच क्षेत्रातून भाजपच्या तिकीटावर निवडणुकीच्या मैदानात उतरू शकते.

आज १२ वी चा पहिला पेपर आणि रस्ता जाम

देवरी: २१
आज पासुन १२ ची परीक्षा सुरु होत आहे. ग्रामीण भागातील विध्यार्थी बस आणि इतर वाहनांनी देवरी आणि डवकी केंद्रा  वर परिक्षे साठी निघाली असतांना देवरी आमगाँव रोडवर झाड़े कापल्या मुळे  तब्बल २ तासापासुन रोड जाम झालेला आहे. ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना पहिल्या पेपर ची भीती असतांना परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहचता येणार कि नाही याची धाकधुकी लागली आहे.

Tuesday, 20 February 2018

Berartimes_21-27_Feb_2018





आपादग्रस्तांना शासकीय मदतीच्या धनादेशाचे वाटप

गोंदिया,दि.२०- देवरी तालुक्यातील देऊळगाव आणि धमदीटोला येथे नैसर्गिक आपदांमध्ये आपला जीव गमावणाऱ्या महिलेसह  एका बालकाच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतून शासकीय मदतीचे धनादेशाचे नुकतेच वाटप करण्यात आले.
सविस्तर असे की, तालुक्यातील परसोडी (धमदीटोला) येथील साबणमती कुंभरे यांचा गेल्या काही दिवसापूर्वी सर्पदंशाने मृत्यू झाला होता. याशिवाय देऊळगाव येथील नीतेश वालदे या बालकाचा पाण्याच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला होता.
या दोन्ही मृतांच्या कुटुंबीयांना शासकीय निधीच्या धनादेशाचे वाटप स्थानिक आमदार संजय पुराम यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी देवरीचे तहसीलदार विजय बोरूडे, गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, उपसरपंच किशोर संगीडवार, भाजपचे जिल्हा महामंत्री वीरेंद्र अंजनकर, सविता पुराम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मृतांच्या दोन्ही परिवारांनी शासनाचे आभार मानले.

Monday, 19 February 2018

कंत्राटी कर्मचारी हे यापुढे कंत्राटीच राहणार-सरकारचा आदेश

गोंदिया,दि.19(खेमेंद्र कटरे) : कंत्राटी पध्दतीने निर्माण केलेली पदे कायमस्वरुपी समजण्यात येऊ नयेत, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत शासनाने परिपत्रक जाहीर केले आहे़. त्यामुळे गेली अनेक वर्षे कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कायम होण्याच्या आशेवर या सरकारने पाणी फेरले आहे़.आधी काँग्रेस सरकारने नोकरीचे कंत्राटीकरण केले आता भाजप सरकारने तर खासगीकरण करुन पदच रद्द केल्याने भविष्यात सरकारी नोकरी हा विषयच राहिलेला नाही.त्यातही सध्या नोकरीवर जे आहेत,आणि वरच्या पातळीवर संघटनेच्या माध्यमातून आपली पोळी शेकत आहेत.त्यांनाही आपल्या सातव्या वेतन आयोग व वयोमर्यादा वाढीची चिंता दिसून येते.मात्र माझ्या शिक्षित बेराजगार मुलाला नोकरीच नाही हे कधी कळेल अशा प्रश्न या शासन निर्णयामूळे समोर आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून शासकीय सेवेत कर्मचाऱ्यांच्या कायमच्या भरतीला कात्री लावण्यात आली आहे़. त्यामुळे शासनाने कायम होणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा कंत्राटी पध्दतीने कर्मचाऱ्यांची भरती करून कोट्यवधी रुपयांची दरवर्षी बचत केली.तो पैसा खासगीकरणातून आपल्या नेत्यांनी स्थापन केलेल्या कंपन्याना आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून मात्र कंत्राटीकरणाच्या भरतीसाठी दिले हे विसरता कसे येणार आहे. आतापर्यंत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, जलस्वराज्य,प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना,ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता अभियान,आशासेविका,कंत्राटी ग्रामसेवक,कंत्राटी शिक्षक, डाटाएंट्री आॅपरेटर्स तसेच अन्य योजनांसाठी हजारो बेरोजगार युवकांची कंत्राटी कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
एखाद्या कंपनीला कंत्राटी कर्मचारी नियुक्तीचा ठेका देऊन त्यांच्या माध्यमातून शासकीय कामे करुन घेतली जात आहेत़ त्यामुळे डाटाएंट्री आॅपरेटर्सची आजची आर्थिक स्थिती फार बिकट झाली आहे. शासन नियुक्त कंपनीकडून विविध कारणे पुढे करून डाटाएंट्री आॅपरेर्टसंना वर्ष- सहा महिन्यांचे मानधनही दिलेले नाही़ अशी स्थानिक सुशिक्षितांची अवस्था आहे.कंत्राटी पध्दतीने नवीन पदांची निर्मिती करताना शासन निर्णयात नवीन अटी व शर्ती तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एखाद्या पदाची नेमणूक करताना ती भरती पूर्णत: कंत्राटी पध्दतीची असल्याची कल्पना देण्यात येते. नियुक्त केलेल्या पदावरील अधिकारी वा कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी म्हणून यापुढे गणले जाणार नाही.कंत्राटी पध्दतीने करण्यात येणाºया नेमणुका ११ महिन्यांसाठी असतात. आवश्यकता भासल्यास ११ महिन्यानंतर कराराची मुदत वेळोवेळी वाढवण्याची कायद्यात तरतूद आहे. एका कंत्राटी कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त ३ वेळा मुदतवाढ देता येते. त्या पुनश्च नियुक्ती करताना त्याला निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे़
अशा प्रकारे कंत्राटी पध्दतीने भरती करताना संबंधित सर्व शासकीय विभागाना शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तींची पालन करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत़ सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयानंतर शासनाने काढलेल्या परिपत्रकांमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कायम होण्याच्या आशेवर पाणी फेरले आहे़.आतापर्यंत सेवेत कायम करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानचे व अन्य कंत्राटी कर्मचारी आंदोलने करीत होते़.प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील अभियंते व कर्मचार्यांचे आंदोलनही सुरु आहे.परंतु या परिपत्रकांमुळे कितीही आंदोलने केली तरी काहीही निष्पन्न होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे़.
निवड मंडळामार्फत नियुक्ती
कंत्राटी पध्दतीने भरावयाच्या पदांसाठी शासनाकडून निवड मंडळ गठीत करण्यात येणार आहे़. या निवड मंडळामार्फत शासनाच्या प्रचलित धोरणानुसार त्या त्या पदावरील उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे़. त्यामुळे आता कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्तीही निवड मंडळामार्फतच होणार आहे. यापुढे प्रत्येक जिल्ह्यात निवड मंडळ असेल.

शिवाजींची आज्ञापत्रे आजही मार्गदर्शक -डॉ अभिमन्यू काळे

देवरी येथे शिवजयंतीचे आयोजन


देवरी, दि.19- आग्र्यावरून शिवाजी महाराजांची झालेली सुटका हे आजही एक कोडे आहे. अत्यंत विपरित परिस्थितीमध्ये महाराजांनी सुराज्याची स्थापना केली. अगदी कमी वयात महाराजांनी अनेक असाध्य असे यश संपादन केले. महाराजांचे आपल्या रयतेवर जीवापाड प्रेम होते. आपली रयत कशी सुखी व समाधानी असेल, याचा त्यांना कायम ध्यास होता.महाराजांनी राज्य चालविण्यासाठी आदर्श अशी आज्ञापत्रे तयार केली होती. ती आज्ञापत्रे जनतेला सुखी ठेवण्यासाठी राज्यकर्त्यांना उत्तम मार्गदर्शक ठरू शकतात, असे प्रतिपादन गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे यांनी आज (दि.19) देवरी येथे केले.
ते देवरी येथे शिवाजी संकुलात आयोजित शिवजयंतीच्या एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदास आंबटकर,आमदार संजय पुराम, माजी आमदार हेमंत पटले, भाजपचे जिल्हा महामंत्री वीरेंद्र अंजनकर, जि.प. उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, नगराध्यक्ष सुमन बिसेन, सुनंदा बहेकार, प्रमोद संगीडवार, प्रमुख मार्गदर्शक प्रा. सुमंत टेकाडे,देवरीचे तहसीलदार विजय बोरूडे,  मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे,  आदिवासी डेव्हलपमेंट इनिशिएटिवचे अध्यक्ष जयंत कोटे आदी मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी मुख्याधिकारी चिखलखुंदे, सविता पुराम, जयंत कोटे यांचेसह पाणी फाउंडेशन आणि नवयुवक किसान गणेशोत्सव मंडळाचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्री येरणे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी सरकारवर हल्ला चढवित शैक्षणिक शुल्क वेळेवर न देऊन शासन शैक्षणिक संस्थाचे कंबरडे मोडत असल्याचा आरोप केला.
कार्यक्रमाचे संचालन सहायक शिक्षक एस.टी. मेश्राम यांनी केले.


शिवज्योत आणणार्‍या ट्रकला अपघात; 5 विद्यार्थी ठार

कोल्हापूर,दि.19(विशेष प्रतिनिधी) : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू  झाला आहे. मृत्यू झालेल्यामध्ये सर्वजण महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे वृत्त समोर आले आहे. नागाव गावाजवळ ही दुर्देवी घटना घडली.  या अपघातात 25 विद्यार्थी गंभीर जखमी आहेत.
माध्यमांच्या वृत्तानुसार,  आज पहाटेच्या साडे चार वाजता सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्व विद्यार्थी सांगलीतल्या वालचंद महाविद्यालयातील असून त्यांची ओळख पटविण्यात येत आहे.   शिवजयंती निमित्त हे विद्यार्थी पन्हाळ्याहून सांगलीला शिवज्योत घेऊन जात होते. त्यासाठी त्यांनी ट्रक केला होता. ट्रकमध्ये सुमारे 30 विद्यार्थी होते. सांगलीला जात असताना समोरून आलेल्या बाइकला चुकविताना हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की पुलावरच ट्रक कलंडला. त्यामुळे ट्रकखाली दबल्या गेल्याने पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्याचं कळताच आजूबाजूच्या गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. या जखमींवर उपचार सुरू असून त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतं.

सत्तारुढ सरकार ओबीसीविरोधी-ईश्वर बाळबुध्दे

गोंदिया दि.१८ :  राज्यातील सत्तारुढ सरकार ओबीसींच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. अन्यायकारक अटी लागू करुन ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात आहे. ज्या ओबीसी समाजाच्या मतांवर हे सरकार निवडून आले त्याच ओबीसींचा आता सरकारला विसर पडला असून सत्तारुढ सरकार ओबीसी विरोधी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलेचे प्रदेश अध्यक्ष ईश्वर बाळबुध्दे यांनी केला.
तसेच यासर्व समस्यांना घेवून मोठे आंदोलन उभारणार असल्याचे असल्याचे शनिवारी (दि.१७) येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकार परिषदेला माजी आमदार दिलीप बन्सोड, रॉका जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर दोनोडे, प्रदेश महासचिव उमेंद्र भेलावे, दुर्गा तिराले, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष केतन तुरकर, युवक तालुका अध्यक्ष जितेश टेंभरे, अशोक शहारे, कुंदन कटारे उपस्थित होते.
बाळबुद्धे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेलच्या वतीने राज्यस्तरीय जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. १९ डिसेंबर ते १४ एप्रिलपर्यंत हे अभियान चालेल. १४ एप्रिल रोजी बारामती येथे जनजागृती अभियानाचा समारोप होईल.यानंतर ओबीसींच्या समस्यांना घेवून मोठे आंदोलन करण्यात येईल. सतारुढ सरकार ओबीसी विरोधी आहे. सरकार ओबीसींच्या मतांवर निवडून आले. मात्र सत्तेवर येताच सरकारला ओबीसींचा विसर पडला असल्याचा आरोप बाळबुध्दे यांनी केला.ओबीसींची शिष्यवृत्ती ५०० कोटींवरून केवळ ५४ कोटींवर आणल्याचा जाब सरकारला विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.ओबीसी जनजागृती अभियानाच्या निमित्ताने गोंदियात आल्यावर त्यांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेवून विविध मागण्याचे निवेदन दिले.निवेदनातून ओबीसी आयोगावर ओबीसी समाजाचा अध्यक्ष असावा, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह तयार करण्यात यावे, ओबीसींसाठी वेगळ्या निधीची तरतूद करण्यात यावी. क्रिमिलेयरचा नियम रद्द करावा,स्वामीनाथन समितीच्या शिफारसी लागू करण्यात याव्या आदी मागण्यांच समावेश होता.

Sunday, 18 February 2018

देवरी नजीक अज्ञात वाहनाची दोन दुचाकींना धडकः एक मृत, चार गंभीर

देवरी,दि.18- देवरीपासून दोन किलोमीटर अंतरावरील भागीच्या शिवारात आज (दि.18) सायंकाळी सातच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने दोन दुचाकींना जबर धडक दिली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
मृत महिलेचे नाव भागरता मनीराम बागडे (वय55) राहणार मुरदोली असे आहे. तर जितेंद्र मनीराम बागडे (वय36),शीतल राजेंद्र बागडे (वय7) दोन्ही राहणार मुरदोली ,सुकलाल पैकाजी राऊत (वय60) आणि नागेश्वर प्रधान (वय 50) दोन्ही राहणार कोटरा, तालुका सालेकसा अशी जखमींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार,  एमएच 35-जे 7566 आणि एमएच -35 यू 7598 क्रमांकांच्या दोन्ह मोटार सायकल या देवरी वरून आमगावच्या दिशेने जात असताना आमगाव कडून भरधाव वेगाने येणाऱ्या एका अनियंत्रित अज्ञात वाहनाने  या दुचाकींची जबर धडत दिली. या मध्ये मुरदोलीच्या बागडे परिवारातील भागरता नावाच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडताल घटनास्थळावर नागरिक मदतीसाठी धावून आले आणि त्यांनी मिळेल त्या साधनाने जखमींना देवरीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. जखमींपैकी दोघांची स्थिती नाजूक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोंदिया येथे पाठविण्यात आल्याची माहिती आहे. या अपघाताची नोंद देवरी पोलिसांनी घेतली असून पुढील तपास ठाणेदार राजेश तटकरे यांचे मार्गदर्शनात सुरू आहे. दरम्यान, त्या अज्ञात वाहनाविषयी घटनास्थळावर उलटसुलट चर्चा होती. या अपघातामुळे सध्या नव्याने तयार करण्यात येणाऱ्या महामार्गावर रस्ता दुभाजकाची मागणी पुन्हा एकदा समोर आली आहे. लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

Saturday, 17 February 2018

सत्यपाल महाराजांची फटकेबाजी

संत चोखोबा नगरी, दि.१७ः  येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात आयोजित ७ व्या अखिल भारतीय संत साहित्य समेलनाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र  फडणवीस यांच्या हस्ते प्रबोधनकार किर्तनकार सत्यपाल महाराज यांना शासनाचा पहिला संत चोखोबा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना सत्यपाल महाराजांनी आपल्या खुमासदार शैलीत प्रेक्षकांना रिझवून ठेवत चांगलीच फटकेबाजी केली.
हा पुरस्कार स्विकारण्याअगोदर माझ्या गावातसुद्धा मला एक रूपयाही मिळत नव्हता. मात्र, देवेंद्राच्या कृपेमुेळे पहिल्यांदा ५१ हजार रूपयाचा पुरूस्कार जाहीर झाला.
आधी नरेंद्र खाली देवेंद्र, शेवटी  दरिद्र शेतकरी,अशी आपल्या विनोदी शैलीत बोचरी टीका करीत सरकार आणि शेतकऱ्यांमधील चित्राचे संक्षिप्त विवेचन केले.
आपल्या आमदारांची नावेच विचित्र असून जसे फुक मारणारे फुके. यांनी  फुक मारली अन् आमदार झाले. सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी कधी मच्छर नाही मारले, ते वाघ कसे मारणार, अशी उपहासात्मक टीका केली. एक आमदार तर माझ्या वाढदिवसालाच किर्तनालाच या, असे पुराम म्हणाले राम नाही. त्यातच तिरोड्याचे रहागंडाले हे काय आडनाव असा मिश्कील पणा करीत हास्य पिकविले.
 माझ्या मायची डिलेव्हरी पाच मिनिटात होवून सत्यपाल नावाचा असा जबरदस्त हॅण्डसेट बाहेर आला. माझ्या पांडुरंगांनी १८ जातीच्या लोकांना ऐकत्र आणले. मात्र, तुम्ही आम्हाले  हलकट समजले तर तुमची ब्लुफिल्म बनवू. माझ्या बायकोचे देहदान केले, वडीलाचे नेत्रदान केले. आता ज्या जिल्ह्यात मी मरेन त्याच जिल्ह्याच्या मेडीकल कॉलेजला मी देहदान करणार. बायानो बांगड्या फोडू नका, सातबारा जाळून दाखवा. मात्र, देशात सर्वत्र, बांगड्या फोडून कपडे जाळतात.  सामाजिक न्यायमंत्र्यावर मुख्यमंत्र्याचे आय लव्ह आहे. म्हणून ते आले. असे आपल्या विनोदी शैलीत सांगून चौफेर फटकेबाजी करून संत चोखोबा नगरीत हास्याचे फवारे उडविले.

खुर्शीपार,मानेगावच्या जंगलात तीन हरीणांची शिकार




गोंदिया,दि.१६- आमगाव वनपरिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या मानेगाव क्षेत्रातील खुर्शीपार जंगलात तीन हरणाची शिकार अज्ञात शिकाऱ्यांनी केल्याची घटना आज १६ पेâब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या  सुमारास उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
सविस्तर असे की, मानेगाव दहेगाव हे जंगलव्याप्त क्षेत्र असून आज दुपारी एक शेतकरी जंगलाच्या मार्गाने शेतात जात असताना त्याला तीन हरीण मृतावस्थेत आढळून आले. दरम्यान त्यांनी ही माहिती वनविभागाचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देताच वनविभागाचे अधिकारी आपल्या ताफ्यासह खुशीपार भागातील  जंगलात पोहचले असता, त्यांना तीन हरीण मृतावस्थेत असल्याचे दिसून आले. त्यापैकी दोघांचे शिंग कापलेले होते. हरणांची स्थिती पाहता, विजेच्या प्रवाहाने त्यांचा मृत्यू झाला नसावा. विषबाधेमुळे असू शकते असा अंदाज वनपरिक्षेत्राधिकारी प्रदिप चन्ने यांनी वर्तविला असून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र,तीन हरीणांपैकी दोन हरिणांचे शिंग गायब असल्याने कदाचित जादूटोण्यासाठी या हरीणांची शिकार करण्यात आल्याची चर्चा तालुक्यात आहे.


शेतकर्यांची नव्हे तर श्रीमंताची सरकार- मनोहर चंद्रिकापुरे

अर्जुनी मोरगाव,दि.17(संतोष रोकडे)ः- अर्जुनी मोरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने शेतकरी,शेतमजूराच्या मागण्यांना घेऊन तालुक्यातील तिरखुरी येथून बिरसामुंडा मंदिरातून शेतकरी दिंडीला सुरवात करण्यात आली आहे.
सदर दिंडी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी व किसान सभा अध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आली आहे.चंद्रिकापूरे यांनी ही शेतकरी दिंडी शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य न्याय देण्यासाठी काढण्यात आल्याचे सांगत सध्याचे सरकार हे शेतकर्यांचे सरकार नसून श्रीमतांचे सरकार असल्याची टिका केली. या शेतकरी दिंडीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे,तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे योगेश नाकाडे युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्जुनी मोरगाव, गोर्वधन ताराम,अमन पालीवाल, अनिल गावळे ग्रा.प.सदस्य, प्रिया जांभुळकर सरपंच, विजय कुंभरे,हिरासींग मडावी,मधुकर नरेटी,रमेश सलामे चंद्रशहा मडावी, रमेश कोल्हे,बालु ताराम,किशोर राउत, श्यामराव धुर्वे,देवीदास कोरेटी, परिसरातील सरपंच,उपसरपंच व ग्रा.प. सदस्य सहभागी झाले होते.
चंद्रिकापुरे यांनी शेतकरांची मोठ्या प्रमाणात शेतकर्यांची लुबाडणूक केली जात असुन जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला नसल्याचे सांगत सर्व कर्ज सरसकट माफ करण्याची मागणी केली. सातबारा कोरा करा शेतकरांना उत्पादन खर्चाच्या दिड भाव देणे.500 रुपये प्रती क्विंटलप्रमाने बोनस जाहीर करण्याची मागणी केली.दिंड़ीने शुक्रवारला केशोरी जि.प.क्षेत्रातील तिरखुरी,भरनोली,बनीटोला,बोरटोला,शिवराम टोला,कन्हाळगाव,राजोली, खडकी,खडकीटोला,सायगाव,तुकुम,नविन टोला,जांभळी, गावात भ्रमण केले.

राज्यातील पहिला राईसपार्क गोंदिया जिल्ह्यात- मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

गोंदिया,दि.17- देशातील धानाच्या विविध जातींच्या वाणावर सखोल संशोधन करून बदलत्या नैसर्गिक वातारणात टिकाव धरून मानवासाठी आवश्यक मुलभूत अन्नतत्वे मोठ्याप्रमाणात उत्पादित करणाऱ्या नवीन वाणांचा विकास करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात राज्यातील पहिला राईस पार्क सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारला केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता परिषद आणि वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आयोजित ७ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संत परिषदेच्या दुसऱ्या दिवसाच्या संत सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
राईस पार्कच्या माध्यमातून धानाच्या संशोधनाला मोठी प्रेरणा मिळेल. अलिकडेच भंडारा जिल्ह्यात राईस क्लस्टर देण्याचा निर्णय झाला. आता गोंदिया जिल्ह्यात राईस पार्क देण्याचा निर्णय आजच जाहीर करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच गोंदिया जिल्ह्यातील गोदामांचे प्रश्न लवकरच निकाली काढले जातील. धानाला उचित दाम मिळवून देण्यासाठीही शासन कटीबध्द असल्याचे ते म्हणाले. गोंदिया जिल्ह्यात तब्बल एक लाख शेतकरी रोजगार हमीच्या कामावर मजूरी करीत आहेत. या मजूरांनी स्वतःच्या कमाईतून प्रत्येकी एक  रूपया वर्गणी काढून आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना देण्यासाठी एक लाख रूपये माझ्याहाती आताच्या कार्यक्रमात दिले याची माहिती देत ते म्हणाले की, गोंदियासारख्या अतिदूर्गम भागातील शेतकरी अवर्षण, तुडतुडा, अवकाळी पाऊस आणि आता गारपिटीने त्रस्त असला तरीही तो आत्महत्या करीत नाही, कारण त्यांच्यावर संतांचे संस्कार आहेत. गोंदियातील शेतकऱ्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलेला मदतीचा हात हेच संतांचे कार्य आहे.
गोंदिया जिल्ह्यातील वर्ग एकच्या अनेक जमिनी वर्ग दोनच्या दाखवल्यामुळे जमिनीचा मूळ मालक, भुमीस्वामी असूनही त्याला भुमीधारी दाखवल्यामुळे त्याला त्याचा लाभ घेता येत नाही. यासंबंधी शासनाने तात्काळ निर्णय घेतला असून जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधिचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी वर्ग दोनच्या जमिनी तातडीने वर्ग एक मध्ये वर्गिकृत कराव्य तसेच यासाठी शेतकऱ्यांनी कोणताही अर्ज किंवा खर्च करण्याची आवश्यकता नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.संत चोखामेळा यांच्या मंगळवेढा येथील निर्वाण भुमीची अवस्था बिकट झाली असून तातडीने आजूबाजूची शासकिय जमिन वापरून तेथे संत चोखामेळांचे स्मारक उभारले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी गोंदिया जिल्ह्यातील विकासासाठी घेतलेल्या विविध निर्णयासंबंधी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांना विचारले असता ते म्हणाले की, राईस पार्कच्या माध्यमातून धानाच्या विविध जातींवर सखोल संशोधन केले जाईल. बदलत्या ऋतुमानात जोमाने टिकाव धरू शकेल, कोणत्याही नैसर्गिक रोगराई, बदलत्या हवामानाला बळी पडणार नाही आणि मानवी आरोग्याला लाभकारक तसेच भरपूर उत्पादन देऊ शकेल अशा वाणांचे संशोजन, जतन आणि संवर्धन करण्याचे ऐतिहासिक कार्य राईस पार्कच्या माध्यमातून केले जाईल. आजवर देशात केवळ कर्नाटकातच असा राईस पार्क आहे. मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागणीला स्टेजवरच मंजूरी दिल्यामुळे देशात दुसरा आणि राज्यात पहिला राईस पार्क मिळण्याचा बहुमान गोंदिया जिल्ह्याला मिळाला आहे. राईस पार्क ही संकल्पना केवळ संशोधनापुरतीच मर्यादित नाही तर धानापासून विविध पदार्थ, वस्तू निर्माण करून त्याचे मार्केटिंगसुध्दा करण्यात येणार आहे, त्यामुळे गोंदिया जिल्हा खऱ्या अर्थाने राईस सिटी सोबतच आता राईस पार्क सिटी म्हणून जागतिक पातळीवर उदयास येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बांधकाम सभापती कॉंग्रेसच्या गोटात, भाजपला मोठा धक्का

गोंदिया न.प.त सभापतीपदी मंसुरी, साहू, बोबडे, चौधरी व मानकर यांची वर्णी
गोंदिया : गोंदिया नगर परिषदेच्या एक वर्षाच्या कार्यकाळानंतर शुक्रवारी (ता.१६) झालेल्या विषय समिती सभापतीच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा एक, भाजपाचे चार सभापतींची वर्णी लागली आहे. राकॉंचे एक सदस्याने मतदानात सहभाग न घेतल्याने समान मते मिळाल्याने कॉंग्रेसचे शकील मंसुरी बांधकाम व भाजपचे दीपक बोबडे हे पाणीपुरवठा विभागाचे सभापती म्हणून ईश्वर चिठ्ठीने झाले. यात बांधकाम सभापतीपद आश्चर्यकारकरित्या कॉंग्रेसच्या गोटात गेल्याने शहरात मोठी चर्चा आहे.
नगर रचना विभागाच्या सभापतीपदी भाजपाच्या रत्नमाल साहू, शिक्षण सभापतीपदी आशालता चौधरी, महिला व बालकल्याण सभापतीपदी विमला मानकर या निवडून आल्या. एकूण ११ मतांपैकी एक सदस्य अनुपस्थित असल्याने बांधकाम सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपाचे धर्मेश अग्रवाल व कॉंग्रेसचे शकील मंसुरी यांना समान मते मिळाली. तसेच पाणीपुरवठा सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपाचे दीपक बोबडे व कॉंग्रेसचे क्रांती जायस्वाल यांना समान मते मिळाली. त्यामुळे या दोन्ही पदासाठी ईश्वरचिठ्ठीने निवड करण्यात आली. यात बांधकाम सभापतीपदी शकील मंसुरी व पाणीपुरवठा सभापतीपदी दीपक बोबडे यांची वर्णी लागली.
नगर रचना, महिल व बालकल्याण, शिक्षण विभागाच्या सभापतीपदासाठी राकॉंचे दोन सदस्यांनी मतदानात सहभाग न घेतल्याने भाजपाच्या रत्नमाला शाहू, विमला मानकर व आशालता चौधरी पाच मते घेवून विजयी झाल्या. यात बसपच्या जोत्सना मेश्राम, गौशिया शेख, कॉंग्रेसच्या निर्मला मिश्रा पराभूत झाल्या.  यात विशेष म्हणजे, पालिकेत भाजपा विरूद्ध इतर सर्व एकत्रीत येवून कॉंग्रेसचा सभापती झाल्याने, ते ही बांधकाम विभाग मिळाल्याने कॉंग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण होते.
भाजपाला मोठा धक्का
भाजपाची सत्ता केंद्रापासून तर राज्यात आणि नगर परिषदेत नगराध्यक्ष असताना विकासाचे कार्य करण्यासाठी बांधकाम विभाग फार महत्वाचे मानले जाते. दरम्यान पालिकेत पक्षीय बलाबल पाहता ४२ सदस्यांपैकी भाजप १८, कॉंग्रेस ९, राकॉं ७, बसपा ५, शिवसेना २ व अपक्ष १ सदस्य आहेत. यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडणुकीत कॉंग्रेसला अध्यक्षपद गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. यातच आजच्या निवडणुकीत बांधकाम सभापतीपद ईश्वरचिठ्ठीने का असो ना कॉंग्रेसने हिसकावल्याने भाजपाला हा मोठा धक्का असून कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर पहायला मिळाला. यात झालेल्या राजकारणाचा कोणता नफा वा नुकसान कुणाला सोसावे लागेल, हे भविष्यात कळेल.

देवरी येथे शिवाजी जयंती येत्या सोमवारी

शिवाजी संकुलात होणार जयंती सोहळ्याचे आयोजन

देवरी,दि,17- कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन येत्या सोमवारी (दि.19) करण्यात येणार आहे.
या जयंती सोहळ्याचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदास आंबटकर यांचे हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. राजकुमार बडोले हे राहणार आहेत. यावेळी खासदार अशोक नेते, आमदार संजय पुराम, माजी आमदार हेमंत पटले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे,  भाजपचे जिल्हा महामंत्री वीरेंद्र अंजनकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष हमीद अल्ताफ, नगराध्यक्ष सुमन बिसेन, पंचायत समिती सभापती सुनंदा बहेकार, प्रमोद संगीडवार, संस्थेचे अध्यक्ष झामसिंग येरणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.नागपूरचे प्रा. सुमंत टेकाडे हे मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमात आदिवासी डेव्हलपमेंट इनिशिएटिवचे अध्यक्ष जयंत कोटे, देवरीचे मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, सविता पुराम यांचेसह देवरीच्या नवयुवक किसान गणेश मंडळ व चिचगडच्या पाणी फाउंडेशन या सामाजिक संस्था आणि तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
शिवाजी संकुलात याविषयी काल शुक्रवारी (दि.16) आयोजित एका पत्रकार परिषदेत या जयंती सोहळ्यात प्रा. उपदेश लाडे यांनी माहिती दिली. यावेळी प्रा. मनोज भुरे, प्रा. आशिषसिंह , प्रा. गुणवंत काशिवार उपस्थित होते.

Thursday, 15 February 2018

जैन कलार समाजाचे स्नेहसंमेलन थाटात


गोंदिया,दि.15- जैन कलार समाजाच्या गोंदिया जिल्हा कार्याकारिणीच्या वतीने स्थानिक पिंडकेपार रोड स्थित समाज भवनामध्ये आयोजित स्नेह संमेलन थाटात साजरे करण्यात आले. यावेळी महिलामेेळावा सुद्धा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, खासदार निधीतून तयार करण्यात आलेल्या समाजभवनाचे लोकार्पण माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांचे हस्ते काल बुधवारला (दि.14) करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन कलार समाजाचे अध्यक्ष तेजराम मोरघडे हे होते.यावेळी विशेष अतिथी म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून  माजी  विधानपरिषद सदस्य मा.राजेन्द्र जैन, विदर्भ को आॅप.बॅक नागपूरचे अध्यक्ष श्री.रविन्द्र दुरुगकर, भूषण दडवे, आनंदराव ठवरे , जिल्हा परिषद सभापती शैलजा सोनवाने, जिल्हा परिषद सदस्य दुर्गाबाई तिराले,अ. भा. कलार समाज गोंदियाचे अध्यक्ष मुकेश शिवहरे,  प्रकाश रहमतकर, हरिराम भांडारकर, अशोक ईटानकर, काशीनाथ सोनवाने आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात  महिला मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वयोवृद्ध मान्यवरांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला समाजबांधव मोठ्या संख्येने हजर होते

BERARTIMES_14-20_FEB_2018





ADVT SAHITYA SAMMELAN


Wednesday, 14 February 2018

साहित्य संमेलन की राजकीय मेळावा ?



साहित्य संमेलनातून मूळ गाभाच गायब,कविसंमेलन, पुस्तक प्रकाशन व कथाकथन गेले कुठे

३५ लाखाचे मंडप होणार,नागपूरच्या खासगी व्यक्तीला कंत्राट

समेलनांध्यक्षाचे फोटोही पत्रके व पत्रिकेतून गायब

गोंदिया (खेमेंद्र कटरे),दि.१४: साहित्याचा जन्मच कवितेतून झाला आहे. तसेच संत हे प्रामुख्याने काव्य निर्मितीमधूनच उदयास आले. पण अ.भा. मराठी वारकरी संत साहित्य संमेलनात कवीसंमेलन, प्रकाशन, कथाकथनकच नाही. म्हणून आजूबाजुचे साहित्यिक व कवींचा नाराजीचा सूर दिसत असून साहित्य संमेलन की,राजकीय मेळावा? अशा चर्चा आता अवघ्या महाराष्ट्रात रंगू लागल्या आहेत.विशेष म्हणजे ज्या अर्जुनी मोरगाव नगरपंचायतीच्या क्षेत्रात हा कार्यक्रम होत आहे,त्या नगराच्या प्रथम नागरिक असलेल्या नगराध्यक्षांचे नाव आणि ज्या जिल्हा परिषद शाळेच्या पटागंणावर हा कार्यक्रम होत आहे,त्या शाळेच्या शिक्षण समिती अध्यक्ष असलेल्या जिल्हा परिषद सदस्याला सुध्दा साहित्य समेंलनाच्या पत्रिकेत नाव घालतांना डावलण्यात आल्याने या समेलंनाला एकप्रकारे एका विशिष्ट पक्षाचा रंग देण्याचाच प्रयत्न झालेला आहे.
जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव ह्या तालुक्याच्या ठिकाणी होत असलेल्या वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या विद्यमाने हे संमेलन होत आहे. या संमेलनात हभप महाराजांची चांगली परवणी आहे. तसेच नामवंत साहित्यिक व संत साहित्याचे अभ्यासक यांची पत्रिकेवरून नावच गायब करण्यात आले आहेत. मात्र, राजकीय नेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ज्या साहित्यापासून साहित्याची निर्मिती झाली त्याच साहित्यात वावरणारे लोकांची संख्या कमी आहे. कवितेमुळेच साहित्याची निर्मिती झाली. पण या संमेलनात कवींचा साधा उल्लेखसुद्धा या साहित्य संमेलनात करण्यात आला नाही. मुख्य म्हणजे ज्यांची झाडीपट्टीची बहिणाबाई म्हणून ओळख आहे. अशा अंजनाबाई खुणे व संत साहित्यिक डोमाजी कापगते यांचा नाव जाणिवपुर्वक टाळण्यात आले आहे. तर या भागाचे प्रतिनिधीत्व करणारे माजी आमदार/खासदार नाना पटोले यांचे नाव वगळून एक राजकीय द्वेष जगजाहिर करण्यात आले यापेक्षा वाईट काय असू शकते. संमेलनात संत आणि स्वत:ला संत समजणारे लोक जास्त दिसत आहेत. भजनी हे संत होवू शकत नाही. संमेलनाच्या आयोजकांना बहुजन चळवळीतील संताचा प्रामुख्याने विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. साहित्याची खरी भूमिका मांडणारे म्हणजे संत तुकाराम, संत जनाबाई, बहिणाबाई, संत चोखामेळा, गाडगेबाबा महाराज, संत एकनाथ, ज्ञानेश्वर, संत नरहरी सोनार अशा संतांनी समाज जागृतीचे काम केले. संतांनी कविता, भजन किर्तन, पोवाळा, भारुड, डहाका, लावणी, गण, गौळण, अभंग या लोककलेचा प्रकार काव्य निर्मितीकरांनी केला. पण संतांचा या ठिकाणी प्रामुख्याने नामोल्लेख झाल्याचे दिसत नाही. कुठल्याही साहित्य संमेलनात राजकारणी लोकांचे काय काम असावे? असा सवालही सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहेत. सत्ताधारी हे देशाचा, राज्याचा, समाजाचा, गावाचा विकास न करता आता साहित्याच्या मंचावर आपला तोरा दाखविणार आहेत. या साहित्याच्या मंचावर केंद्रापासून मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सहकारी सदस्य, बाजार समिती सदस्य यांना कोणत्या साहित्य प्रकारचा किंवा समाजसुधारकांचा, महापुरुषांचा, संतांचा अभ्यास असतो हे कळतच नाही. तेव्हा हे संत साहित्य संमेलन आहे की, राजकीय मेळावा? अशा चर्चांना साहित्य वर्तुळात रंगत आहेत.

आता सरकारच करू लागले विद्यार्थ्यांमध्ये जातीय भेदाभेद…


 विद्यार्थ्यांना शिक्षणशुल्क, परीक्षा फी, शिष्यवृत्तीचे वाटपात सुसूत्रता नाही


हमीपत्राच्या नावावर विद्यार्थ्यांकडून भरली जात आहे तिजोरी


गोंदिया,दि.१४- विद्यार्थ्यांची शिक्षण घेताना मानसिक स्थिती बिघडविण्याचे धोरण राज्य सरकार राबवीत असल्याची शंका आता पालक व्यक्त करू लागले आहेत. विद्याथ्र्यांना देण्यात येणारे शिक्षणशुल्क, शिष्यवृत्ती आणि इतर अनुदान वाटपात वेळोवेळी निर्णय बदलविणे, विद्यार्थ्यांकडून हमीपत्राच्या नावावर शासकीय तिजोरी भरणे आणि ऑनलाइन-ऑफलाइनच्या आड अनुदानांची परिपूर्ती करण्याविषयी वेळकाढू धोरण अवलंबून विद्यार्थी आणि शिक्षण संस्थांची डोकेदुखी वाढविण्याचे काम सरकारकडून होत असल्याची टीका सबंध राज्यात होत आहे. दरम्यान, शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क आदी बाबतीत सुद्धा सरकार अनुसूचित जाती आणि ओबीसींच्या विद्यार्थ्यांमध्ये भेदाभेद करीत असल्याचे दिसून येत आहे. हा सरकारी जातिवाद कधीतरी थांबणार का? असा सवाल राज्यातील नागरिकांनी फडणवीस सरकारला केला आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिष्यवृत्ती, परीक्षाशुल्क आणि शिक्षणशुल्काच्या थकबाकीची पूर्ण परिपूर्ती देण्याविषयी सरकारने निर्णय घेतला आहे. मात्र. ओबीसी विद्यार्थ्यांबाबतीत सरकारने दुजाभाव केल्याचे चित्र आहे. अनुसूचित जातीच्या विद्याथ्र्यांना १०० टक्के तर ओबीसी विद्यार्थ्यांना थकबाकीच्या १०० टक्के पैकी फक्त ५० टक्के अनुदान देण्याचे सरकारने ठरविले आहे. यात ही मिळणाèया ५० टक्के रकमेच्या ६० टक्केच अनुदान अदा करण्यात येणार असल्याने प्रत्यक्षात अनुसूचित जातीला १०० टक्के तर ओबीसींना ३० टक्के शैक्षणिक अनुदान मिळणार आहे. यामुळे हा सरकारी जातिवाद जनतेच्या माथी मारल्या जात असल्याचा घणाघाती आरोप सर्वच स्तरातून होत असल्याचे चित्र आहे.
शासनाने सुरू केलेले महाडीबीटी ऑनलाईन पोर्टल कुचकामी ठरतल्यानंतर विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती साठी १०० रुपयांच्या मुद्रांकावर हमीपत्र लिहून घेण्यात येत आहेत. त्यामुडे विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत अाहे. हमीपत्र लिहून देण्याकरिता ओबीसी विद्यार्थी गुन्हेगार आहे काय, असा प्रश्न राष्ट्रीय  ओबीसी महासंघाचे सहसचिव व ओबीसी संघर्ष कृती समितीचे मार्गदर्शक खेमेंद्र कटरे यांनी केला आहे. सामाजिक विभागाला एक आणि ओबीसी मंत्रालयाला वेगळा न्याय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
राज्यातील विद्याथ्र्यांना केंद्रसरकार आणि राज्यसरकारच्या वतीने १०० टक्के शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. याशिवाय मोफत शिक्षण, शिक्षण शुल्काची परिपूर्ती, परीक्षा शुल्क आदी अनुदान विद्याथ्र्यांच्या नावाने शिक्षण संस्थांना दिल्या जाते. या शिक्षणशुल्क वाटपाच्या धोरणामध्ये सरकारने आता बदल केले असून सदर अनुदाने ही सरळ शिक्षण संस्थांना न देता थेट अनुदान वाटपाच्या माध्यमातून विद्याथ्र्यांच्या आधारलिंक बँक खात्यात वळते करण्याचे धोरण सरकारने अवलंबिले आहे. मात्र, याविषयीची यंत्रणा अद्यापही पूर्णपणे अपडेट करण्यात सरकारला यश आले नाही. परिणामी, शिष्यवृत्ती, परीक्षा शुल्क आणि शिक्षणशुल्क हे अद्यापही शिक्षण संस्थांना मिळाले नाही. यामुळे या संस्थांची आर्थिक परिस्थिती ढासळल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला आहे.
डीबीटीएल योजनेअंतर्गत अनुदान वाटपाची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झाली नसल्याने सरकारने ती आता ऑफलाइन पद्धतीने देण्याचे ठरविले आहे. यासाठी सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने विद्यार्थी आणि महाविद्यालय यांचेकडून क्षतिपूर्ती बॉण्ड १०० रुपयांच्या स्टँपपेपरवर घेण्याचे आदेश काढले होते. यामाध्यमातून सरकारने विद्याथ्र्यांवर कोट्यवधींचा भुर्दंड लादल्याने सर्वच स्तरातून टीका होऊ लागली आहे. त्यामुळे आता सदरचे हमीपत्र न घेण्याचे सरकारी फर्मान जारी करण्यात आले असल्याची माहिती आहे. मात्र, हा निर्णय जाहीर होण्यापूर्वी धास्तावलेल्या विद्याथ्र्यांनी स्टँपपेपर घेऊन त्यावर हमीपत्र तयार करून महाविद्यालयाकडे सादर केले. यामुळे सरकारचा महसूल गोळा करण्याचा मनसूबा यशस्वी झाल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांना माहिती ऑनलाइन करणे, वेळोवेळी मुद्रांक खरेदी करणे यामुळे आर्थिक आणि मानसिक त्रास झाल्याने त्यांचा अभ्यास प्रभावित झाला.
हा सर्व खटाटोप करून सुद्धा सरकारने राजकीय नेत्यांकडून चालविण्यात येत असलेल्या शैक्षणिक संस्थांच्या आर्थिक संरक्षणाची काळजी यशस्वीरीत्या घेतल्याचे दिसून येत आहे. ज्याअर्थी, सरकार विद्याथ्र्यांना थेट अनुदान वाटप योजनेच्या माध्यमातून शैक्षणिक अनुदानाचे वाटप करीत असेल, असे शुल्क वसूल करण्याचे संबंधित महाविद्यालयाचे काम असताना सरकारने तिथे नाक खुपसून कायदेशीर पेच निर्माण करण्याची आवश्यकता नसल्याचे मत सुद्धा जाणकार मंडळींकडून व्यक्त केले जात आहे. महाविद्यालयांना शुल्क भरणे व ते संबंधित विद्यार्थ्यांकडून वसूल करणे ही जबाबदारी संबंधितांची आहे. यामध्ये सरकारने तसे हमीपत्र करवून घेणे वा संबंधित विद्यार्थी व पालकांवर गुन्हे दाखल करण्याची भीती दाखविणे, हे नागरिकांना कायम दहशतीत ठेवण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. कारण ज्या बँकेत सदर अनुदाने वर्ग करण्यात येणार आहेत, अशा बँका विद्यार्थ्यांच्या खात्यातून परस्पर अनेक दंडाची आकारणी करीत असल्याने विद्यार्थी अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...