Tuesday 13 February 2018

पहिल्यांदा चोखोबा पुरस्कार सतपाल महारांजाना-ना.बडोले

गोंदिया,दि.१३ः- घरातील सोहळा म्हटले की, कत्र्या पुरूषाला कमालीची धावपळ करावी लागते. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनाही तोच अनुभव येत आहे.बडोले यांनी पुढाकार घेऊन आपल्या अर्जुनी मोरगाव या विधानसभा मतदारसंघात येत्या १५ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत हजाराच्या वर संत साहित्य प्रेमी संमेलनाला हजेरी लावतील असा अंदाज आहे. त्यामुळे साहित्य संमेलन निटनेटके पार पडावे यासाठी स्वतः बडोले यांनी नियोजनात लक्ष घातले आहे.या समेलनांत पहिल्यांचा संत चोखोबा पुरस्कार व्यसनमुक्तीसह जनजागृतीपर कार्यात योगदानाबद्दल सप्तखंजेरीवादक सतपाल महाराजांना पहिल्यांदा दिला जाणार आहे.हा पुरस्कार मुख्यमंत्र्याच्या हस्ते वितरीतहोणार असून झाडीपट्टीतील साहित्यीकांसह गुरुदेव सेवा मंडळाच्या खंद्या कार्यकत्र्यांना राजकीय विचारधारा बाजूला सारून पुरस्कृत करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे नियोजन राजकुमार बडोले यांनी सुरु केले आहे.
पूर्व विदर्भात पहिल्यांदाच संत साहित्य संमेलन भरत आहे. या संमेलनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निवारण, सामाजिक समता, स्वच्छता, व्यवसनमुक्ती असे संदेश तळागाळातील लोकांपर्यंत देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे ना.बडोले यांनी सांगितले.संत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा महाराज यांच्या वास्तव्याने पुणीत झालेल्या विदर्भात दुसèयांदा साहित्य संमेलन होत असल्याने वारकरी सांप्रदायातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.आमच्या परिसरातील गावागावांमध्ये गुरूदेव सेवा मंडळे आहेत. या मंडळांमार्फत संमेलनामध्ये भजने सादर केली जाणार आहेत.झाडीपट्टी रंगभूमी आमच्या परिसरात लोकप्रिय आहे. त्याचेही प्रयोग या संमेलनादरम्यान सादर केले जाणार आहेत. शिवाय या विषयावर परिसंवादही ठेवण्यात आला आहे.
संत साहित्यातील स्त्री संतांची भूमिका, विदर्भातील संतांची सामाजिक जागृती, महाराष्ट्रातील संत परंपरा, संत साहित्याची सामाजिक फलश्रृती इत्यादी विषयांवर परिसंवाद होणार आहेत. शिवाय किर्तन, भारूड, भजन आदी कला प्रकारही सादर होतील. संत साहित्याचे विविध ग्रंथ विक्रीसाठी यावेळी उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही बडोले यांनी सांगितले.या साहित्य संमेलनासाठी संत साहित्य प्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन बडोले यांनी स्वागताध्यक्ष या नात्याने केले आहे.या संमेलनासाठी संत साहित्यातील मान्यवरांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांची उपस्थिती लाभणार आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...