Wednesday 7 February 2018

पाच लाखांच्या चोरीचा २४ तासांत तपास

गोंदिया,दि.07 : रायपूर ते इंटरसिटी एक्सप्रेस या गाडीने प्रवास करणाºया एका महिला प्रवाशाचे ४ लाख ७१ हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी पळवून नेले. ही घटना रविवारी (दि.४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. गोंदिया रेल्वे पोलिसांनी २४ तासांत हलवून या घटनेचा तपास लावला आहे.
रायपूरच्या आम बगिच्या जवळील सुंदरनगर येथील रहिवासी ३० वर्षीय महिला इंटरसिटी एक्स्प्रेसने रायपूरवरून नागपूरला जात होती. आरोपी प्रदीप कुमार हा सुद्धा याच गाडीने सदर महिलेसह प्रवास करीत गोंदियाला आला. मेगा ब्लॉकमुळे सदर गाडीचा थांबा गोंदियापर्यंतच होता. त्यामुळे सदर महिला आपल्या पुढील प्रवासासाठी गोंदियात रेल्वेस्थानकावर उतरली. दरम्यान आरोपीने महिलेसह ओळख केली व नागपूरला जाण्यासाठी तोसुद्धा उतरला. ४ फेब्रुवारीला गाडी क्रमांक (१८२३९) शिवनाथ एक्सप्रेस पहाटे ३ वाजता प्लॅटफॉर्म-३ वर पोहचली.सदर महिला गाडीत चढत असताना आरोपीने तिला विश्वासात घेवून तिची बॅग लंपास केली. त्या बॅगमध्ये दोन जोडी सोन्याच्या बांगड्या (किंमत १५ हजार रूपये), एक ब्रासलेट (३० हजार रूपये), ११ ग्राम वजनाच्या दोन सोन्याची चैन व ५ ग्रॅमचा लॉकेट (५५ हजार रूपये), सहा ग्रॅमच्या तीन सोन्याच्या अंगठ्या (२४ हजार रूपये), तीन जोडी चांदीच्या चाळ (१ लाख ५० हजार रूपये), सहा जोडी पातय चेन (६ हजार रूपये), नगदी २० हजार रूपये, चार मोबाईल, एसबीआय एटीएम कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, पोस्ट आॅफिसच्या एफडीचे कागदपत्रे अशा एकूण चार लाख ७१ हजार रूपयांच्या ऐवजाचा समावेश होता. या घटनेची तक्रार सदर महिलेने गोंदिया रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला होता. घटनेचा तपास सुरू केला.
चौकशीदरम्यान महिलेने केलेल्या आरोपीच्या वर्णनानुसार गोंदियाचे रेल्वे सुरक्षा दल, शासकीय रेल्वे पोलीस व टास्क टीमद्वारे सीसीटीव्ही फुटेजचे अवलोकन करण्यात आले. त्यानंतर आरोपीची ओळख पटविण्यात आली. तसेच सदर फुटेज आरोपीला अटक करण्यासाठी सोशल मिडियाच्या माध्यमाने पुढील स्थानकांना पाठविण्यात आले.
सदर महिलेच्या चोरी गेलेल्या मोबाईल क्रमांकांची तपासणी करून ट्रेसिंग करण्यात आले. त्या आधारावर आरोपी नंदूरबार येथे असल्याचे समजले. याची त्वरित माहिती व आरोपीचे फुटेज रेल्वे पोलीस नंदूरबार यांना देण्यात आली. नंदूरबार पोलिसांनी फुटेजच्या आधारावर आरोपीला अटक करुन गोंदिया पोलिसांना माहिती दिली. यावर आरोपीला अटक व चौकशी कारवाईसाठी टास्क टीम रेल्वे सुरक्षा दल गोंदिया व रेल्वे पोलीस गोंदिया यांची संयुक्त चमू नंदूरबारसाठी रवाना झाली. या प्रकरणाचा तपास गोंदिया रेल्वेचे सहायक पोलीस निरीक्षक नालट करीत आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...