Thursday 8 February 2018

मालमत्ता करात लागणार एक टक्का वृक्ष कर

नागपूर :08

मालमत्ताधारकांना यंदा एका नव्या कराला सामोरे जावे लागणार आहे. यंदापासून मालमत्ता करात एक टक्के वृक्ष कर जोडण्यात येणार आहे. नागपूरकरांना नव्या डिमांडमध्ये हा नवा कर लागून येणार आहे. उद्यान विभागाने हा नवा कर लावण्याचा प्रस्ताव ठेवला होता. महासभेने या नव्या करास मंजुरी प्रदान केली आहे. गेल्या वषीं स्थायी समितीपुढे हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. आता वित्त विभागाने नव्या आर्थिक वर्षापासून हा कर मालमत्ता करात लागू करण्यासाठी स्थायी समितीपुढे प्रस्तावित केले आहे. याशिवाय कुठल्याही करात बदल करण्यात आला नाही. सर्व उपकरांना कायम ठेवण्यात आले आहे. 

करातील शिक्षण कर, रोजगार हमी कर, मोठ्या इमारतींसाठी लावण्यात येणाऱ्या करातही कुठलीच वाढ करण्यात आली नाही. स्थायी समितीने यास मंजुरी प्रदान केल्यानंतर नव्या डिमांडमध्ये हा कर लागू होऊन येईल. सध्या शहरात नव्या मालमत्ता करामुळे तसेच सायबरटेक या कंपनीच्या कार्यप्रणालीवरून वाद सुरू आहे. मालमत्ता कराच्या वाढीव देयकामुळे नागपूरकर आधीच त्रस्त आहेत. त्यातच सत्तापक्षाने नव्या मालमत्ता करात दुप्पटीपेक्षा जास्त कर भरावा लागणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यानंतरही सायबरटेक कंपनीतफें करण्यात येणाऱ्या गडबडीचे कुठलेच समाधान करण्यात आले नाही. सायबरटेककडून सर्वेक्षणाचे काम बंद आहे. यात कर विभागाने एमएमसी कायद्यान्वये पुढील आर्थिक वर्षात संपत्ती कराचे दर निश्चित करण्याचे प्रस्तावित केले होते. यासाठी स्थायी समितीला २० फेब्रुवारीपर्यंत निर्णय घ्यायचा आहे. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...