Wednesday 7 February 2018

माल्याच्या कर्जाची आकडेवारी खुद्द सरकारलाच माहीत नाही


The government does not know the loan given to Vijay Mallya | विजय माल्याला दिलेल्या कर्जाची माहिती सरकारलाच नाही

नवी दिल्ली,दि.7 - बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बूडवून परागंदा झालेल्या विजय माल्याकडे किती कर्ज आहे, याची माहिती खुद्द सरकारला  नसल्याचा गभीर खुलासा समोर आला आहे. माहिती आधिकार (आरटीआय)मध्ये वित्त मंत्रालयाला माल्याला दिल्या गेलेल्या कर्जाची माहिती विचारली होती. त्यामध्ये त्यांनी असे स्पष्ट केलं की, विजय माल्याला कीती कर्ज दिली याची माहिती आपल्याजवळ उपलब्ध नाही. राजीव कुमार खरे यांनी आरटीआय आवेदनामार्फत वित्त मंत्रालयाकडून विजय माल्याला देण्यात आलेल्या एकूण खर्चाची माहिती मागितली होती.  
केंद्रीय सुचना आयोगाला (सीआईसी) वित्त मंत्रालयानं सांगितले की, विजय माल्याला किती कर्ज दिले याचा रेकॉर्ड आमच्या जवळ नाही. याबाबतची माहिती संबधित बँकांना अन्यथा आरबीआयजवळ असेल असेही मंत्रालयानं सांगितले. वित्त मंत्रालयाच्या या उत्तराला सीआईसीने संशयास्पद असल्याचे म्हटले. मुख्य सुचना आयुक्त आर.के माधुर यांनी वित्त मंत्रालयालातील आधिकाऱ्यांना आरटीआय आवेदन संबंधित सरकारी कार्यालयाकडे पाठवण्याचे आदेश दिले. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...