भंडारा दि.१३ःजेएसव्ही डेव्हलपर्स व जयविनायक नावाची कंपनी सुरू करून गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा मुख्य सूत्रधार जगमोहनसिंह कठैत याला छत्तीसगढ राज्यातील डोंगरगढ येथून नियोजित पध्दतीने अटक करण्यात आली. जगमोहनसिंग कठैत याने जेएसव्ही डेव्हलपर्स नावाची कंपनी स्थापन करून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यातील लोकांना दामदुप्पट करून देण्याचे प्रलोभन देऊन गेल्या दोन वर्षापासून पोलिसांना व कार्यकर्त्यांना मुर्ख बनवत होता.
छत्तीसगढ राज्यातील डोंगरगढ येथे जगमोहनसिंह कठैत, अमित चौधरी हे नवीन कंपनी सुरू करून लोकांना प्रलोभन देऊन आर्थिक फसवणूक करणार आहेत, यासाठी त्यांनी सभेचे आयोजन केले आहे, याबाबतची माहिती तिरोडा व गोंदिया येथील गुंतवणुकदारांनी भंडारा येथील सामाजिक कार्यकर्ता विष्णू लोणारे यांना दिली.
त्यानंतर लोणारे यांनी अपर पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांना घटनेची माहिती दिली. नांदेडकर यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी राजेंद्र नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली टिम तयार केली.त्यानुसार सापळा रचून सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश काळे, एस. आय. टिचकुले, माहुर्ले, अशोक लुलेकर, सुधीर शिवणकर आदींनी विष्णूदास लोणारे, कन्हेया नागपूर यांना सोबत घेऊन डोंगरगढ येथे गेले. तिथे नियोजनबद्ध जगमोहनसिंग कठैत याला अटक करण्यात आली.
Wednesday, 14 February 2018
जेएसव्ही डेव्हलपर्स कंपनीच्या मुख्यसूत्रधारास अटक
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment