Monday 12 February 2018

बेरार टाइम्स ब्रेकिंग न्यूज़ १२/०२/२०१८

● दुबई - यूएईच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबूधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचे भूमिपूजन केले

● ओमन - अवघ्या 90 पैशांत लोकांना सरकार विमा देते, या पैशात तर चहा पण येत नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी

● नवी दिल्ली - नोटाबंदीला 15 महिने होऊनही जुन्या नोटा मोजण्याचे काम सुरुच, माहिती अधिकार अर्जाला रिझर्व बँकेचे उत्तर 

● श्रीनगर - 30 तासानंतर जम्मूतील सुंजवाँ कॅम्पमधील ऑपरेशन संपले, चार दहशतवाद्यांचा खात्मा, तर पाच जवान शहीद

● नवी दिल्ली - जगातील पहिल्या 15 श्रीमंत शहरांमध्ये भारताची आर्थिक राजधानी 'मुंबई'चा समावेश, मुंबईला 12 वे स्थान

● मुंबई - अवकाळी पाऊस व गारपिटीने मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात रबी पिकांसह फळबागांचे नुकसान, सात जणांचाही बळी

● नागपूर - महापालिकेच्या सेवेतून बडतर्फ केलेल्या चार कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला

● मुंबई - स्वबळाची भाषा करणाऱ्या सेनेला गोंजरण्याचे भाजपचे प्रयत्न, शिवसेनेला 140 जागांचा प्रस्ताव

● चेन्नई - ‘पोर्नेग्राफी’ला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत सनी लियोनविरुद्ध चेन्नई पोलिसांत तक्रार दाखल

● मुंबई - विकास साठ्ये या मुंबईकर युवकाला ‘के1 शॉटओव्हर’ कॅमेरा तंत्र विकसित करण्यासाठी आॅस्करने गौरविण्यात आले

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...