Wednesday 7 February 2018

निवडणूक प्रक्रियेविरोधात ७ फेब्रुवारीला राज्यव्यापी धरणे

गोंदिया,दि.07: देशातील सर्व निवडणूक प्रक्रिया ईव्हीएमऐवजी मतपत्रिकाद्वारे घेण्याची मागणी करत, बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीच्यावतीने उद्या बुधवारी, ७ फेब्रुवारीला राज्यव्यापी धरणे आंदोलनांंतर्गत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यव्यापी आंदोलनाचे नेतृत्व करणारे बीआरएसपीचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने करणार आहेत. आंदोलनात ईव्हीएमद्वारे निवडणूक धोरण राबविताना व्ही. व्ही. पैट पेपर टड्ढेल व्यवस्था असणे आवश्यक आहे.
यंत्रणा सक्षम होत नाही, तोपर्यंत पूर्वीप्रमाणेच मतपत्रिकांद्वारेच मतदान घ्यावे, प्रलोभनाद्वारे मतदारांना आकर्षित करणाèयावर कारवाई करण्यात यावी, उमेदवाराची संपत्ती विवरण १० दिवसात जाहिर करण्यात यावे आदि मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन भंडारा-गोंदिया लोकसभा प्रभारी राजेश बोरकर, सुधा शिवणकर, डी.एस.मेश्राम, प्यारेलाल जांभुळकर, सुरज कोराम, प्रफुल डोंगरे, करमचंद शहारे, देवेश शेंडे, राजकुमार रामटेके, देवीदास बोहरे, निलेश देशभ्रतार आqदनी केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...