Thursday 8 February 2018

५ हजाराची लाच स्विकारतांना कनिष्ट सहाय्यक जाळयात


भंडारा 08:शासकीय योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या विहीरीचे अनुदान संबंधीत शेतकºयाच्या बँक खात्यावर जमा करण्याकरीता ५ हजार रूपयाची लाच मागणाºया मोहाडी पंचायत समिती येथील कनिष्ट सहाय्यकास लाच स्विका- रतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी अटक केली. अखिल भुवनजी पारधी वय ३८ वर्ष,रा.विनोबा भावे नगर तुमसर त.तुमसर जि.भंडारा असे लाच मागणाºया आरोपीचे नाव आहे. तक्रारदाराच्या वडीलांच्या नावे शासनाच्या धडक सिंचन विहीर योजनेअंतर्गत सन २०१७ ला २ लाख ५० हजार अनुदान असलेली विहीर मंजुर झाल्याने त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये सदर विहीरीचे बांधकाम पुर्ण केले.सदर विहीरीला पाणी लागल्याने मोहाडी पंचायत समिती कडुन त्या विहीरीची पाहणी करण्यात आली.
दरम्यान दि.२२ जानेवारी २०१८ रोजी तक्रारदाराने मोहाडी पंचायत समितीमध्ये जावुन तिथे कार्यरत कनिष्ट सहाय्यक अखिल भुवनजी पारधी यांच्याकडे बांधकाम केलेल्या विहीरीच्या अनुदानाबाबत विचारणा केली असता अखिल पारधी याने तक्रारदारास बांधण्यात आलेल्या विहीरीचे अनुदान तक्रारदारा च्या वडीलांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा मोबदला म्हणुन ५ हजार रूपये लाचेची मागणी केली. त्यानुसार दि.२४ जानेवारी २०१८ रोजी १ लाख ३० हजार ३८१ रूपये बँक खात्यावर जमा झाले.दरम्यान दि.१ फेब्रुवारी २०१८ रोजी तक्रारदार याने उर्वरित धनादेशाकरीता परत एकदा अखिल पारधी यांची मोहाडी पंचायत समितीमध्ये भेट घेतली असता आरोपी अखिल पारधी याने धडक सिंचन योजनेचे मागील धनादेश काढुन दिल्याचे सांगीत उर्वरित धनादेश काढण्याकरीता ५ हजार रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराच्या तक्रारीवरून भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी सापळा रचुन मोहाडी पंचायत समिती येथील कनिष्ट सहाय्यक अखिल पारधी याला तक्रारदाराकडुन पाच हजार रूपयाची लाच स्विकारतांना रंगेहात अटक करण्यात आली.
आरोपीविरोधात मोहाडी पोलीसात कलम ७,१३(१)(ड) सहकलम १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असुन आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास एसीबी भंडाराचे पो.नि.पारधी करीत आहेत. सदर कारवाई नागपूर एसीबीचे पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक दिनकर सावरकर,पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी,सफौ.गणेश पदवाड,पोना.गौतम राऊत,सचिन हलमारे,पोशि.अश्विनकुमार गोस्वामी,पराग राऊत,शेखर देशकर, चानापोशि.निलेश मेश्राम यांनी केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...