Tuesday 13 February 2018

शालेय पोषण आहारामध्ये निकृष्ट दर्जेचा मीठ वाटप


गोंदिया,दि.12ःः तालुक्यातील मुरपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय पोषण आहार अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या साहित्यांपैकी निकृष्ट दर्जेचा मीठ वाटप करण्यात आले. ह्या मिठात विविध प्रकारच्या रासायनिक द्रव्यांचा प्रमाण असल्याचे आढळून आले आहेत. शालेय पोषण आहार योजने अंतर्गत सर्व शासकीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेतच जेवणाची व्यवस्था व्हावी ह्या करीता धान्य व इतर सर्व साहित्याचा पुरवठा केला जातो. त्यात मीठ सुद्धा पुरवला जातो. ह्या मिठाला गोड्या तेलात आणि पाण्यात मिसळले वेगवेगळे रंग तयार होताना दिसतात. सदर मीठ गुजरातच्या श्री केमिकल फूड ह्या कंपनी कंत्राटदाराकडून तयार करून घेतल्याचे आढळुन येते. ह्या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात होत असलेल्या ह्या मिठाच्या वितारणामुळे खळबळ माजली असुन विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जर ह्या मिठामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यास कोण जबाबदार राहणार असा प्रश्न पालकवर्गाकडून केला जात असताना पालकांनी सदर बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदिया ह्यांकडे कळवताच ह्यावर त्वरित कार्यवाही करत सदर शाळेला भेट देऊन चौकशी केली आणि मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा गोंदिया ह्यांना ह्याचा जाब विचारत संबंधित कंत्राटदारांची कंत्राट रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ह्या प्रकरणात कुठलीही हलगर्जीपणा केल्यास मनसे तर्फे प्रचंड आंदोलन करू असे आव्हान करण्यात आले आहे.
निवेदन देताना मनसेचे जिल्हा अध्यक्ष मनीष चौरागडे, उपाध्यक्ष मुकेश मिश्रा, गोंदिया तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे, शहर अध्यक्ष राजेश नागोसे, उदय पोफळी, मनसे विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष क्षितिज वैद्य व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...