Monday 12 February 2018

रोहयोच्या कामावर ‘जण-गण-मन’चा गजर


 नक्षलग्रस्त चिचेवाडात राष्ट्रगीताने रोहयोच्या कामाला सुरुवात, राज्यात इतर गावांसाठी प्रेरणादायी उपक्रम
देवरी,दि.11 ~ भारताचा इतिहास पाहता ना भूतो ना भविष्य असे अनेक थोर पुरुषांनी भारत मातेच्या चरणी नतमस्तक होवून या देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. मात्र सध्याच्या धडपडीच्या युगात ही देशभक्ती कुठेतरी कमी होताना दिसत असून पाश्चात्य संस्कृतिचा ज्वर आजच्या युवा पिढीमध्ये संचार करीत असल्याचे जाणवत आहे. असे असले तरी भारत मातेच्या रक्षणासाठी करोडो हात पुढे येतील यातही शंका नाही. देशभक्ती हा विषय निघाला तर अनेक क्रांतीकारींची आठवण ही अपसूकच येते. देशभक्तीची मशाल ही सदैव पेटत राहणार असून अशीच मशाल देवरी तालुक्यातील चिचेवाडा या नक्षलग्रस्त गावात पेटली आहे. याठिकाणी सुरू असलेल्या रोजगार हमीच्या कामावर गेल्यानंतर निश्चितच देशभक्ती जागृ्रत होईल. असे म्हणण्यात वावगे ठरणार नाही.
चिचखेडा येथील मजूरांनी ‘रोजगार हमी अन् काम कमी’ ही थट्टात्मक म्हणच एक प्रकारे बदलून टाकली आहे. तर या ठिकाणी येता ‘मेरे देश की धरती’ या ‘उपकार’ चित्रपटातील गीताची आठवण येते. गावातील नागरिकांना रोजगार मिळावा, यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंमलात आली योजनेतून अनेकाना रोजगारही मिळाला अशात आता या योजनेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये देशभक्ती जागृ्रत करण्याचे कामही करण्यात येत असून आदिवासी बहूल व नक्षलग्रस्त देवरी तालुक्यातील चिचेवाडा ग्रामपंचायतीकडून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. योजनेंतर्गत कामावर येणारे मजूर राष्ट्रगीत गायन करुनच कामाला सुरुवात करीत आहेत. १ जानेवारीपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून ३०० मजूर दरदिवशी राष्ट्रगीताने आपल्या कामाची सुरुवात करीत आहेत.
जिल्ह्याच्या टोकावर छत्तीसगड राज्याला लागून देवरी तालुका आहे. आदिवासी बहूल व नक्षलग्रस्त तालुका म्हणून या तालुक्याची ओळख आहे. शासनाच्या निर्देशानुसार तालुक्यात अनेक गावांमध्ये रोहयोची कामे सुरू आहेत. अशात सर्वत्र रोहयोच्या कामावर हजेरी लावल्यानंतर लगेच कामाला सुरुवात होते. परंतु चिचेवाडा ग्रामपंचायतअंतर्गत होत असलेल्या रोहयो कामाची सुरुवात ही राष्ट्रगीताने होते. त्यामुळे तालुक्यात या गावाचे सर्वत्र कौतुकही होत आहे. विशेष म्हणजे ग्रा.पं. माजी सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवचरण बडवाईक यांच्या प्रयत्नांमुळे हे कौतुकास्पद उपक्रम सुरू झाले असून दररोज सकाळी ९ वाजता राष्ट्रगीत होते. तर दररोज राष्ट्रगीत झाल्यानंतर मजुरांची हजेरी घेतली जाते. मग्रारोहयोच्या कामासाठी गावकरी, सरपंच श्यामकला गावड, उपसरपंच देवेंद्र गेडाम, ग्रामसेवक विवेक विठ्ठले व ग्रा.पं. सदस्य परिश्रम घेत आहे. दरम्यान चिचेवाडा देवरी तालुकाच नव्हे तर जिल्ह्यातील इतरही गावांसाठी प्रेरक ठरत आहे

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...