Wednesday 14 February 2018

जिल्हाला झोपडले गारपिटीने,खरीप पिकाचे लाखोचे नुकसान


गोंदिया,दि.१४ः- जिल्ह्यात काल सायकांळी आलेल्या अवकाळीपावसासोबतच पडलेल्या गारपीटीमुळे खरिप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पडलेल्या गारपीटीमुळे तिरोडा,गोरेगाव तालुक्यातील भागाच गारांचाच पाऊस पडला.त्यामुळे रस्ते आणि घरातील अंगणात गारांचा सडा पडल्याचे चित्र आज सकाळीही बघावयास मिळाले.गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार,पाथरी,सिलेगाव पासून ते बोडूंदापर्यंत गारामुळे जणूकाही आपण काश्मिरातच आहोत की काय अशा भास नागरिकांना गारा बघून वाटत होते.गारा एवढ्या मोठ्या होत्या की पिडंकेपार रेल्वेचौकीच्या अंडरग्राऊंडपुलातही साचल्याने वाहन काढतांना अडचणी निर्माण झाल्या.या गारामुळे लाखोळी,चना,गहू,धानपिकासह खरीप पिकाचे लाखोचे नुकसान या भागात झाले आहे.शेतकèयांच्या कृषीफार्ममधील वांगे,मिरची,टमाटर,शेंगा आदींची वाताहत झाली असून पिके पुर्णता नष्ट झाली आहेत.गोरेगाव तालुक्यातील qपडकेपार येथे घरांचे छतही उडाले असून मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी सकाळी ७ वाजताच गोरेगाव तालुका गाठत तहसिलदार कल्याण डहाट,पंचायत समिती सदस्य केवल बघेले,डुमेश चौरागडे यांच्यासह गारपिठग्रस्त भागाची पाहणी करीत तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठी व कृषीसेवकांना दिले.
आमगाव तालुक्यातील अंजोरा जिल्हा परिषद क्षेत्रातही गारपिटीमूळे वळद,कंटगटोला,सोनेखारी,येरमडा,जैतुरटोला,कवडी,पानगाव,रामपुर,अंजोरा,माळीटोला, भालीटोला,जांभुळटोला,पिपरटोला,तिगांव,आसोली,पाऊलदौना,फुक्कीमेटा,बघेडा,कोसमटोला,चिंताटोला,चिमनटोला,कोपीटोला,गंगुटोला,कन्हारटोला.हलबीटोला,या गावातील शेतकèयांच्या चना,गहू ,लाखोळी,गोभी,नवलगोल,टमाटर,चवळीशेंग,आंब्याचा बहाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जिल्हापरिषद सदस्य जियालाल टेंभरे यांनी मतदारसंघातील गावांची पाहणी करीत तहसिलदार व कृषी अधिकारी यांनी तत्काळ पंचनामे करावे अशी मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...