Wednesday 14 February 2018

बोलेरो उलटून झालेल्या अपघातात 2 गंभीर तर 7 किरकोळ जखमी


गडचिरोली,दि.14 : जिल्ह्यातील लगाम-चौडमपल्ली मार्गावर आज सकाळच्या सुमारास झालेल्या बोलोरेच्या अपघातात 2 जण गंभीर तर 7 किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली.घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार व त्यांच्या पत्नी सोनाली कंकडालवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपूस केली.अहेरी येथून चंद्रपुरला लग्नकार्यात सहभागी होण्यासाठी आईंचवार कुटूंब महिंद्रा बोलेरो क्र.MH-33 v0917 ने जात असताना एका वळणावर दुचाकीला वाचविन्याच्या प्रयत्नात बोलोरोच्या चालकाचे नियंत्रण सूटल्याने गाडी पलटली.या गाडीत 9 प्रवासी होते.यामध्ये 3 पुरुष,3 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे.वाहन चालक सागर सन्तोषवार (वय35 आणि लीलाबाई आइंचवार(वय 55) हे गंभीर जखमी आहेत. तर नीलेश रमेश आइंचवार,रूपेश रमेश आइंचवार,पायल नीलेश आइंचवार,दक्ष नीलेश आइंचवार ,सतीश ओलेटिवार,पल्लवी सतीश ओलेटिवार , वासवी सतीश ओलेटिवार हे क़िरकोळ जखमी असून त्यांना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. .

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...