Tuesday 13 February 2018

सध्या इंटरनेट वर वायरल असलेली हि मुलगी नेमकी कोण आहे ?



गोंदिया,(पराग कटरे)दि.१२ :व्हॅलेन्टाइन्स डेच्या निमित्ताने सोशल मीडियावर जणू प्रेमाचं भरतं आलं आहे. प्रेमाशी संबंधित व्हिडिओ, फोटो आणि क्लिप्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या संख्येने शेअर होताना दिसताहेत. याच दरम्यान गेले दोन दिवस एक व्हिडिओ क्लिपदेखील फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि व्हॉट्स अॅप वर वायरल होतेय.
या व्हिडिओ क्लिपमध्ये विद्यालयीन गणवेशातील एक मुलगी एक डोळा मारून तिच्या बॉयफ्रेंडला प्रेमाचे इशारे करतेय. भुवया उंचावून बॉयफ्रेंडला उत्तर देण्याची तिची अदा दिलखेचक आहे. तिच्या या गोड हावभावांमुळेच सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हॅलेन्टाइन्स डेचं प्रतीक बनला आहे. व्हिडिओत दिसणारी ही मुलगी आहे, मल्याळी अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर.
प्रिया ‘ओरू अडार लव’ या मल्याळी चित्रपटातून या क्षेत्रात पदार्पण करतेय. येत्या ३ मार्चला प्रियाचा हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. याच चित्रपटातील एका गाण्याचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल झाल्याने प्रिया पदार्पणापूर्वीच ‘फेमस’ झालीय. नुकतेच प्रियाचे ‘मानिका मलयारा पूवी’ हे मल्याळी गाणेदेखील प्रदर्शित झाले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...