Sunday, 4 February 2018

'पेंशन बचाव' साठी अंशदायी कर्मचाऱ्यांचे उग्र आंदोलन

येत्या २२ फेब्रुवारीला मुंबईच्या आझाद मैदानावर महामोर्चा

गोंदिया येथे पेंशन परिषदेचे यशस्वी आयोजन

गोंदिया,दि ०४- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि राज्य चतुर्थ कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गेल्या बुधवारी (दि.३१) पेंशन बचाव परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, अंशदायी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला असून येत्या २२ फेब्रुवारीला मुंबई येथे सरकारच्या विरोधात महामोर्च्याची घोषणा केली.
या परिषदेला अखिल भारतीय महासंघाचे उपाध्यक्ष अशोक थूल,राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे उपाध्यक्ष चंद्रहास सुटे आणि राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस अशोक दगडे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी लीलाधर पाथोडे, आशिष रामटेके, मदन चुऱ्हे, प्रशांत पाठक,के.व्ही. नागफासे, बी.एन.तरोणे, पी. जी शहारे, शैलेश बैस, लीलाधर तिबुडे, नरेंद्र रामटेककर, राजेश मेनन, राकेश डोंगरे, अमोल पाटणकर, सुलभा खाडे, पी.वाय बडोले, ए. जे. नान्हे आदी मान्यवर उपस्थित होते.
या परिषदेत नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त कर्मचाऱ्यांना अंशदायी पेंशन योजना शासनाने शक्तीने लागू केल्यामुळे या कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. सदर अन्यायकारक योजना शासनाने तत्काळ बंद करून जुनीच पेंशन योजना लागू करण्यासाठी यासाठी सातत्याने आंदोलने-धरणे आयोजित केले जात आहेत. पण शासन या सर्वांना मुळीच प्रतिसाद देत नाही.सातव्या वेतन आयोगाबाबत सुद्धा शासनाचे धोरण स्पष्ट नाही. मुख्यमंत्री लिखित आश्वासने देत असले तरी त्या आश्वासनांची पूर्तता मात्र करीत नाहीत. त्यामुळे राज्यात तीव्र आंदोलन करण्याला पर्याय नाही.यासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचारी,शिक्षक, कामगार संघटना एकत्रित आंदोलने करण्याबाबत  राज्य आणि देशपातळीवर कार्यक्रम आखला जात आहे. आपल्या मागण्यांसंदर्भात येत्या २२ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्च्याला सर्व कर्मचाèयांनी हजेरी लावण्याचे आŸवाहन सुद्धा या परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले.
प्रास्ताविक तथा संचलन लीलाधर पाथोडे यांनी केले. उपस्थितांचे आभार पी जी शहारे यांना मानले. यावेळी कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...