Wednesday 7 February 2018

जिल्हा बॅंकेत २८ लाखांची अफरातफर

भंडारा,दि.07ः-भंडारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या महिला रोखपालाने बॅंकेच्या सस्पेन्स खात्यामधून तब्बल २७ लाख ९२ हजार ३२६ रुपये आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये वळते करून अफरातफर केली. बॅंकेच्या व्यवस्थापकाने ही रक्कम पास करून दिली. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी रोखपाल व व्यवस्थापकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. बॅंक व्यवस्थापनानेही दोघांना निलंबित केले आहे.
हा प्रकार १९ सप्टेंबर २0१६ ते २८ सप्टेंबर २0१६ या कालावधी मधील आहे. भंडारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या बॅंकीग युनिटमध्ये व्यवस्थापक सिंदपूरे व महिला रोखपाल पांडे कार्यरत होत्या. बॅंकेच्या सस्पेन्स खात्यामध्ये मोठय़ा प्रमाणात रक्कम जमा आहे. या रकमेबाबत कुणीही विचारत नसल्याने महिला रोखपाल पांडे हिने संधी साधून त्या खात्यामधून २७ लाख ९२ हजार ३२६ रुपये आपल्या वरठी येथील स्वत:च्या बॅंक खात्यामध्ये ट्रान्स्फर केले. बॅंकींग युनीटचे व्यवस्थापक सिंदपूरे यांनीही कोणतीही शहानिशा न करता ही रक्कम पास करून टाकली. त्यामुळे ती रक्कम पांडे हिच्या खात्यामध्ये पोहोचली. त्यानंतर एटीएममधून काही रक्कम काढली.
घटनेच्या काही दिवसानंतर बॅंक व्यवस्थापनाला याबाबत माहिती होताच चौकशी करण्यात आली. त्यात दोघेही दोषी आढळून आल्याने त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. याबाबतची तक्रार बॅंकेचे सरव्यवस्थापक संजय बरडे यांनी भंडारा पोलिसात केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४0९, ४२0, सहकलम ६६ (ड) आयटी अँक्ट २000 अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सिडाम करीत आहे

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...