Thursday 8 February 2018

एकट्या अक्षयवर लागलेत ७०० कोटी!


बॉलिवूडमध्ये सध्या अक्षय कुमार 'हिट मशिन' म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता आहे.


बॉलिवूडमध्ये सध्या ‘हिट मशिन’ म्हणून प्रसिद्ध असलेला अक्षय कुमार आजच्या घडीला केवळ चर्चेत राहणाराच नाही तर सर्वाधिक कमाई करणारा अभिनेतासुद्धा आहे. सलमान खाननंतर १०० कोटींचा गल्ला कमवणारे सर्वाधिक चित्रपट देणारा अक्षय दुसरा अभिनेता ठरला आहे. त्याच्या तब्बल आठ चित्रपटांनी १०० कोटींच्यावर कमाई केली आहे. वेळेच्या आधी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करणे आणि बॉक्स ऑफिसवर चांगल्या कमाईची हमी देणारा अभिनेता म्हणून तो ‘निर्मात्यांचा आवडता अभिनेता’ म्हणूनही आता प्रसिद्ध आहे. याच कारणामुळे प्रेक्षक आणि बॉक्स ऑफिस नेहमीच त्याच्या पारड्यात यशस्वी चित्रपट टाकतात.
अक्षयच्या येत्या काही चित्रपटांचा विचार करता त्याच्यावर तब्बल ७०० कोटी रुपये लागल्याचे दिसून येते. त्याच्या हातात सध्या पाच मोठे चित्रपट आहेत. त्याचा हा आढावा.
पॅडमॅन – ८० कोटी रुपये
सामाजिक आणि एका महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाच्या प्रसिद्धीत अक्षयने कोणतीच कसर बाकी ठेवली नाही. उत्तम कथानक आणि चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी टीमने अवलंबलेल्या विविध कल्पना यांमुळे ‘पॅडमॅन’ हा १०० कोटींचा गल्ला जमवणारा अक्षयचा पुढचा चित्रपट ठरेल यात शंका नाही.
२.० – ४०० कोटी रुपये
४०० कोटी रुपये! होय, रजनीकांत आणि अक्षयच्या ‘२.०’ चित्रपटाचा बजेट तब्बल ४०० कोटी रुपये आहे. सायन्स फिक्शन असलेला हा चित्रपट ‘एन्थिरन’ (रोबोट)चा सिक्वल आहे. चित्रपटाचे पोस्टर्स आणि त्याबद्दलची चर्चा पाहता हा दुसरा ‘बाहुबली’ ठरण्याची शक्यता आहे.
गोल्ड – ७० कोटी
रीमा कागती दिग्दर्शित ‘गोल्ड’साठी अक्षय आता हॉकी परीक्षक झाला आहे. काही दिवसांपूर्वीच ‘गोल्ड’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला. तो पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नक्कीच सुवर्ण कमाई करेल यात शंका नाही.
केसरी – ५५ कोटी
यात अक्षय हा हविलदार इशर सिंग यांची भूमिका साकारणार आहे. सारागढीच्या युद्धावर आधारित असलेल्या या चित्रपटात परिणीती चोप्रासुद्धा मुख्य भूमिकेत दिसेल. ‘केसरी’मधील अक्षयच्या फर्स्ट लूकने सर्वांचे लक्ष वेधण्यात यश मिळवले आहे.
हाउसफुल ४ – १०० कोटी
‘हाउसफुल’ सिरीजमधील चौथा भाग असलेला हा चित्रपट आधीच्या भागांपेक्षा प्रेक्षकांचे अधिकाधिक मनोरंजन करेल अशी अपेक्षा आहे. काही संकेतस्थळांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटातील वीएफएक्सवर तब्बल ७५ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्मात्यांचा विचार असल्याचे कळते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...