Thursday 8 February 2018

बंद शाळांच्या इमारती ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित

नागपूर: 08 

नागपूर जिल्ह्यातील दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या सुमारे २२ प्राथमिक शाळा बंदच असून, या प्राथमिक शाळांच्या इमारती ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. तर यंदा जि.प.च्या व खासगी अशा एकूण १९ शाळांचे विलनीकरण करण्यात येणार आहे. तसा आदेश शासनाकडून जि.प.शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्याची माहिती आहे. 

राज्यातील १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. नागपूर जिल्ह्यातील २२ शाळांचे गेल्यावर्षी विलनीकरण करण्यात आले. शाळा बंद करण्याला शिक्षक संघटनांनी विरोध केला होता. तरी देखील जिल्ह्यातील २२ शाळा बंद करण्यात आला. जिल्ह्यात जि.प.च्या अखत्यारित येणाऱ्या पंधराशेवर शाळा आहेत. नागपूर जिल्ह्यातील कमी पटसंख्या असलेल्या २२ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद झाल्याने या शाळांच्या इमारती ओस पडल्या आहेत. या ओस पडलेल्या शाळांच्या इमारती जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव जि.प.च्या शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आला आहे. या इमारतींचा वापर कशासाठी होणार हा प्रश्न मात्र अद्याप कायम आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यातील २४ गावांतील ४९ शाळांचे विलणीकरण करुन २२ शाळा बंद करण्यात आल्या. यंदा शासनाकडून विभागाला २२ शांचे विलणीकरण करण्याचा आदेश प्राप्त झाल्याची माहिती आहे. यापैकी १८ शाळा जि.प.च्या तर ४ शाळा खाजगी संस्थेच्या आहेत. यातील दोन जि.प.च्या शाळांचे पूर्वीच विलनीकरण करण्यात आले असून, पुaलझरी गावातील शाळा ही सध्याच बंद करण्यात येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत शिक्षण सभापती उकेश चव्हाण म्हणाले 'विलिनीकरण करून बंद झालेल्या शाळांची इमारत आता ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे. तसा ठरावही शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दुसऱ्या विभागाला त्या वापराकरीता द्यायच्या असल्यास विभागाकडून त्याबाबतची एनओसी घ्यावी लागणार आहे.' 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...