Wednesday 7 February 2018

येत्या चोवीस तासांत विदर्भ, मराठवाड्यात वादळासह गारपीटीची शक्यता

गोंदिया,दि.७: विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश भागात येत्या १० ते १३ फेब्रुवारदरम्यान वादळ व गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून, शेतकऱ्यांनी कापलेल्या पिकाचे संरक्षण करण्यासंबंधी योग्य काळजी घेण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, नांदेड, लातूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये, तसेच अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील पूर्व भागात विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात गारपीटही होण्याची शक्यता आहे. ११ व १२ फेब्रुवारीला या जिल्ह्यांमध्ये वादळ व गारपिटीची शक्यता अधिक असेल. १३ फेब्रुवारीला वादळाची तीव्रता कमी होईल आणि १४ ला हवामान सर्वसाधारण होईल, असा अंदाज आहे.
या पार्श्वभूमीवर, कापणीवर आलेल्या ज्वारीसारख्या पिकांची कापणी करुन धान्य योग्यरित्या साठवावे. शेतमालाच्या व्यापाऱ्यांनीदेखील संरक्षितपणे साठवणूक करावी. सर्व नागरिकांनी वादळ, विजा व गारपिटीपासून स्वत:सह गुराढोरांचे संरक्षण होईल, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...