Wednesday 7 February 2018

काम की बात सोडून मोदी दीड तास कॉंग्रेसवर घसरले

Narendra Modi talks a lot but didn't talk on important issues it says Rahul Gandhi | मोदी दीड तास बोलले, पण काँग्रेसवरच घसरले; 'काम की बात' नाहीच: राहुल गांधी
नवीदिल्ली,दि.07: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी लोकसभेत तब्बल दीड तास ठोकलेल्या भाषणात एकही गोष्ट कामाची नव्हती, अशी खरमरीत टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. राहुल यांनी म्हटले की, आज लोकसभेत आम्ही पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकायला उत्सुक होतो. मात्र, त्यांचे भाषण केवळ राजकीय आणि प्रचारसभेला साजेसे होते, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

आम्ही मोदींना राफेल विमान खरेदी व्यवहार, शेतकऱ्यांच्या समस्या आणि रोजगारनिर्मिती अशा तीन मुद्द्यांवर प्रश्न विचारले होते. मात्र, दीड तासांच्या भाषणात मोदी यावर एकही शब्द बोललेच नाहीत. या मुद्द्यांवर बोलायचे सोडून ते मधुमक्षिकापालन आणि बांबू अशा गोष्टींविषयी बोलत राहिले. त्यांनी आपला सर्व वेळ काँग्रेस नेत्यांवर टीका करण्यातच वाया घालवला. मात्र, आमच्या साध्या आणि सोप्या प्रश्नांची उत्तरे ते देऊ शकले नाहीत. सत्तेवर येण्यापूर्वी पंतप्रधान मोदी भ्रष्टाचारमुक्त कारभाराची भाषा बोलायचे. आता राफेल व्यवहारात भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालत आहेत. 2014 पूर्वी सत्तेत येण्याच्या अगोदर ते काँग्रेसच्या 70 वर्षांचा हिशेब मांडायचे ती गोष्ट ठीक होती. मात्र, आता सत्तेत येऊन इतका काळ उलटल्यानंतरही मोदी त्याच त्या गोष्टी सांगत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...