Tuesday 13 February 2018

संत साहित्य संमेलनातून विचारांचा प्रसार-विठ्ठल पाटील

सातवे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे होत आहे.

गोंदिया,दि.१३(खेमेंद्र कटरे)- सातवे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे होणार आहे. केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होईल. अध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक ह.भ.प.रामकृष्णमहारात लहवितकर असतील.गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंजि.राजकुमार बडोले स्वागताध्यक्ष आहेत, अशी माहिती वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्राचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी बेरार टाईम्सशी बोलतांना दिली.
संतांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा, त्यावर विश्लेषणात्मक चर्चा व्हावी आणि सामाजिक समतेचा विचार समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचावा,या उद्देशाने वारकरी साहित्य परिषदेतर्फे २०१२पासून संत साहित्य संमेलनाचे आयोजन केले जात आहे. संत साहित्य मंदिर-मठांतून शाळा-महाविद्यालयांपर्यंत पोहोचावे म्हणून या संमेलनात प्रयत्न केला जातो.आजपर्यंतची सर्व संत साहित्य समेंलन शेगाव वगळता जिल्ह्याच्या मुख्यालयीच झालेली आहेत.शेगाव संंत गजानन महारांजे स्थळ त्यामुळे तिथे घेण्यात आले होते.यावेळी झाडीपट्टीसाहित्याला प्राधान्य देत अर्जुनी मोरगाव येथे गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या प्रयत्नाने अर्जुनी मोरगाव येथे होत आहे.
१५ फेब्रुवारीला सकाळी सात वाजता ग्रंथ दिंडीने संमेलनाची सुरुवात होईल. प्रत्यक्ष उद्घाटन सकाळी १० वाजता केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होईल. स्वागताध्यक्ष सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले,ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे,सहकारमंत्री सुभाष देशमुख,राज्यसभा खासदार प्रल पटेल,qदडी सोहळ्याचे उदघाटन पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते होणार आहे. समारोप कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे,सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री विजयबापू शिवतारे, आदिवासी विकास राज्यमंत्री अमरिशराजे आत्राम यावेळी उपस्थित असतील.
तीन दिवस चालणाèया या संमेलनात परिसंवाद, कीर्तन, भारूड व भजन इ. कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. संत साहित्याने विविध विषयांना कसा न्याय दिला आहे, याचा आढावा परिसंवादाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. परिसंवादामध्ये संत साहित्य आणि शेती, संत साहित्य आणि उद्योग-व्यवसाय, संत साहित्य आणि झाडीपट्टी, संत साहित्य व पाठ्यक्रम, संत साहित्य व स्त्री, संत साहित्य व प्रसारमाध्यमे, संत साहित्य व मन:स्वास्थ्य अशा विविध विषयांवर चर्चा होईल. त्यात त्या त्या विषयांतील तज्ज्ञ मान्यवर सहभागी होणार आहेत.वैचारिक मंथनाबरोबरच पारंपरिक संत साहित्याने मांडलेल्या विचारांच्या प्रसाराची माध्यमे असणाèया कीर्तन, भजन आणि भारुडांचे कार्यक्रमही होतील. हे कार्यक्रम कीर्तन व भजन-भारुडांसाठी उभारण्यात आलेल्या स्वतंत्र मंडपात होतील. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० वाजता काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर खुले अधिवेशन होऊन त्यात विविध ठराव मांडण्यात येतील.दुपारी १२ वाजता समेलनांची सांगता व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार सोहळा होणार आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...