अखिलेश यादव,नरेश अग्रवाल,रविना टंडन,सोनू निगम,राजू श्रीवास्तव यांची विशेष उपस्थितीगोंदिया,दि.02- भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे स्वनामधन्य नेता व शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांची ११२ वी जयंती निमित्त भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शालांत व पदवी परिक्षेत प्राविण्याप्राप्त विद्याथ्र्यांचा स्व.मनोहरभाई पटेल स्मृती स्वर्ण पदक वितरण समारोह शुकवार ९फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता स्थानिक डी.बी.सायन्स कॉलेजच्या भव्य प्रांगणात करण्यात आले आहे.
या स्वर्ण पदक वितरण समारोहाचे उद्घाटन उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे करतील. तर अध्यक्षस्थानी गोंदिया शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल हे राहतील. विशेष अतिथी म्हणून खा.नरेश अग्रवाल,सुप्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन, प्रख्यात गायक सोनू निगम,हास्य कलाकार राजु श्रीवास्तव, माजी मंत्री अनिल देशमुख उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोपालदास अग्रवाल,माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, विलास शृंगारपवार, माजी आमदार अनिल बावणकर,रामरतन राऊत,दिलीप बन्सोड,सेवक वाघाये,मधुकर कुकडे, मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षाताई पटेल,माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर,नरेश माहेश्वरी हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. मनोहरभाई पटेल अकादमी तथा गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात गोंदिया शिक्षण संस्था तथा मनोहरभाई पटेल अकादमीचे सदस्य कार्यक्रमाची जोरदार तयारी करीत आहेत. तेव्हा स्वर्ण पदक वितरण समारोहाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री.गुजराती राष्ट्रिय केलवणी मंडळ,स्व.मनोहरभाई पटेल स्मृती समितीचे अध्यक्ष माजी आमदार हरिहरभाई पटेल व मनोहरभाई पटेल अकादमी व गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment