जागांचा तिढा मात्र कायम
Monday, 30 September 2019
अखेर भाजप- शिवसेनेचं जमलंच
जागांचा तिढा मात्र कायम
डॉ. मनमोहन सिंग यांनी नाकारले पाकिस्तानचे निमंत्रण
आमदार अग्रवालांच्या हातात भाजपचा झेंडा

शिवस्मारकामध्ये 1 हजार कोटींचा भ्रष्टाचार

विरोधकांचा मुख्यमंत्री यांचेवर आरोप
दक्षता समितीने दाद दिली नाही तर प्रकरण न्यायालयात नेणार
वंचितचे उमेदवार जाहीर
ठाण्यात शिवसैनिक भाजपचा प्रचार करणार नाही
युतीमुळे शिवसेनेत गटबाजी उफाळली
पुन्हा केंद्राची रिझर्व्ह बॅंकेच्या 30 हजार कोटीवर नजर
चंद्रकात पाटील यांना ब्राम्हण महासंघाचा तीव्र विरोध
नातेवाईकच निघाला वृद्ध महिलेचा खरा मारेकरी

...अखेर आमदार गोपालदास अग्रवाल यांचा कॉंग्रेसला बायबाय
कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा सोनिया गांधी कडे फॅक्स
आमदारकी ही सोडली
कवर्धामधील चकमकीत महिला नक्षलीचा खात्मा
आ.अग्रवालांचा आज भाजप प्रवेश
Sunday, 29 September 2019
जिल्हास्तरीय योग स्पर्धेत देवरीच्या स्पर्धकांची बाजी
देवरी: २९
बृहन महाराष्ट्र योग परिषद अमरावती अंतर्गत व गोंदिया जिल्हा योग असोसिएशन अंतर्गत जिल्हा स्तरीय योगासन स्पर्धा सिंधी शिक्षण संस्था गोंदिया येथे आज 29 ला पार पडली असून स्पर्धेमध्ये देवरी येथील स्पर्धकांनी उत्कृष्ट प्रदर्शन करित बाजी मारली. सदर स्पर्धेमधे वयोगट 8-13 मुले मधे कुणाल चुटे प्रथम , हर्षित चुटे 13-18 द्वितीय,
रोहित ब्रामहनकर 18-25 त्रुतीय,
रोशनी कळमकर 25-35 द्वितीय ,
पुरुष वयोगटात 35-50 प्रमोद कळमकर प्रथम या प्रकारे स्पर्धकांनी सहभाग दर्शविला होता.
सदर स्पर्धकांना योग शिक्षक प्रमोद कलमकर आणि रोशनी कलमकर यांचे मार्गदर्शन लाभले होते.
योग समिति देवरीच्यावतिने विजेता स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले.
राष्ट्रवादीच्या भंडारा-गोंदियातील उमेदवारांच्या नावाची घोषणा ३ ऑक्टोंबरला?
खा.पटेलांनीच घेतल्या ७ मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
गोंदिया व आमगाव मतदारसंघावरही पदाधिकाèयांनी केला दावा
तुमसरमध्ये राजु कारेमोरे व अनिल बावनकर,तिरोड्यात माजी आमदार बनसोड व राजलक्ष्मी तुरकरमध्ये चुरस
गोंदियाची जागा मिळाल्यास विजय शिवणकर राहणार उमेदवार?
गोंदिया(खेमेंद्र कटरे),दि.२९ः– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारासंह त्यांच्या समर्थकांचा आढावा आज रविवारला राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेलांनी गोंदियातील जलाराम लॉन येथे घेतला.खा.पटेलांनी भंडारा जिल्ह्यातील भंडारा,तुमसर व साकोली तसेच गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया,तिरोडा,आमगाव व अर्जुनी मोरगाव या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांच्या बैठकीत पक्ष जो उमेदवार देईल त्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे असे स्पष्ट निर्देश देत उमेदवाराच्या नावाची घोषणा ही ३ ऑक्टोंबरला करण्यात येईल असे संकेत दिले आहेत.जेव्हा मुलाखती घेतल्या जात होत्या त्यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते ज्यामध्ये माजी खासदार,माजी आमदारासंह प्रफुल पटेलांनतंर ज्यांचे नाव येते ते सर्व सभागृहात बसून होते.तर प्रफुलभाई मात्र एकटेच उमेदवारांच्या मुलाखती घेत होते.या मुलाखतीच्यावेळी सभागृहात माजी खासदार मधुकर कुकडे,माजी आमदार राजेंद्र जैन,दिलीप बनसोड,नाना पंचबुध्दे,अनिल बावनकर,माजी म्हाडाचे सभापती नरेश माहेश्वरी,माजी.जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर,धनजंय दलालासंह आदी अनेक राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.
दरम्यान दोन्ही जिल्ह्यातील अनेक नेते व पदाधिकाèयांनी मात्र आजच्या मुलाखतीच्या प्रकियेवरच नाराजी व्यक्त करीत सर्वच उमेदवारांना एकासोबत बोलविण्याएैवजी एका एका उमेदवाराकडून पटेलांनी म्हणने एैकायला हवे होते अशी प्रतिक्रिया दिली.तर राष्ट्रवादी पक्ष लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पुन्हा कमजोर झाला असून जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचे नसलेल्या अधिकाराचाही परिणाम पक्षसंघटनेच्या मजबुतीवर पडल्याची भावना अनेकांनी सभागृहात प्रतिनिधीकडे बोलून दाखविली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जोपर्यंत आपल्या हातातील अधिकार जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष व पक्षाच्या इतर नेत्यांकडे दोन्ही जिल्ह्यात देणार नाहीत,तोपर्यंत पक्षाच्या संघटनेत बळ येणार नाही,आता पुर्वीसारखे दिवस राहिले नसल्याचेही अनेक कार्यकर्ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात तसेच उमेदवाराच्या निवडीसंदर्भात घेतलेल्या या बैठकीमध्ये गोंदियातील काँग्रेसचे आमदार हे भाजपमध्ये चालल्याने या मतदारसंघात काँग्रेस दुबळी ठरली आहे,तसेच काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्याने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवावी असा आग्रह या मतदारसंघातील पदाधिकारी व नेत्यांनी पटेलांकडे केला.त्यावर पटेलांनी गोंदियाची जागा काँग्रेसकडे असल्याने जागावाटपात राज्यपातळीवर जो निर्णय होईल त्यानुसारच मतदारसंघात राष्ट्रवादी निवडणुक लढवेल असे सांगत तुमच्या भावना प्रदेशाध्यक्षांकडे पोचविल्या जाणार असल्याचे सांगितले.तशीच परिस्थिती गडचिरोली लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी केली.आम्ही गडचिरोली लोकसभा मतदारसंघात येत असल्याने आमच्याकडे पाहिजे तसे लक्ष दिले जात नाही.हा मतदारसंघ काँग्रेसला दिला जातो,आम्ही काय करायचे असे म्हणत एका लोकसभा मतदारसंघात दोन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने घ्यावी ही भूमीका घेत आमगाव-देवरी मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यात देण्याची मागणी केली.या मतदारसंघात बाजार समितीचे रमेश ताराम हे एकमेव राष्ट्रवादीचे प्रबळ दावेदार आहेत.
अर्जुनी मोरगाव मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्यात असून या ठिकाणी सुध्दा मागच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार मनोहर चंद्रिकापुरे हे एकमेव प्रबळ दावेदार आहेत.तर तिरोडा मतदारसंघही राष्ट्रवादीच्या ताब्यात असून या मतदारसंघात मात्र मागच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार व महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर आणि माजी आमदार दिलीप बनसोड यांच्यात उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे.जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन यांनीही उमेदवारी मागितली असून मागच्या निवडणुकीत बनसोड अपक्ष रिंगणात राहत ४० हजार मते घेतल्याने पटेलासमोर पेच निर्माण झालेला आहे.तुमसर मतदारसंघात १३ जणांनी उमेदवारी मागितली,त्यामध्ये माजी खासदार कुकडेंचाही समावेश असला तरी राजू कारेमोरे व माजी आमदार अनिल बावनकर यांच्यापैकीच कुणा एकाच्या गळ्यात उंमेदवारी पडणार असल्याचे बघावयास मिळाले.भंडारा व साकोली येथील इच्छुकांनीही उमेदवारी सादर केल्या मात्र पाहिजे तसा प्रतिसाद या मतदारसंघात नसल्याचे जाणवले.
21 हजाराच्या दारूसह होंडा एक्टिवा जप्त
अर्जुनी मोरगाव पोलिसांची कार्यवाही

माजी आमदार रामरतन राऊत भाजपच्या वाटेवर?

Thursday, 26 September 2019
शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थी शाळेत न पाठविण्याचा निंबावासीयांचा निर्णय़
लोकशाही बळकटीकरणासाठी सर्वांनी मतदान करावे- उपविभागीयअधिकारी राठोड
तुमसरात कुख्यात गुंडाचा निर्घृण खून
माजी मंत्री अहिरांच्या ताफ्याला अपघात,दोन ठार-तीन जखमी
ककोडीच्या स्वस्तधान्य दुकानदारानी केली मारहाण
Wednesday, 25 September 2019
मुलाच्यां वस्तिगृहातिल पाऊल व्यसन मुक्तीकडे
ग्राहकांचे सहकार्य व आर्थिक शिस्तीमुळे अर्बन बँक प्रगतीपथावर – महेशकुमार जैन
भंडारा,दि.25- सभासद ठेवीदार व ग्राहकवर्गाच्या सहकार्यामुळे दि भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात बँकेने ५०० कोटींचा टप्पा ओलांडला असून दि. ३१ मार्च २०१९ रोजी बँकेच्या ठेवी रूपये ५०८.८८ कोटी झालेल्या आहेत. सर्व सभासदांचे बँकेप्रती असलेल्या विश्वासाचे हे प्रतिक आहे. सभासदांचे सहकार्य व विश्वासाचे आधारावर ठेवीदार व ग्राहकांचे उन्नतीकरीता सामाजिक भान ठेवून पारदर्शक व आर्थिक शिस्त कायम ठेवून कार्यक्षेत्रातील गरजू व्य्नतींच्या उन्नतीकरीता बँक नेहमीच प्रयत्नशिल आहे. सर्व संचालक व कर्मचारी यांचे अथक प्रयत्न व परिश्रमामुळे तसेच कर्जदार सभासदांनी दिलेल्या सहकार्यामुळे मागील आर्थिक वर्षाचे तुलनेत बँकेचे भागभांडवलात रूपये ३८ लाखांनी वाढ झालेली असून सन २०१८- १९ मध्ये बँकेला एकूण नफा रूपये १.०६ करोड झाला आहे. निव्वळ नफ्याच्या ६०.२४ ट्नके लाभांस बँकेच्या सभासदांना देण्यात आला.
शिखर बँक घोटाळाः शरद पवार, अजित पवारांसह ७० जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल
Monday, 23 September 2019
अनियमित बस फेऱ्यांचा मागितला अहवाल
मानव विकास कार्यक्रम सन 2019-20 बसफेऱ्यांचे वेळापत्रक कोलंडल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना असह्य त्रास सहन करावा लागेल असल्याचे वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाला जाग आली आणि सदर बस फेऱ्यांचा वेळापत्रक कोलमडल्या बाबद आगार व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गोंदिया, साकोली , तिरोडा यांना बस फेऱ्या वेळेवर न सोडल्यामुळे विद्यार्थ्यांना गैरसोय होत असल्यामुळे बस वेळेवर सुटतील आणि पोहचतील या प्रमाणे नियोजन करण्याचे आदेश सहायक जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा मानव विकास समिती ने दिलेले आहे आणि असा अहवाल सादर करण्याचे धाकीत दिले आहे.
Sunday, 22 September 2019
साडेसात हजार खोट्या ' कास्ट व्हँलिडिटी ' रद्द करा- आदिवासी विद्यार्थी संघाची मागणी
Saturday, 21 September 2019
सुंदरीदंड येथे जनजागरण मेळावा

अखेर विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले
आज भारताचे मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांनी निवडणुक कार्यक्रम जाहीर केला. त्याप्रमाणे, निवडणुकीची अधिसूचना ही 27 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. नामाकंन दाखल करण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर असून नामांकन पत्राची छाननी ही 5 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. नामांकन मागे घेण्याची तारीख 7 ऑक्टोबर असून प्रत्यक्ष मतदान 21 तारखेला होईल. तर मतमोजणी ही 24 ऑक्टोबरला करण्यात येणार असून निवडणुकीचा निकाल लगेच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणुक आयुक्त अरोरा यांनी दिली.
महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागा असून या जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणुक घेण्यात येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे उमेदवाराला या निवडणुकीत प्लॅस्टिकचा वापर करण्यावर बंदी लावण्यात आली आहे. दिवाळी च्या आधी या निवडणुकीचा निकाल येणार असल्याने कोणत्या पक्षाला फटाके फोडण्याची संधी राज्याचे मतदार देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे राज्यात या निवडणुकीला घेऊन आघाडीत जागा वाटपाचा तिडा जवळपास सुटल्यात जमा असून सत्ताधारी पक्षांच्या युतीचे गुपीत अद्याप तरी बाहेर आले नसल्याने संभ्रमाची स्थिती कायम आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा या समरामध्ये उडी घेणार असल्याचे संकेत आहेत. दुसरीकडे वंचित आघाडी आणि एमआयएम यांच्यात बेबनाव झाल्याचे याचा फायदा कोणत्या गटाला मिळेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. राज्यात आचारसंहिता लागू झाल्याने आता आघाडी आणि युतीच्या यात्रा आता गुंडाळाव्या लागणार आहेत.
लोकप्रतिनिधींच्या दबावात कंत्राटी मग्रारोहयो कर्मचार्यांच्या बदल्यांना ठेंगा
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...