मीरा रोड ( ठाणे )- सदनिका खरेदीसाठी आलेल्या महिलेकडील बंद झालेल्या 500 व 1000 रुपयांच्या नोटा असलेले साडेआठ लाख रुपये बळजबरीने लुटल्याच्या आरोपावरून मीरा रोडच्या नयानगर पोलिस ठाण्यातील 3 पोलिसांसह एका इस्टेट एजंटविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे तीघेही पोलिस गुन्हे प्रकटीकरण शाखेचे असून चेनस्नॅचिंग, दुचाकी चोरी आदी गुन्हे नुकतेच उघड केले आहेत.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला लक्ष्मी खुतिया या मालाडला राहतात. त्यांनी दोन दिवसांपूर्वी थेट पोलिस अधीक्षक डाॅ महेश पाटील यांची भेट घेऊन आपली फिर्याद मांडली. त्या अनुषंगाने पाटील यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. शनिवारी सायंकाळी पोलिस शिपाई मुस्तकिम पठाण, प्रशांत विसपुते व रामनाथ शिंदे या तीन पोलिसांसह इस्टेट एजंट फय्याज शेखविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment