Thursday 17 November 2016

राज्यात कोट्यवधीच्या नोटा जप्त

देवरी येथे सीमातपासणी नाक्यावर 25 लाखाची रोकड जप्त
नागपूर - 500 व 1000 या नोटाबंदीच्या निर्णयानंतर त्याचे पडसाद आता राज्यात सर्वत्र उमटू लागले आहेत. विदर्भात व  मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत दोन दिवसात कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. 
विदर्भात आज अमरावती, गोंदिया, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांत पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एकूण ४ कोटी २८ लाख रुपयांच्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. 
अमरावती शहर पोलिसांनी मंगळवारी (ता. १५) मध्यरात्री दीडच्या सुमारास एका ट्रॅक्‍समधून दोन पोती भरून असलेली ३ कोटी ७० लाख रुपयांची रक्कम जप्त केली. अमरावती जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या जिल्ह्यातील शाखांमध्ये जमा झालेली ही रक्कम असल्याचे सांगितले जात आहे. तसेच परतवाडा येथे एका व्यापाऱ्याकडे ७८ हजार ५०० रुपये, तर दुसऱ्या एका घटनेत ९ लाख ९४ हजारांची रोकड वाहनातून जप्त करण्यात आली. देवरी (जि. गोंदिया) येथे राज्य सीमेवर नाकाबंदीदरम्यान एका वाहनातून २५ लाख रुपये जप्त करण्यात आले. गडचिरोलीत जिमलगट्टा पोलिसांनी १४ लाखांची रोकड घेऊन जाणाऱ्या संतोष चिंतावार याला ताब्यात घेतले. दारव्हा (जि. यवतमाळ) येथे एका कारमध्ये सहा लाख ७३ हजारांची रोकड सापडली. याच जिल्ह्यातील घाटंजी येथेही अडीच लाख पोलिसांनी जप्त केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...