Wednesday 16 November 2016

डाव्या हाताच्या बोटांना शाई नको-निवडणूक आयोग

मुंबई (वृत्तसंस्था)- नोटा बदलण्यासाठी येणाऱया नागरिकांच्या डाव्या हाताच्या बोटांना शाई लावू नका, असे पत्र राज्य निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना आज (बुधवार) लिहीले आहे.

नोटा बदलून घेण्यासाठी टपाल कार्यालयापुढे लागलेल्या रांगेत केवळ गरजू नागरिकच नव्हे; तर काळा पैसा पांढरा करण्यासाठी भाडोत्री लोकांनीही रांगेत उभे करण्यास सुरवात केली आहे. त्यावर पर्याय म्हणून पैसे बदलून घेणाऱ्या नागरिकांच्या बोटावर आजपासून (बुधवार) मतदानाप्रमाणे शाई लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

नोटा बदलताना डाव्या हाताच्या बोटांना शाई लावल्यामुळे मतदान असलेल्या भागात याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे नोटा काढताना उजव्या हाताच्या बोटांना शाई लावा, असे राज्य निवडणूक आयोगाने पत्रात म्हटले आहे. 

दरम्यान, हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी टपाल कार्यालयापुढे सध्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. प्रत्येकाला नोटा मिळाव्यात व भाडोत्रींना दूर ठेवण्यापासून शाई लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...