बंगळूर (वृत्तसंस्था)- कर्नाटकमधील माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांची कन्या ब्राह्मणी हिचा बंगळूर येथे बुधवारी संपन्न होत असलेला शाही विवाह हा संपूर्ण देशातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. खाणसम्राट म्हणून ओळख असलेल्या जनार्दन रेड्डी यांनी या लग्नासाठी तब्बल 500 कोटी रुपये खर्च केल्याची चर्चा आहे.
या विवाहसमारंभाची वैशिष्ट्ये
जनार्दन रेड्डी यांचे वडिल चेंगा रेड्डी हे चित्तोर येथे पोलिस हवालदार होते. 1999 सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर जनार्दन चर्चेत आले. रेड्डी बंधूंनी त्यावेळी सुषमा स्वराज यांच्या निवडणूक प्रचारात सहभाग घेतला. त्यानंतर 2004 मध्ये त्यांना कर्नाटकातील लोखंडाच्या खाणीचा पहिला परवाना मिळाला. त्यानंतर बेकायदा खाण प्रकरणात अडकल्याने त्यांना अटक करण्यात आली आणि न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. सध्या ते जामीनावर तुरुंगाबाहेर आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीमुळे त्यांच्या कन्येचा विवाह चर्चेत आला आहे.
जनार्दन रेड्डी यांनी केवळ निमंत्रण पत्रिकांसाठी 5 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. एका बॉक्समध्ये असलेल्या निमंत्रणपत्रिकेत एलसीडी स्क्रीन लावलीे आहे. बॉक्स उघडल्यानंतर LCD स्क्रीन सुरू होते आणि त्यावर रेड्डी कुटुंबीय निमंत्रण देत असल्याचा व्हिडिओ स्क्रीनवर दिसतो.
No comments:
Post a Comment