
गोंदिया- ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने ८ डिसेंबर रोजी नागपूर विधानसभेवर आयोजिक महामोर्चा व मागण्यांना पवार समाज संघटनेच्या वतीने पाठिबां जाहीर करण्यात आले असून पवार प्रगतीशील मंचचे अध्यक्ष डॉ. कैलाशचन्द्र हरिणखेडे व सचिव डॉ.संजीव रहांगडाले यांनी संघटनेच्या वतीने ओबीसी संघर्ष समितीने जिल्हा अध्यक्ष बबलू कटरे यांना जयस्तंभ चौकातील ओबीसी संघर्ष समितीच्या कार्यालयात समर्थन पत्र दिले.या प्रंसगी डॉ.कैलाश हरिणखेडे यांनी पवार समजाच्या सर्व बंधू व भगिनींना आवाहन केले की,पवार समाज ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट असून आपल्या संवैधानिक अधिकारांना मिळविण्यासाठी समाजाच्या सर्व बांधवांनी राजकीय मतभेद बाजुला ठेवून या महामोर्च्यात मठ्या प्रमणात सहभागी व्हावे. या प्रसंगी मनोज मेंढे,शिशिर कटरे,प्रा.एच.एच.पारधी,सुरेश पटले,चंद्रकुमार बहेकार,त्र्यंबक जरोदे व इतर पदाधिकारीही उपस्थित होते.
No comments:
Post a Comment