
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली. मात्र या ठिकाणी कुठल्याही स्वरुपाचा गोळीबार झाला नसल्याची माहिती पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवक्ते नवाव मलीक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सभा सुरळीत सुरु असताना पाटील यांनी गोंधळ घातला. आणि सभा उधळून लावण्यासाठी हा प्रयत्न केल्याचा आरोप केला. यावेळी सात ते आठ बंदुकधारी इसमांनी गोळीबार केला. यामध्ये पाटील यांचा हात आहे.
याबाबत संजय पाटील यांच्याकडे विचारणा केली असता, हे आपल्याविरुद्ध रचलेले षडयंत्र असल्याचे म्हणणे आहे. आम्हाला सभेत निमंत्रण असल्याने आम्ही तेथे हजर झालो. सभेसाठी आतमध्ये प्रवेश करत असताना तेथे आम्हाला अडवून हल्ला करण्यात आला. नेमके काय झाले कळले नाही.अचानक समोरुन हातात तलवारी घेऊन घोळका जमला. अशात आम्ही विरोध केला असता हा गोंधळ झाला. अशात आपली बाजू सावरण्यासाठी मलिक यांनी हे आरोप केले आहेत.
No comments:
Post a Comment