Tuesday 15 November 2016

पेट्रोल-डिझेल स्वस्त

मुंबई, दि. १५ - नोटबंदीमुळे देशभरात लोकांचं दैनंदिन व्यवहार कोलमडल्याने गोंधळाची स्थिती आहे. या सर्व गोंधळात काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमतीमध्ये  घट झाल्याचा परिणाम म्हणून आज पेट्रोलच्या आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. आज मद्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. पेट्रोल दर कपातीमुळे वाहनधारकांना तर डिझेलच्या दरकपातीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. पेट्रोल प्रति लिटर 1 रुपया 46 आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 1 रुपया 53 पैशांनी घट करण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...