Tuesday, 8 November 2016

पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्याचा कालव्यात बुडून मृत्यू

अमरावती, दि.8 -मोर्शी येथील पाटबंधारे विभागात कार्यरत असलेल्या एका 52 वर्षीय कर्मचाऱ्याचा तिवसा नजीकच्या कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (ता.8)रोजी सकाळी घडली.
       अरुण श्रीराम तायडे(वय 52,रा.त्रिमूर्तीनगर,तिवसा ) असे मृतक इसमाचे नाव आहे.ते गेल्या काही वर्षापासून तिवसा येथे कार्यरत होते.मात्र अलीकडेच त्यांची बदली मोर्शी येथील अप्परवर्धा पाटबंधारे विभागात झाली होती.आज सकाळी साडेआठ वाजताचे सुमारास अरुण तायडे हे तिवसा ते सातरगाव रोडवरील अप्परवर्धा धरणाच्या उजव्या कालव्यातून वाहत असतांना काही नागरिकांना आढळून आले,त्यांनी तायडे यांना बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
      मृतक तायडे यांचा कालव्यात पडून मृत्यू झाला असावा,असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून मर्ग चा गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास तिवसा पोलीस करीत आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...