नागपूर दि.09:: शिक्षक साहित्य संघ महाराष्ट्र राज्य व नागपूर शाखेच्यावतीने
यावर्षी ५ वे राज्यसत्रीय शिक्षक साहित्य संमेलन नागपुरात घेण्याचा निर्णय
घेण्यात आला आहे. येत्या १३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
साहित्य नगरी, संताजी सभागृह, बुधवार बाजार सोमवारी क्वॉर्टर येथे या
संमेलनाचे उद््घाटन करण्यात येणार आहे. ८८ व्या अ.भा. मराठी साहित्य
संमेलनाचे अध्यक्ष व संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंन मोरे हे
शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहणार असल्याची माहिती विभागीय अध्यक्षा
विजया मारोतकर यांनी पत्रपरिषदेत दिली. संमेलनाचे उद्घाटक म्हणून
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.
सिद्धार्थविनायक काणे तर प्रमुख अतिथी म्हणून माहिती व जनसंपर्क
संचालनालयाचे मोहन राठोड, ज्येष्ठ साहित्यिक शुभांगी भडभडे व बालभारतीचे
अध्यक्ष नामदेव कांबळे उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रपरिषदेला डॉ. गणेश चव्हाण, डॉ. वीणा राऊत, मंगेश बावसे, डॉ. लीना निकम,
चित्रा कहाते, विशाल देवतळे आदी उपस्थित होते.
|
Wednesday, 9 November 2016
शिक्षक साहित्य संमेलन नागपुरात १३ पासून
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment