Wednesday, 9 November 2016

मोदींच्या निर्णयाचा शेअर बाजारावर परिणाम

वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.09:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा घेतलेला निर्णय आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक या दोन प्रमुख कारणांचा आज भारतातील शेअर बाजारावर विपरित परिणाम दिसून आला असून सोन्याचे भावही वधारले आहेत. सेन्सेक्‍समध्ये आज 1600 अंशांची घसरण आढळून आली असून सोन्याचा भाव 34 हजार रुपयांवर पोचला आहे. तर रुपयाच्या किंमतीत 23 पैशांची घसरण झाली आहे. 

सोन्याचा भावात तब्बल चार हजार रुपयांची वाढ झाली असून तो प्रति 10 ग्रॅम 34,000 रुपयांवर पोचला आहे. आगामी काळात सोन्याचे हे दर 38 हजारांपर्यंत पोहोचू शकतात, असा अंदाज व्यक्त तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. याशिवाय अमेरिकी अध्यक्षपदासाठी निवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील सोन्याचा भाव पाच आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोचला आहे. भारतीय रुपयाचे मूल्यदेखील 23 पैशांनी घसरुन डॉलरच्या तुलनेत 66.85 रुपये प्रति डॉलरएवढे झाले आहे. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...