Friday 11 November 2016

लाचेसाठी मागितल्या शंभरच्याच नोटा, सोलापुरात कृषी अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले

मुंबई- पाचशे व एक हजाराच्या चलनी नोटा रद्दबातल झाल्यानंतर सर्वांचीच पंचायत होताना दिसते आहे. पाचशे व एक हजाराच्या नोटा कोणीही घेण्यास तयार नसताना सोलापूर जिल्ह्यातील एका लाचखोर अधिकाऱ्याने लाच देताना १०० रूपयांच्याच नोटा देण्याची तंबी दिल्याचे उघडकीस आले आहे.
मोहोळ तालुका पंचायत समिती कार्यालयातील कृषी अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अडीच हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. जिल्हा परिषदेकडे कृषिसेवा केंद्राच्या परवान्याचा प्रस्ताव पाठवण्यासाठी बाळासाहेब भिकाजी बाबर या कृषी अधिकाऱ्याने हिंगणी (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील दत्तात्रय बेडगे यांच्या मलिकबाबा कृषिसेवा केंद्राच्या परवान्याचा प्रस्ताव तालुका पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेकडे पाठवण्यासाठी लाच मागितल्याची तक्रार होती. लाचेची रक्कम पाचशे व हजार रूपयांच्या कालबाह्य चलनी नोटांच्या स्वरूपात न देता शंभर रूपयांच्या चलनातच द्यावी, अशी तंबी बाबर यांनी तक्रारदाराला दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयातील पोलीस उपअधीक्षक अरूण देवक यांच्या पथकाने कृषी अधिकारी बाबर यास प्रत्येकी शंभर रूपयांच्या २५ नोटा स्वीकारल्या असता रंगेहाथ पकडले. त्याच्याविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...