Wednesday 16 November 2016

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल

पुणे, दि. १६ : आपल्या हक्काचे आणि विश्वासाने ठेवलेले पैसे बँक उपलब्ध करुन देत नसल्यामुळे एका खातेदाराने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जीत पटेल यांच्याविरुद्ध फसवणूक आणि अपहाराची तक्रार दाखल केली आहे. नोटाबंदी झाल्यामुळे पत्राद्वारे पुर्वकल्पना देऊनही बँकेमधून पैसे न मिळाल्याने कोंढवा पोलीस ठाण्यात ही तक्रार देण्यात आली आहे. नोटा बंदीवरुन पोलिसांकडे देण्यात आलेली ही पहिलीच तक्रार आहे.
अ‍ॅड. तोसिफ शेख (वय 25, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांनी लेखी तक्रार दिली आहे. कोंढवा पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास हा तक्रार अर्ज स्विकारला. शेख यांचे स्टेट बँक आॅफ इंडीयामध्ये बचत खाते आहे. खात्यामधील त्यांची जमा, ठेव रक्कम जेव्हा ग्राहकाला लागेल तेव्हा उपलब्ध करुन देणे बँकेला बंधनकारक असल्याचा कायदा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजारांच्या नोटांवर बंदी घातली आहे. त्यामुळे चलन तुटवडा निर्माण झाला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...